14 August 2020

News Flash

Ishita

राज्याचा विनाश घडविणा-या दोन्ही काँग्रेसला सत्तेवरून हटवा

देशात सर्वच क्षेत्रात प्रगतीशील समजले जाणारे महाराष्ट्र राज्य गेल्या पंधरा वर्षांत पिछाडीवर राहिलेले आहे. राज्याचा विनाश घडविणा-या राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून हटविले पाहिजे. महाराष्ट्र पुन्हा एकदा विकासशील होण्यासाठी भाजपा नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताचे शासन आणावे, असे आवाहन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर सभेत केले.

शेवटच्या महिन्यात ‘लक्ष्मीदर्शना’साठी बाबांचे दिवसरात्र सरकार- फडणवीस

काँग्रेसच्या मुख्यमंत्री बाबांनी शेवटच्या महिन्यात मोठय़ा ‘लक्ष्मीदर्शना’साठी दिवसरात्र सरकार चालविल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

.. तर पारनेर कारखाना कर्जमुक्त करू

पारनेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबासाहेब तांबे यांना विजयी करा, पारनेर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करून त्यावर शेतक-यांची मालकी प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपली राहील, अशी ग्वाही पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली.

उमेदवाराचा भाजपला, कार्यकर्त्यांचा सेनेला पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली असून त्यांचे अधिकृत उमेदवार जालिंदर जाधव यांनी भाजपचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा दिला आहे, तर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे उमेदवार लहू कानडे यांना पाठिंबा दिला आहे.

कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त

देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांत समावेश असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाला आवर घालण्यात कोल्हापूर महापालिका अपयशी ठरत असल्याने पुन्हा एकदा महापालिकेची १८ लाखांची बँक गॅरंटी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्त केली आहे. अर्थात महापालिकेची बँक गँरटी बंद होण्याचा पहिला नव्हे तिसरा प्रकार आहे.

‘आयआरबी’ कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले

अंतर्गत रस्ते प्रकल्पांतर्गत टोल आकारणी करणाऱ्या आयआरबीच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी टोप या गावातून पिटाळून लावले. या गावात एका इमारतीत सुमारे १०० कर्मचारी राहत होते.

सोलापुरात वादळी पाऊस; शाळेचे पत्रे उडाल्याने २० विद्यार्थी जखमी

सोलापूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. या पावसात वादळी वाऱ्यामुळे शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका प्रशालेच्या वर्गावरील पन्हाळी पत्रे उडाल्याने त्यात २० विद्यार्थी जखमी झाले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात ठाकरे स्मारकाचा प्रस्ताव

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दाखल झाला असून हे स्मारक विजापूर रस्त्यावर रेवणसिध्देश्वर मंदिराजवळ उभारण्याचे नियोजन आहे.

सांगली महापालिकेचा अर्थसंकल्प करवाढविना

महापालिकेचे उत्पन्न एलबीटीमुळे घटल्याने शासनाकडून विविध योजनांसाठी २०० कोटी रुपयांची मदत अपेक्षित धरुन कोणतीही कर वाढ नसलेला ४०८ कोटींचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समिती समोर मांडला जाणार आहे.

लोणंद बाजारातून गरवा कांद्याची निर्यात

लोणंद येथील ‘गरवा’ आता सिंगापूर ,मलेशिया, दुबई, मस्कत आदी देशांत निर्यात होत आहे. मध्यम आकाराचा आकर्षक रंगाचा चटकदार चवीचा वेगवेगळया पॅकिंगमध्ये दररोज पाच ट्रक कांदा निर्यातीसाठी पाठविला जात आहे.

प्रकृती बिघडल्याने आंदोलक रुग्णालयात

अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेच्या नेतृत्वाखाली उपोषण करीत असलेल्या तिघा आंदोलकांची प्रकृती बिघडल्याने बुधवारी त्यांना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आगरकर, कावरे यांना भाजपची नोटीस

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अभय आगरकर व महानगरपालिकेतील पक्षाचे गटनेते दत्तात्रेय कावरे यांना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. मनपातील स्वीकृत सदस्याची निवड आणि पक्षाच्या बूथ समित्यांबाबत हलगर्जीपणा असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आर्थिक सुधारणांच्या नावाखाली शाब्दिक खेळ- कॉ. कांगो

सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या बदलांना आíथक सुधारणा असे गोंडस नाव देऊन शब्दांचे खेळ सुरू आहे. या बदलांच्या परिणामांचा अभ्यास करून यातून नेमका कोणाचा फायदा होणार याचा विचार होत नाही, तोपर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होणार नाही, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.

श्रीगोंदे-कर्जतला गारपिटीचा तडाखा

श्रीगोंदे व कर्जत तालुक्यात काही भागाला बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. गाराही मोठय़ा आकाराच्या होत्या. गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

चालकाचा खून करून कापसाचा ट्रक लांबवला

बीड जिल्ह्यातून गुजरातला कापूस घेऊन जाणारी मालमोटार अज्ञात आठ जणांनी रस्त्यात अडवून चालकाचा धारदार शस्त्राने खून केला. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून, मृत व जखमीला रस्त्यात फेकून या चोरटय़ांनी साडेबारा टन कापसासह मालमोटार व ३६ हजारांची रोकड असा १५ लाखांचा ऐवज चोरून नेला.

श्रीरामपूरला उद्यापासून रयत विज्ञान परिषद

येथील बोरावके महाविद्यालयात येत्या दि. २८ पासून दुसरी रयत विज्ञान परिषद आयोजित करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहा वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत.

डॉ. पठाण व डॉ. कासार यांना पुरस्कार

दादासाहेब रूपवते फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समतावादी विचारवंत तथा संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांना समताभूषण तर ज्येष्ठ आंबेडकरवादी कृतिशील विचारवंत डॉ. मधुकर कासार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले

शिक्षकाच्या बेजबाबदारपणाच्या निषेधार्थ शेकेईवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला मंगळवारी ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. संबंधित बेजबाबदार शिक्षकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली असून, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे.

संजय पाटलांच्या भाजप प्रवेशाचे सांगलीत स्वागत!

राष्ट्रवादीचे आमदार संजय (काका) पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची घोषणा मुंबईत करताच तासगाव शहरातील त्यांच्या समर्थकांनी ‘नई सोच, नई उम्मीद’ असा नारा देत फटाक्यांची आतषबाजी करून मंगळवारी जल्लोष केला.

सांगली जिल्हा बँकेच्या संचालकांना नोटिसा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्जवितरण व एकरकमी परतफेडीसाठी नियमबाहय़ सवलत दिल्यामुळे बँकेच्या १५७ कोटींचे नुकसान झाल्याबद्दल गेल्या पंधरा वर्षांतील ५० माजी संचालकांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यंत्रमाग कारखानदाराचा इचलकरंजीत खून

आर्थिक देवघेवीच्या कारणातून यंत्रमाग कारखानदार संजय बाबगोंडा पाटील यांचा सोमवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योग बंद ठेवण्यात आला होता.

सांगलीत शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील अतिक्रमिक घर काढावे या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या उद्वेगातून एका शेतक-याने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

ग्रामसेवकांची कराडला निदर्शने व बेमुदत लेखणी बंद आंदोलन

ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कराड तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिका-यांनी कराड पंचायत समितीसमोर निदर्शने करून बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे.

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने भाजप नगरसेविकेचा राजीनामा

भारतरत्न इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता वाढली आहे. या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही या समस्या कायम राहिल्याने वैतागलेल्या भाजपच्या स्थानिक नगरसेविका मंगला पाताळे यांनी मंगळवारी महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात गांधीगिरी मार्गाने आंदोलन करीत ठिय्या मारला आणि पदाचा राजीनामाही दिला.

Just Now!
X