06 August 2020

News Flash

Ishita

शहर स्वच्छतेसाठी महापालिकेचा आराखडा

शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी आराखडा तयार करून त्याची सोमवारपासून (दि. २७) त्याची अंमलबजावणी करावी तसेच स्वच्छतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘टिम वर्क’ पद्धतीने काम करावे, अशी सूचना महापौर संग्राम जगताप यांनी केली.

प्रत्येक तहसीलमध्ये १ फेब्रुवारीपासून मतदार मदत केंद्रे

मतदारांना माहिती देण्यासाठी १ फेब्रुवारीपासून प्रत्येक तहसील कार्यालयात ‘मतदार मदत केंद्रे’ कायान्वित केले जाणार असून ते आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहतील.

सावकारी कायद्यातील सुधारणांचे रविवारी होणा-या ग्रामसभेत वाचन

सावकारी कायद्यात महाराष्ट्र सरकारने केलेल्या सुधारणांबद्दल प्रजासत्ताकदिनी (दि. २६, रविवारी) होणा-या ग्रामसभेत जनजागृती केली जाणार आहे, त्यासाठी या कायद्याची व त्यात केलेल्या बदलांचे ग्रामसभेत वाचन करून चर्चा घडवली जाणार आहे. ग्रामसभेत या कायद्याची माहिती देण्यासाठी सहकार खात्याने जिल्हय़ात १ हजार ३१६ क्षेत्रीय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शिर्डीमध्ये लवकरच मीटरने २४ तास पाणीपुरवठा-विखे

शिर्डीकरांना लवकरच मीटरने, १ पैसा प्रतिलीटर दराने २४ तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

टोलनाके जाळपोळीकडे दुर्लक्ष; पोलीस अधिका-यांचे निलंबन

टोलनाके जाळपोळीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार व शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांना पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी गुरुवारी निलंबित केले.

अकोले, कोपरगावला गारपिटीचा तडाखा

थंडी परतीच्या मार्गावर असतानाच जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात गुरुवारी सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. अकोले, कोपरगावला जोरदार गारपीट झाली, तर संगमनेर व कोपरगाव तालुक्यात वादळी वा-यासह सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला.

अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या बदलीविरोधात कोल्हापुरात आंदोलन

कोणाचाही दबाव न घेता निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची नागपूर येथे तातडीने बदली झाल्याने बदलीविरोधात सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांच्यातून आवाज उमटू लागला आहे.

मुलीला विहिरीत ढकलून बिबटय़ाचा बनाव

तालुक्यातील देवगाव येथील आठ दिवसांच्या बालिकेला बिबटय़ाने पळवून नेल्याचा बनाव अखेर उघड झाला. पहिल्या तीनही मुली असल्याने पुन्हा चौथी मुलगीच झाली, तीही संक्रांतीच्या दिवशीच जन्मली.

कोठे-सपाटे संघर्ष पोलीस ठाण्यात

प्रभागात मोठय़ा आकाराची नवीन जलवाहिनी जोडून पाणी पळविण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून महापालिका सभागृहनेते महेश कोठे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर सपाटे यांच्यातील संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अज्ञातांकडून अपहरण

पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथून प्रशांत विनायक साळुंखे (१८) या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले असून हे अपहरण नेमके कोणी व कशासाठी केले, याचा उलगडा झाला नाही. यासंदर्भात पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सांगलीवाडी टोल बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय

सांगलीवाडी येथील टोल हटविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने कृती समितीने टोल बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हातकणंगले’तून निवडणूक लढविणार- रघुनाथ पाटील

आम आदमीने संधी दिली तर लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बठकीत सांगितले.

अंगणवाडी कर्मचा-यांचे साखळी उपोषण मागे, संप मात्र सुरूच

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान एक लाख रुपये निवृत्ती मानधन तसेच मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिले आहे.

शिक्षकेतरांचे पुण्यात धरणे आंदोलन

राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणास विरोध करण्यासाठी येत्या सोमवारी (दि. २७) सकाळी १० वाजता पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर शिक्षकेतर कर्मचारी धरणे धरणार असल्याची माहिती शिक्षकेतर संघटनेचे राहुरी तालुकाध्यक्ष निवृत्ती लोखंडे यांनी दिली आहे.

फसवून उकळलेले ७५ हजार परत मिळाले

मोठय़ा रकमेच्या बक्षिसाच्या लालसेने गेलेले ७५ हजार रुपये बँकेच्या शाखाधिका-याच्या प्रसंगावधानामुळे ग्राहकाला पुन्हा मिळाले. फसवणूक झाल्यानंतरही वेळीच पावले उचलल्याने गेलेले पैसे पुन्हा मिळवता आले.

क्लेरा ब्रुस जागेच्या हस्तांतरणास विरोध

क्लेरा ब्रुस शाळेचे मैदान व या परिसराची मालमत्ता बांधकाम व्यावसायिक शरदमुथा व धारीवाल यांना ताब्यात घेऊन देऊ नये, त्यांना मज्जाव करावा या मागणीसाठी जिल्हा प्रेईस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन समाजाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जोरदार निदर्शने केली.

गाळेधारकांच्या याचिकेवर खंडपीठात आज सुनावणी

वाडिया पार्क क्रीडा संकुलातील गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या (शुक्रवार) होणार आहे.

टोल विरोधात आज सांगली बंदची हाक

सांगलीवाडी येथील टोलचे भूत गाडण्यासाठी कृती समितीने बुधवारी सांगली बंदची हाक दिली असून दुसऱ्या दिवशीही ठेकेदाराची टोल वसुली बंद राहिली.

सोलापुरात लवकरच २० व्हॉल्व्होंसह दोनशे बसेस सेवेसाठी दाखल होणार

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी विकास पुनरुत्थान महाअभियानांतर्गत ५० टक्के अनुदानावर सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमासाठी दोनशे बसेस यापूर्वीच मंजूर झाल्या असून, या बसेस खरेदीसाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.

‘म्हैसाळ’चे पाणी उद्यापासून बंद

राजकीय नेत्यांच्या आवाहनामुळे सुरू करण्यात आलेले म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीअभावी २३ जानेवारीपासून बंद करण्यात येत आहे. लाभक्षेत्रातील २५ हजार हेक्टरची मागणी अपेक्षित धरून २ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले पाणी अवघ्या ३०० हेक्टर क्षेत्राची मागणी झाल्याने बंद करण्यात येत आहे.

निवासी डॉक्टरविरुद्ध कारवाईसाठी सोलापुरात तरुणीचा आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात प्रसूतिसाठी आलेल्या महिलेवर उपचार होण्यासाठी मदत नाकारल्याच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण वायकर व अन्य दोघे पोलीस निलंबित झाले व त्यांना दहा दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले.

पानिपत रण संग्रामाच्या २५४ व्या स्मृतिदिनी वीरांना आदरांजली

मराठय़ांच्या शौर्य व त्यागाच्या समजल्या जाणा-या पानिपत रणसंग्रामाचा २५४ वा स्मृतिदिन पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे सिदोजीराव नाईक-निंबाळकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाळण्यात आला.

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरास सव्वा कोटींचे गुप्तदान

अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिराला तिघा अज्ञात तरण भक्तांनी तब्बल एक कोटी १७ लाखांचे गुप्तदान केले. मंदिराच्या दानपेटीत एवढे मोठे घसघशीत गुप्तदान टाकल्यानंतर हे तिघेही भक्त एका क्षणात निघून गेले. मंदिराच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे गुप्तदान मिळाल्याचे सांगण्यात आले.

खुर्ची रस्त्यावर ठेवून सभापतींचा निषेध

अंगणवाडी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत अकोल्याच्या सभापतींनी केलेल्या कथित हेटाळणीयुक्त वक्तव्याचा मार्क्‍सवादी किसान सभेने निषेध केला आहे. सभापतींची खुर्ची रस्त्यावर आणत खुर्चीभोवती निषेधाच्या घोषणा देत या वक्तव्याचा आंदोलकांनी धिक्कार केला.

Just Now!
X