Numerology : अंकांना आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. कारण- तुम्ही पाहिलेच असेल की, काही अंक शुभ; तर काही अंक अशुभ असतात. अंकशास्त्रातही या अंकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अकांना मूलांक असे म्हटले जाते. प्रत्येक मूलांकचा संबंधा हा देवाशी आणि ग्रहाशी असतो. आपण आज ८ या मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत; ज्याचा संबंध कर्मदाता शनिदेवाशी आहे. म्हणजेच महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असतो. ज्या लोकांवर ८ या अंकाचा प्रभाव असतो, त्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते. त्याच वेळी हे लोक मेहनती असतात. तसेच त्यांचा नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास असतो. चला जाणून घेऊ ८ या मूलांकाशी संबंधित आणखी रंजक माहिती…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमवतात भरपूर धन-संपत्ती

अंकशास्त्रानुसार ८ या मूलांकाशी संबंधित लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. त्याशिवाय हे लोक अफाट संपत्तीचे मालक असतात. या लोकांचे नशीब ३९ वर्षांनंतर चमकते. त्याच वेळी या मूलांकाशी संबंधित व्यक्ती क्वचितच भौतिक सुखांचा आनंद घेतात. म्हणजे असे लोक साधे जीवन जगणे पसंत करतात; तसेच त्यांचे विचारही उच्च असतात. हे लोक एखाद्या गोष्टीचा खोलवर पाठपुरावा करतात आणि निष्कर्षापर्यंत पोहोचतात. हे लोक कोणतेही काम कोणालाही न सांगता, शांतपणे पूर्ण करण्यावर भर देतात. तसेच वक्तशीर असलेल्या या लोकांना आळशी वृत्ती आणि निष्काळजीपणा अजिबात आवडत नाही.

२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन

नशिबापेक्षा ठेवतात कर्मावर विश्वास

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मूलांक ८ आहे, ते भाग्यापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. तसेच, हे लोक मेहनती आणि विश्वासू असतात. त्याच वेळी स्वातंत्र्यप्रिय असलेल्या या व्यक्तींना स्वतःच्या अटींवर काम करायला आवडते. या लोकांना ना कोणाची लाचारी करणे आवडते ना त्यांची खुशामत करणे. तसेच, हे लोक त्यांच्या शक्तींचा कमी वापर करतात. ८ मूलांकाच्या लोकांना खूप व्यवस्थापित पद्धतीने फिरणे आवडते. त्यांना विखुरलेल्या गोष्टी आवडत नाहीत. तसेच, त्यांना भौतिकवाद आणि अध्यात्म यांच्यात संतुलन राखणे आवडते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Numerology 8 mulank people are blessed by shani dev gives more money wealth and happiness sjr