Guru Margi 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये गुरूला ज्ञान, शिक्षण, अपत्य आणि विवाहाचा कारक मानले जाते. ज्या राशींवर गुरूची कृपा असते त्या राशींचे करिअर आणि कौटुंबिक जीवन सुखी असते. तसेच यांचे भाग्य प्रबळ असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषशास्त्रानुसार, ४ फेब्रुवारी २०२५ मंगळवार ला गुरू वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या दोन दिवसापूर्वी वसंत पंचमी आहे. हा शुभ संयोग मेष राशीसह इतर पाच राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. जाणून घेऊ या वसंत पंचमीच्या दोन दिवसानंतर कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ ठरणार आहे. ग्रहांच्या चांगल्या चालीमुळे या लोकांना धन संपत्ती मिळू शकते ज्यामुळे यांना अचानक धन लाभ होऊ शकतो. नोकरी करत असलेल्या लोकांना यश मिळू शकते आणि आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. त्यांना भरपूर लाभ मिळू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येईल. नातेसंबंध आणखी दृढ होईल.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. गुरुचा थेट प्रभाव या लोकांच्या भाग्यावर दिसून येईल. सुरुवातीच्या कार्यात या लोकांना भरपूर यश येईल. अडकलेले कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. शिक्षण क्षेत्रामध्ये जुळलेल्या लोकांना विशेष लाभ होईल. पार्टनरशिपमध्ये करत असलेल्या व्यवसायात यश मिळेल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय सकारात्मक परिवर्तन घेऊन येणार. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील आणि करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. गुरूची सरळ चाल या लोकांचे भाग्य बदलू शकते. या लोकांच्या जीवनात यश आणि आनंद दिसून येईल.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या लोकांना गुरूच्या कृपेमुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती दिसून येईल. जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्याची मदत मिळेल ज्यामुळे ते करिअरमध्ये प्रगती करू शकतील. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर राशी

गुरूच्या कृपेमुळे मकर राशीच्या लोकांना विदेशात प्रवास करण्याचे योग जुळून येत आहे. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचा सन्मान वाढणार. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरू मार्गी झाल्यानंतर या राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील ज्यामुळे यांच्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru margi 2025 will be lucky for five zodiac signs people get money wealth success after 3 days ndj