06 August 2020

News Flash

Ishita

सोलापूर शहरात दूषित पाणीपुरवठा; आयुक्तां कडून अधिका-यांची खरडपट्टी

शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अशुध्द पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सोरेगाव जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली व तेथील निष्क्रिय अधिका-यांची ‘बिनपाण्याने खरडपट्टी’ काढली.

अंगणवाडी सेविकांचा लाटणे मोर्चा

अंगणवाडी सेविकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढला. आंदोलकांनी जोरदार निदर्शने करीत मागण्यांची पूर्तता व्हावी असा नारा दिला. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवा

सोलापूर जिल्हय़ासह आसपासच्या दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशिवाय दुसरा पर्याय नाही. या न्याय्य प्रकल्पाची पूर्तता होण्यासाठी प्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागेल.

भाजपतही रस्सीखेच चाचपणीसाठी तावडे, फडके येणार?

लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले वर्षभर राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा सुरू असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातही या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

पाणी योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करा

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठय़ास महापौर संग्राम जगताप यांनी महावितरणला जबाबदार धरले आहे. पाणी योजनेच्या वीजपुरवठय़ात प्रभावी सुधारणा करण्याची त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

नाटय़ परिषद शाखेच्या अध्यक्षपदी लोटके

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नगर शाखेच्या अध्यक्षपदी पुन्हा सतीश लोटके यांची निवड करण्यात आली. प्रमुख कार्यवाहपदी प्रसाद बेडेकर व कोषाध्यक्षपदी अमोल खोले यांची निवड करण्यात आली.

पुढच्या आठवडय़ात गाळे सील करणार

वाडिया पार्क क्रीडा संकुलातील वादग्रस्त इमारतींमधील गाळे पुढच्या आठवडय़ातच सील करण्यात येणार आहेत. या नोटिसांची मुदत बुधवारी संपली असली तरी सील ठोकण्याच्या कारवाईस दि. ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने ही कारवाई पुढच्याच महिन्यातच होईल.
वाडिया पार्क क्रीडा संकु

भिंगारमध्ये दोघांच्या आत्महत्या

भिंगारमध्ये वेगवेगळय़ा घटनांमध्ये मंगळवारी एकाच दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटना रात्री उशिरा लक्षात आल्या. पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कोपरगावचे आमदार परदेशी पाहुणे- कोल्हे

पावसाळ्यात नांदुर मधमेश्वर बंधा-यावर जसे परदेशी पक्षी पाहुणे म्हणून आपल्या भागात येतात तसेच येथील आमदाराचे झाले असून, एकदा निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षांनीच येथील मतदारांच्या गाठीभेटीसाठी ते येतात. आम्ही मात्र नित्यनेमाने जनतेची कामे करत असतानाही ते आमच्यावरच टीका करीत आहेत, असा आरोप संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केला.

अजित पवार, आर. आर. पाटलांवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर सडकून टीका करीत शिवसेनेत नव्यानेच दाखल झालेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ‘जुन्या’ जखमांची वेदना बुधवारी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली. भविष्यात आमचे सरकार आलेच, तर गृहमंत्री पाटील यांनाही ‘तसेच’ वागवू, असेही जाधव यांनी सुनावले.

दुस-या पिढीसाठी पुढारी सरसावले

राज्यात संघटनात्मक पातळीवर राहुलबाबांचा चेहरा कार्यकर्त्यांसमोर राहावा, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस पदाधिका-यांची निवडणूक आवर्जून घेतली जात आहे. जिल्हापातळीवर मात्र या निवडणुकीत नेत्यांनी स्वत:च्या वारसांना पद्धतशीर पुढे करण्याचा उद्योग सुरूच ठेवला आहे.

नळदुर्गसह अणदूर, जळकोटला ‘बंद’

ध्वज फाडून त्याची विटंबना केल्याप्रकरणी समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी तसेच घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारलेल्या नळदुर्ग शहर बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळकोट व अणदूर येथेही बुधवारी ‘बंद’ पाळण्यात आला.

‘लोकांचे प्रश्न सोडविण्यास राजकीय पक्षांनी एकत्र यावे’

राजकीय पक्षांनी एकमेकांचे शत्रू असू नये, तर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी एकत्र यावे, असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे सांगितले.

जालन्यातील निवडणूक आघाडीस सोपी- डोंगरे

जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

तेरा निरीक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव

गेली अनेक वर्षे येथे तळ ठोकून असलेल्या १३ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अपघातानंतर टेम्पो विहिरीत कोसळून १ ठार, ३ जखमी

मालमोटारीला चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याजवळील विहिरीत हे वाहन (छोटा हत्ती) कोसळून झालेल्या अपघातात एक ठार, तर तिघे जखमी झाले. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. गजानन बांगर असे मृताचे नाव आहे.

वाढोण्यातील ‘त्या’ मूक बधिर विद्यालयाची मान्यता अखेर रद्द

सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील शरदचंद्र पवार मूकबधिर मतिमंद विद्यालयात मुलीवर तिघांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाने या विद्यालयाची मान्यता रद्द करून येथील विद्यार्थ्यांचा इतर शाळेत समावेश करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

विकृत पवारच्या फाशीत पत्नीची साक्ष महत्त्वपूर्ण

अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण खून करणाऱ्या अनिल जगन्नाथ पवार (वय ४५) याला श्रीरामपूर येथील जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

मिरजेतील नाटय़गृह अद्याप बालगंधर्वाच्या पुतळय़ाच्या प्रतीक्षेत

ज्या भूमीत बालगंधर्वानी आपल्या अभिनयाचे पहिले पाऊल टाकत रंगभूमीवर पदार्पण केले त्याच्या स्मतिप्रित्यर्थ सांगली महापालिकेने मिरजेत बालगंधर्व नाटय़गृह उभारले, पण गेली ६ वष्रे हे नाटय़गृह बालगंधर्वाच्या पुतळय़ाच्या प्रतिक्षेत आहे.

‘आयआरबी’ कर्मचा-यांना मारहाण; ९ नगरसेवकांविरुद्ध गुन्हा, अटक

जमावबंदीचा आदेश झुगारून आयआरबी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ९ नगरसेवकांविरुद्ध गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यापकी ८ नगरसेवकांना आज गांधीनगर पोलिसांनी आज अटक केली.

टोलविरोधी कृती समितीचा सांगलीत दशक्रियाविधी

सांगलवाडी जवळील बायपास पुलासाठी आकारण्यात येणारा टोल रद्द व्हावा, यासाठी मंगळवारी टोलविरोधी कृती समितीने दशक्रियाविधी करुन आपला रोष व्यक्त केला.

तासवडे टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन

पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराडनजीकच्या तासवडे टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडताना, वाहनधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या दुपटीने पोलीस बंदोबस्त तैनात होता.

सोलापूरचे वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा घसरल्याने रुग्णसेवेवर परिणाम

वैद्यकीय शिक्षणासाठी एकेकाळी लौकिकप्राप्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था गेल्या काही वर्षांपासून केविलवाण्या रुग्णासारखी झाली असून, त्याकडे दुर्लक्ष झाल्यास येत्या काही काळात या वैद्यकीय महाविद्यालयाचा लौकिक राज्यात सर्वात ‘शेवटून पहिला’ म्हणून ओळखले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

मनपा कारभारावर लोकलेखा समितीचे ताशेरे

विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने महापालिकेच्या विकासकामांबद्दल असमाधान व्यक्त केले. मनपाच्या विकासकामांची गती मंदावलेली आहे, वेळोवेळी निदर्शनास आणूनही ताळेबंद वेळेत सादर केलेला नाही, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (फेज १ व २), डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना व रमाई आवास योजना राबवण्यातही दिरंगाई झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे.

Just Now!
X