11 July 2020

News Flash

Ishita

लोकसभेसाठी राजळे यांना हिरवा कंदील?

नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असे पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत स्पष्ट केले

अनुसूचित जमातीचा अनुशेष ही शोकांतिका- खा. वाकचौरे

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही शासकीय नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीचा मोठा अनुशेष असणे ही शोकांतिकाच असल्याची खंत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केली.

मुळातच निधीची बोंब, आता १६ कोटींचा अनुशेष!

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडील पाणी योजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधीची चणचण भासत असली तरी प्रत्यक्षात दुसरीकडे या विभागाचा मोठा अनुशेषही निर्माण झालेला आहे.

नद्या-नाल्यातील गाळ काढण्याचे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे द्योतक-शिंदे

विहिरी व नाल्यांतील गाळ काढण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला व पाण्याची पातळी वाढण्यास महत्वाचा हातभार लावला. हे कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे द्योतक आहे, असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

औरंगाबादमध्ये गॅरेजमधील स्फोटात दोन ठार, तीन जखमी

भागातील जटवाडा भागात एका स्टील कॅरियर तयार करणा-या गॅरेजमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात २ ठार तर सात जण जखमी झाले आहेत. सायंकाळी साडेसात वाजता हा स्फोट झाला.

साखर उद्योग ‘ऑक्सिजन’वर!

गेल्या वर्षी साखरेचे उत्पादन मोजण्यात सरकारने चूक केली. ११० ते ११५ टन साखर अधिक होती. या वर्षी राज्यात उशिरा कारखाने सुरू झाले. त्यामुळे उत्पादनात तब्बल २१ टक्क्य़ाची तूट येऊ शकेल.

भाऊसाहेब गांधी यांचे वालचंद शिक्षण समूहाच्या वाटचालीत मोठे योगदान

सोलापूर शहर आजही मागासलेले असून येथील गोरगरिबांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची कास धरता यावी म्हणून आपण पुढाकार घेऊन सोलापूर विद्यापीठाची निर्मिती केली. शिक्षणाची भूक ठेवून दिवंगत भाऊसाहेब गांधी यांनी वालचंद शिक्षण समूहाच्या वाटचालीत मोठे योगदान दिले.

नवलभाऊ फिरोदियांचे विचार दीपस्तंभासारखे- हजारे

ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी नवलभाऊ फिरोदिया हे माझ्या जीवनात दीपस्तंभासारखे आधार ठरल्याचे सांगतानाच देश व समाजासाठी व्रत घेऊन आयुष्यात आपण जे काही करू शकलो. नवलभाऊंच्या विचारांमधूनच बरेच काही शिकायला मिळाल्याचे कृतज्ञ उदगार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी राळेगणसिद्घी येथे बोलताना काढले.

दिलीप गांधींच्या उमेदवारीस भाजपच्या प्रमुख पदाधिका-यांचा विरोध

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षातीलच पदाधिका-यांनी प्रखर विरोध केला आहे. गांधी सोडून पक्षाने अन्य पर्यायांचा गंभीरपणे विचार करावा, असे जाहीर आवाहन करत या पदाधिका-यांनी गांधी यांना आव्हान दिले आहे.

चितळे समितीच्या अहवालानंतर सिंचन घोटाळ्याचा दुसरा अंक सुरू करू – पांढरे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत चितळे समितीचा अहवाल आल्यानंतर सिंचन घोटाळ्याचा पुढचा अंक जनतेसमोर मांडला जाईल. केवळ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे षड्यंत्र सरकारने आखले असून, लोकप्रतिनिधींना कारवाईच्या बाहेर ठेवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक विजय पांढरे यांनी केला.

राजळेंच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेते गडाख यांचा पाठिंबा

आ. बबनराव पाचपुते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी राजीव राजळे यांना योग्य राहील व त्यांचीच उमेदवारी जाहीर होईल, असे आपल्याला वाटते, असे सांगतानाच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी राजळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘लो प्रोफाइल’ वागणे आवश्यक आहे, असा सल्लाही दिला आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण हवे- खा. गांधी

सध्या सर्वच समाज आरक्षण मागत आहेत, सरकारही कोणाकोणाला आरक्षण द्यावे या संभ्रमावस्थेत आहे, उपेक्षित व गरीब वर्गाला न्याय द्यायचा असेल तर आरक्षण समाजाला नव्हे तर आर्थिक निकषावर द्यावे तरच समाजातील शेवटच्या घटकाला खऱ्या अर्थाने फायदा होईल, असे मत खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केले.

लॅपटॉप, महाग मोबाइलची चोरी

मूकबधिर असल्याचा व मूकबधिर, अनाथांच्या संस्थेसाठी मदत मागण्याचा बहाणा करून चो-या करणारी, विशेषत: लॅपटॉप, किमती मोबाइल चोरणारी केरळ, तामिळनाड राज्यातील टोळी शहरात कार्यरत असून त्यातील दोघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली.

दर्जेदार आणि सकस साहित्याचा केंद्रबिंदू खेडेच – इंद्रजित भालेराव

शहरी भागात लिहिण्यासारखे काही उरलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातूनच सकस आणि दर्जेदार साहित्य निर्माण होत आहे. शहरातील विद्वानांनी त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी आपली विद्वत्ता उपयोगात आणावी, असे सांगत कविता हीच माझी भूमिका असल्याचे मत तिसऱ्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

भाजपने संधी दिली तर लोकसभेच्या मैदानात उतरू- प्रकाश शेंडगे

पक्षाने आदेश दिला तर लोकसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दर्शविली. जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी असणारा ३५ कोटीचा निधी सत्ताधारी मंडळींनी तासगाव, कवठेमहांकाळकडे वळविल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.

जि.प.च्या शाळेतील विद्यार्थिनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींत पहिली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४६४ गुण मिळवून क्रांती काशिनाथ डोंबे ही राज्यात जिल्हा उपनिबंधकांच्या यादीत मुलीतून प्रथम आली

पतीशी भांडून आलेल्या तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न दक्षतेने फसला

मुंबईतील कल्याणहून पतीशी भांडून आलेल्या तरुणीचे ऊसतोडीच्या कामावर लावतो म्हणून अपहरण करण्याचा प्रयत्न मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दक्ष नागरिकांच्या हस्तक्षेपाने उधळला गेला. अपहरणकर्त्यां दोघांना नागरिकांनी जीपसह पोलिसांच्या हवाली केली.
ज्योती राजू उर्फ सिकंदर शेख

प्रशासकीय अधिकारी ज्योती कुलकर्णी निलंबित

परभणी महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रभारी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ज्योती कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांकडून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्रत्येकी ३ ते १० हजार रुपये घेतल्याचे त्यांनी कबूल केल्यानंतर प्रभारी आयुक्त एस. पी. सिंह यांनी कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

आयटी पार्क परिसरात डंपर धडकेत दोन ठार

गोखले कॉलेज ते ध्यानचंद हॉकी स्टेडीयम मार्गावर आय टी पार्क परिसरात भरधाव डंपरने तिघांना उडवले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोन जण ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

सोलापुरात आज ‘जीवनसमृध्दी’ समुपदेशन केंद्राचा शुभारंभ

सोलापुरातील प्रसिध्द समुपदेशिका अलका काकडे यांच्या समुपदेशनाच्या कार्याला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उद्या सोमवारी, ३ फेब्रुवारी रोजी त्रिदशकपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या आजच्या कोल्हापूर दौ-यायाकडे लक्ष

लोकसभा निवडणुकीची समीकरणे, महायुतीच्या महासभेत उपस्थित केलेल्या मुद्यांचे प्रत्युत्तर, साखर उद्योगाचे बिघडलेले अर्थकारण, बेरजेचे राजकारण अशा विविध विषयांसंबंधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यात कोणते मत व्यक्त करणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

उद्योजक कर्नाटकात जाण्याच्या निर्णयावर ठाम

महावितरणच्या अधिका-यांनी वीजदरामध्ये केलेल्या कपातीचे कोणते लाभ होणार हे स्पष्ट करूनही शुक्रवारी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता रमेश घोलप यांच्यासमवेत झालेल्या बैठकीवेळी उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय ठाम असल्याचे स्पष्ट केले.

कवठेमहांकाळमधील तरुणीचा खून बुवाबाजीतूनच

कवठेमहांकाळ येथील तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतूनच झाला असल्याचे पालकांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी स्पष्ट झाले. मृत तरुणीला कुंडली चांगली नाही, शांती करण्यासाठी पूजा करणे गरजेचे आहे, असे सांगत कर्नाटकातून पंढरपूरला बोलावून अपहरण करण्यात आले होते.

मृताचा हुबेहूब चेहरा बनवून गुन्ह्य़ाची उकल करण्याचा प्रयत्न

एका अज्ञात तरूणाचा खून करून धडावेगळे केलेले शिर मंगळवेढा तालुक्यात विहिरीत सापडून नऊ महिने उलटले तरी या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने पोलीस तपास यंत्रणेने गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा हुबेहूब चेहरा तयार केला आहे.

Just Now!
X