scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

विद्या बालन Videos

विद्या बालन ही बॉलिवूडमधील विविध व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरुवात करण्यापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये छोट्या भूमिकाही केल्या. काही म्युझिक व्हिडीओमध्‍ये तिच्‍या पात्राची दखल घेतली गेली. विद्याला लहानपणापासूनच चित्रपटात करिअर करण्याची इच्छा होती आणि १९९५ च्या सिटकॉम हम पांचमध्ये तिने काम केलं. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून, तिने चित्रपटात करिअर सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ‘भालो थेको’ या बंगाली चित्रपटांतून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘परिणीता’मधील भूमिकेची खूप प्रशंसा झाली. यानंतर ‘लगे रहो मुन्ना भाई’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. २०१२ च्या ‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटामुळे विद्या खूप लोकप्रिय झाली. या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज लोकांना चांगलाच पसंत पडला. विद्याने नंतर निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली.Read More

ताज्या बातम्या