06 August 2020

News Flash

Ishita

नव्याने वसुलीसाठी १९ अब्जांचे प्रकल्प निविदा स्तरावर

टोल वसुलीची रक्कम सांगण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कमालीची खळखळ करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अनुषंगाने बैठक बोलविली आहे. त्यामुळे मराठवाडय़ातील रस्त्यांवरील टोल हटविला गेल्यास सरकारला किती तोटा सहन करावा लागेल, याची आकडेवारी मंगळवारी देण्यात आली.

आ. सोळंके समर्थक संचालकांचा सभापती होके यांच्याविरुद्ध ठराव

माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजी उफाळली असून, एका गटाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आमदार प्रकाश सोळंके यांच्याविरुद्ध तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर, सोळंके समर्थकांनीही उचल खाल्ली. त्यातूनच बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण होके यांच्याविरुद्ध सोळंकेसमर्थक १५ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला.

वादग्रस्त व्यवहारांच्या चौकशीची मागणी

स्थापनेची शताब्दी साजरी करण्याच्या तयारीत असलेल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील ‘अशोकपर्व’ नव्या वर्षाच्या साक्षीने संपुष्टात आले. या पार्श्र्वभूमीवर मागील ५ वर्षांत संस्थेत झालेल्या वादग्रस्त व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी सभासद, तसेच हितचिंतकांमधून केली जात आहे.

देहरे टोलचालकाविरुद्ध दावा दाखल

नगर-मनमाड रस्त्यावरील देहरे (ता. नगर) येथील टोल नाक्यावर बनावट पावत्यांच्या सहायाने बनावट सरकारी कागदपत्रे तयार करुन लाखो रुपयांचा अपहार केला.

समाजातील नकारात्मकता दूर होणे गरजेचे- लोखंडे

आपल्या सभोवती अगणित चांगल्या गोष्टी घडत असतात. त्या लोकांपर्यंत पोहोचवून समाजातील नकारात्मकता कमी करण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन अनिवासी गाववासी चळवळीचे प्रणेते प्रदीप लोखंडे यांनी केले.

वाचनसंस्कृतीकडे तरुणांना आकर्षित करणे आवश्यक

ज्ञानवंत, संत, अभ्यासकांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सर्वात मोठी वाचनसंस्कृती रुजली. परंतु आता वाचनसंस्कृती पूर्णपणे ढासळली.

अजित पवार यांच्यासह माझीही नार्को टेस्ट करण्यात यावी– खोत

माढा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवकी नंदन दूध संस्थेचा अध्यक्ष म्हणून मला अपहारप्रकरणात गुंतविण्याचे षड्यंत्र रचले आहे.

टोल नाक्यांची सांगलीत तोडफोड

सांगली बायपास रस्त्यावर सुरू असणा-या टोलविरुद्ध आंदोलनाला सोमवारी िहसक वळण लागले असून, कार्यकर्त्यांनी कंपनी कार्यालयाला कुलूप ठोकून फलकाची नासधूस केली.

बायपास रस्ता लवकरच चौपदरी- भुजबळ

शहराबाहेरचा बाह्यवळण रस्ता पूर्ण झाला. आता या रस्त्याचे चौपदरीकरण येत्या अडीच वर्षांत करण्याचे नवे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी संगमनेरकरांना दिले. बाह्यवळण मार्गाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.

लेझीम खेळाचा सांगलीत विश्व विक्रम

सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त लेझीम या खेळाचा विश्वविक्रम प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर शिवाजी क्रीडांगणावर नोंदविण्यात आला. या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्याचा बहुमान हजारो सांगलीकरांना लाभला.

कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा

येथे २६ जानेवारीनिमित्त कोल्हापुरात रंगल्या रिक्षा सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेत अस्लम कमरुद्दीन शेख (सदर बझार) यांच्या रिक्षाने नवीन गट (एम.एच.०९-जे-७२८६) प्रथम क्रमांक पटकावून ७७७७ रुपये व ट्रॉफी पटकावली.

पंढरपूरच्या नाटय़ संमेलनापासून राष्ट्रवादीची स्थानिक मंडळी दूर

पंढरपुरात येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीने २५ लाख तर विविध संस्थांकडून ७५ लाख असा मिळून एक कोटीचा निधी जमा झाला आहे.

दोन लाखांचा पंढरपुरी बैल आणि तीन लाखांचा मकाऊ पोपट

तीन लाख रुपये किमतीचा आफ्रिकन जातीचा मकाऊ पोपट, चॉकलेट चाखणारी अन् थम्सअप पिणारी म्हैस, किमतीच्या बाबतीत नॅनोला मागे टाकणारा दोन लाख रुपये किमतीचा पंढरपुरी बैल, १३०० किलोचा वळू, ८० किलोचा बकरा, दिवसाला ३६ लिटर दूध देणारी गाय अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे येथे आयोजित केलेले भीमा कृषी प्रदर्शन गाजले.

‘मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे’

शाळाबाह्य़ मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, त्यात यश आले तरच राज्य सरकारने ‘लेक वाचवा’ हे अभियान राबवले ते पुर्ण होईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी चांदे येथे बोलताना केले.

ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनाला दोन तास विलंब

ग्रामसेवकास अद्दल घडवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाने राष्ट्रध्वज लपवून ठेवल्याने तालुक्यातील बाबुर्डी येथे चक्क पावणेदहा वाजता प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण झाले. राष्ट्रध्वज न सांभाळल्याबद्दल ग्रामसेवक तसेच तो लपवून ध्वजारोहणास उशीर केल्याबद्दल प्राथमिक शिक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

दस्तऐवज लवकरच संगणकीकृत- थोरात

माहिती व तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने महसूल खात्यात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल विभागाकडील सर्वप्रकारच्या दस्तऐवजांच्या नोंदी यापुढे संगणकावरच दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.

राजळे यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

माजी आमदार राजीव राजळे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे संकेत देऊन अप्रत्यक्षपणे प्रचाराचेच रणशिंग फुंकले. विचारांच्या आधारावर ही लढाई करणार असून, उपमुख्यंमत्री अजित पवार यांचा हवाला देऊन पक्षाच्या उमेदवारीबाबत आपण निश्चिंत आहोत असे ते म्हणाले.

अंगणवाडय़ांमध्ये ‘फॅब्रिकेटेड’ राजकारण?

सध्या जिल्हा परिषदेत प्री फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांचा विषय वादग्रस्त बनवला गेला आहे. या बांधकामांच्या दर्जावरून, त्या योग्य की अयोग्य याचा असा दावा करणा-या सदस्यांचे सरळ दोन गट पडले आहेत.

रिपाइं, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सांगलीत मारामारी, पाच जखमी

महापालिका निवडणुकीच्या राजकीय कारणातून मिरजेच्या भीमनगर परिसरात रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका महिलेसह पाच जण जखमी झाले असून मिरज शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सपाटे-कोठे संघर्ष अन् पोलीस ठाण्यात समझोता

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कोठे-सपाटे यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी कोठे समर्थक नगरसेवक चेतन नरोटे व सपाटे समर्थक राष्ट्रवादीचे नगरसेवक पद्माकर काळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मध्यस्थी केली.

सोलापुरात ठिबक सिंचनाची गती १५ टक्क्य़ांवरच

मागील सलग दोन वर्षे दुष्काळाचे संकट झेलणा-या सोलापूर जिल्ह्य़ामध्ये राज्यात सर्वाधिक २९ साखर कारखाने असून त्यामुळे आपसूकच उसाचे क्षेत्रही जास्त प्रमाणात आहे.

ज्योतिप्रिया सिंग यांचा कोल्हापुरात निषेध

‘कोल्हापूरचे पत्रकार विकाऊ आहेत, पैसे घेऊन ते बातम्या प्रसिद्ध करतात’ असे विधान करणाऱ्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांचा शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या बैठकीत निषेध नोंदविण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी ज्योतिप्रिया सिंग यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

‘सीड आयटीआयडल’ उपक्रमाने राज्याच्या सीमा ओलांडल्या

माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात विद्यार्थ्यांमधील संगणकीय कौशल्याची कसोटी घेणा-या ‘सीड आयटीआयडल’ चा उपक्रम यंदा महाराष्ट्राची सीमा ओलांडून नवी दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यातही पोहोचणार आहे.

रेल्वेची तार चोरणा-या तिघांना अटक

रेल्वेच्या मालकीची लाखो रुपयांची तांब्याची तार (ओव्हरहेड केबल) चोरी करणाऱ्या व दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघा अट्टल गुन्हेगारांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिका-यांनी अटक केली. त्यांना आज नाशिकच्या कारागृहात पाठविण्यात आले.

Just Now!
X