scorecardresearch

ठाणे Videos

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
Without Ticket Passenger Created Ruckus At Thane Station
“तिकीट नसेल तर दंड भरून जावं, तमाशा करून..”, महिलेचं टीसीशी भांडण पाहून नेटकरीही भडकले

Without Ticket Passenger Created Ruckus At Thane Station: बोरिवली स्थानकात एका विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तिकीट तपासनिसांच्या कार्यालयात तोडफोड केल्यानंतर…

Ashadhi Ekadashi special interaction with Mumbai local Bhajan group Police also experienced a unique arena of ashadhi ekadashi
आषाढी एकादशी विशेष मुंबई लोकलच्या भजन मंडळींसह गप्पा। पोलिसांनीही अनुभवलं अनोखं रिंगण

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या निमित्त मुंबई लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दरम्यान पालखीसह…

jitendra awhad criticized eknath shinde over thane rush
“बिळात लपून बसलेत..”, उपमुख्यमंत्री शिंदेंवर भडकले ठाणेकर; आव्हाडांनी मांडली आंदोलनकर्त्यांची बाजू

Thane Traffic: मेट्रो उड्डाणपूल, नव्या इमारती बांधून ठाणे बदलतय अशा गप्पा एकीकडे मारल्या जात असताना सायंकाळच्यावेळेत गावदेवी परिसरातून घरी परतण्यासाठी…

kalwa youth arrested for spying for pakistan
ATS Arrested Ravi Verma: हेरगिरी प्रकरणी एटीएसकडून २७ वर्षीय अभियंत्याला अटक

पहगलाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. या…

developer cheat the residents of Thanes Kopari area Serious allegations by the Congress
ठाण्याच्या कोपरीत रहिवाशांची विकासकाने केली फसवणूक? कॉंग्रेसचे गंभीर आरोप

Thane Kopari Builder cheats Residents: कोपरीतील सिंधी कॉलनीतील इमारतधारकांना आधी ४५० चौरस फुटांचे घर विकासकाने मंजुर केले होते. परंतु, त्यानंतर…

Jitendra Awhad criticized Thane Municipal Commission
Jitendra Awhad : ठाणे मनपा आयुक्ता कधीतरी जेलमध्ये जावं लागेल; जितेंद्र आव्हाडांची टीका

कचरा उचलणे व वाहतूक करण्यासाठी २३०० कोटी रुपयांचं टेंडर काढलं जात आहे, अशी चर्चा ठाणे महानगरपालिकेत आहे. मात्र डम्पिंग ग्राउंड…

A minor boy hit two rickshaws Thane Accident information gave by Police
Thane Accident: अल्पवयीन मुलाने दोन रिक्षांना उडवलं; पोलिसांनी दिली माहिती

ठाण्यात रविवारी रात्री १५ वर्षाच्या मुलाने दोन रिक्षांना उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर…

Eknath Shinde started the New Year by donating blood at thane
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी रक्तदान करून केली नववर्षाची सुरुवात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ठाण्यात रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केलं. तसंच नववर्षाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या विकासाचा…

Avinash Jadhav slapped the rickshaw driver who beat up a woman
Avinash Jadhav: रिक्षा चालक महिलेला मारहाण करणाऱ्याला अविनाश जाधव यांनी लगावली कानशिलात

Thane: ठाण्यातील विविआना मॉलमधील सुरक्षा रक्षकाने एका महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. या घटनेनंतर अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा…

ताज्या बातम्या