14 August 2020

News Flash

Ishita

के. एन. पाटील, संदीप जंगम यांच्या अनोख्या शिवकार्याचे स्मरण

तप्त उन्हाळा असो, धुवाधार पाऊस की गारठवून टाकणारी थंडी. ऋतू कोणताही असला तरी त्यांच्या शिवभक्तीच्या प्रेमाला ओहोटी कधीच येत नाही. वीरमरण आलेल्या वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन, शिवरायांच्या कर्तृत्वाला मुजरा, मराठेशाहीतील ऐतिहासिक घटनांना उजाळा असा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला किल्ले पन्हाळगडावर पार पडतो.

देशातील मध्यमवर्ग कृतघ्न बनला- केतकर

मध्यमवर्ग अधिक उतावीळ झाला असून कृतघ्न बनला आहे. चळवळीपासून तो दूर गेला असून, त्यातूनच ‘माझे मी बघेन’ अशी प्रवृत्ती वाढत चालली असून, तो केवळ व्यक्तिवादीच नव्हेतर आत्महितवादी बनला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

बालविवाह प्रकरणी १९ जणांवर गुन्हा

बालविवाह केल्याप्रकरणी संगमनेर, पारनेर तसेच पुणे जिल्हय़ातील एकूण १९ आरोपींच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्तापूरच्या ग्रामस्थांकडून पोलिसांचा गौरव

रस्तापूर (ता. नेवासे) येथील अंबिका डुक्रे खूनप्रकरणाचा यशस्वी तपास करून, अंबिकाच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा झाल्याबद्दल डुक्रे कुटुंबीय व रस्तापूरच्या ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह तत्कालीन तपास पथकातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पोलिसांच्या चांगल्या कामाची समाज निश्चितच दखल घेतो, याचा अनुभव दिला.

नगरकरांना शिस्त कशी आणि कोण लावणार?

शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘ट्रॅफीक सेफ्टी’साठी सुरू केलेल्या उपाययोजना नगरकरांच्या बेशिस्तीला आणखी खतपाणी घालणाऱ्याच ठरतील अशीच स्थिती आहे.

दोन्ही काँग्रेसची श्रेयासाठीच धडपड

केंद्र सरकारमधील संयुक्त लोकशाही आघाडी सरकारच्या अन्नसुरक्षा कायदा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या श्रेयावरून जिल्हापातळीवरही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला चाबकाने फोडण्याची वेळ- मुंडे

भ्रष्टाचारात बरबटलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चाबकाने फोडण्याची वेळ आली आहे. जनतेचा विश्वास नसल्याने शरद पवारांना राज्यसभेचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. भ्रष्ट अजित पवारांनी बीड मतदारसंघामध्ये उभे राहून दाखवावे, असे आव्हान भाजपाचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी इचलकरंजी येथे झालेल्या महायुतीच्या महासभेत गुरूवारी बोलतांना केले.

टेंभूच्या पाण्यासाठी आटपाडीकरांचा बंद

टेंभूच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यवहार बंद ठेवून आटपाडीकरांनी गुरुवारी जोरदार पाठिंबा दर्शविला. बंद मुळे आटपाडीतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

प्रजासत्ताक संचलनातील चित्ररथांवर कोल्हापूरच्या कलाकारांची छाप

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने यावर्षी प्रथमच मुंबईत मरीन ड्राईव्हवर झालेल्या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या महसून आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले असले तरी या चित्ररथांची संकल्पना व निर्मिती कोल्हापुरातील मयूर प्रकाश कुलकर्णी यांच्या अँडवे डिझाईन स्टुडिओने केली होती.

पुतळय़ाचे दहन करताना बघ्याची भूमिका घेणा-या पोलिसांवर कारवाई

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे मनसे कार्यकर्ते दहन करीत असताना बघ्याची भूमिका घेतल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख व सहायक निरीक्षक कुमार घाडगे यांची मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

अक्कलकोटजवळ तलावात बुडून ऊसतोड मजुरांची दोन मुले मृत

अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तलावात खेळता-खेळता पडल्याने बीड जिल्ह्य़ातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा(वय ५) अंत झाला. जीवन विजय पवार व सावन भगवान पवार अशी मृत मुलांची नावे आहेत.

कवठेमहांकाळमधील तरुणीचा खून बुवाबाजीतून झाल्याचा संशय

कवठेमहांकाळ नजीक अज्ञात तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतून झाला असावा, असा तपास यंत्रणेचा प्राथमिक कयास असून मयत तरुणी कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि तरुणीच्या नातलगांनी ओळख दर्शविल्याशिवाय पुढील माहिती हाती येणार नसल्याचे पोलीस अधिका-यांनी गुरुवारी सांगितले.

सोलापुरात भरचौकातील तीन शोरूम फोडून १५ लाखांचा ऐवज लांबविला

सोलापूर शहरात गुरुवारी पहाटे चोरटय़ांनी एकाच वेळी भरचौकातील तीन मोठी दुकाने फोडून उंच्या किमतीचे मोबाइल संच व नामवंत कंपनीचे चप्पल-बूट लांबविले.

प्रेम काळपकर सुवर्णपदकाचा मानकरी

नवी दिल्लीत झालेल्या, राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताकदिन शिबिरातील ‘बेस्ट कॅडेट’ स्पर्धेत अहमदनगर कॉलेजचा छात्र प्रेम कोळपकर याने सुवर्णपदक पटकावून, महाराष्ट्र संचलनालयाला सलग सहाव्यांदा मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

श्रीरामपूर येथे दोन युवतींची आत्महत्या

महाविद्यालयाने घेतलेल्या बारावीच्या पूर्वपरीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून बेलापूर येथील शुभांगी प्रभाकर आढाव (वय १९) या विद्यार्थिनीने रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली.

निंबळक उड्डाणपुलाचे उद्या उदघाटन

प्रदीर्घ काळ रेंगाळलेल्या रेल्वेच्या निंबळक येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. परवा (शनिवार) सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. हा रस्ता सुरू झाल्यामुळे मनमाडकडून पुण्याला जाणाऱ्या वाहनांना आता नगर शहरात येण्याची गरज भासणार नाही.

सहा तालुक्यांमध्ये शांततेत मोठे मतदान

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी जिल्हय़ातील सहा विधानसभा मतदारसंघात आज उत्साहात मतदान झाले. उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघात उद्या (शुक्रवार) मतदान होणार आहे. नंतर लगेच नगर शहर व राहाता येथे मतमोजणी होणार आहे. कोठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचा दावा नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केला.

सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

दहा टक्के लोकवर्गणी भरल्यानंतर सरकारकडून मिळालेल्या यशवंत ग्रामसमृद्धी योजनेतून उपसा सिंचन योजनेचे काम अर्धवट ठेवून त्यावर खडांबे खुर्द (ता. राहुरी) येथील माजी ग्रामसेवक व माजी सरपंचानेच डल्ला मारला. राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीगोंदे नगराध्यपदासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये लढत

येथील नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छाया गोरे व काँग्रेसकडून मीना शेंडगे यांच्यात सरळ लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी अन्य इच्छुकांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.

देश-विदेशातील भाविकांची मोठी गर्दी

अवतार मेहेरबाबा यांच्या ४५व्या अमरतिथी उत्सवाला गुरुवारी मेहेराबाद (आरणगाव) येथे उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

सदाभाऊ खोत यांच्या अटकेमुळे राजकारण नव्या वळणावर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या अटकेमुळे लोकसभा निवडणुकीचे राजकारण नव्या वळणावर पोहोचू लागले आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीची मुलूख मैदानी तोफ सदाभाऊ खोत यांना उतरविण्याच्या जोरदार हालचाली सुरू असताना त्यांना अटक झाल्याने उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंढरपुरात नाटय़संमेलनाची तयारी पूर्ण

येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान पंढरपुरात अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. या नाटय़संमेलनासाठी तीन रंगमंच उभारण्यात आले आहेत.

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोल हटविणार

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील खासगीकरणातून उभारण्यात आलेल्या बायपास पुलावरील टोल हटविण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केली.

महायुतीचा प्रचाराचा आज वाजणार बिगुल

देशात सत्तांतर घडवून आणण्याच्या निर्धाराने वाटचाल करू लागलेल्या शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या महायुतीचा प्रचाराचा बिगुल गुरुवारी इचलकरंजीतील महासभेमध्ये वाजणार आहे.

Just Now!
X