06 August 2020

News Flash

Ishita

विचारांची चळवळ व्यापक व्हावी- डाॅ. तांबे

संगमनेरच्या कवी अनंत फंदी यांचे नाव राज्यभरातील साहित्यिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम येथील पुरस्कार सोहळ्यातून होते. इतिहास संशोधन मंडळाने सुरू केलेली विचारांची ही चळवळ यापुढे अधिक व्यापक व्हायला हवी, अशी अपेक्षा आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

अल्पसंख्याक दर्जाचे जैन समाजाकडून स्वागत!

जैन समाजाला केंद्र सरकारने अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे शहरातील जैन समाजाने जोरदार स्वागत केले. शहरातील विविध जैन संघटनांनी पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला.

नगरच्या चौघांना ब्राँझपदके

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघांनी तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझपदक जिंकले.

भारिपच्या बंदला मोठा प्रतिसाद

गावठी कट्टय़ातून सराफावर गोळीबार व एकाच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासाला गती नसल्याच्या निषेधार्थ भारतीय रिपब्लिकन पक्षाने मंगळवारी कर्जत बंदचे आवाहन करून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

रस्त्यांची ‘वाट’ लागली तरीही सोलापूरकर निमूटपणे टोल भरतात

सोलापूर शहरात दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत खासगी तत्त्वावर सुमारे ९० कोटी खर्च करून उभारल्या गेलेल्या रस्त्यांचा दर्जा सुरूवातीपासूनच निकृष्ट असूनदेखील या खराब रस्त्यांपोटी सोलापूरकर मागील सात वर्षांपासून निमूटपणे टोल भरत आहेत.

राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप करणा-यांच्या गाडय़ा फोडा

‘तोडा, फोडा’ ही आमची संस्कृती नाही; पण अलीकडे कोणीही उठतो आणि राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप करतो. आता हे आरोप सहन करू नका. राष्ट्रवादी नेत्यांवर आरोप करणा-यांच्या गाडय़ा फोडा,’ असा आदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांनी ज्येष्ठ मंत्र्यांसमोरच झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोलवसुली बंद पाडली

सांगली-इस्लामपूर रस्त्यावरील टोलबाबतचा सोमवारच्या बठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. तथापि सोमवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करीत सुरू असणारी टोलवसुली बंद पाडली.

पोलीस निरीक्षक वायकरसह तिघा पोलिसांना अखेर जामीन

छत्रपती शिवाजी शासकीय सर्वेापचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्हय़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांनी अखेर सशर्त जामीन मंजूर केला. गेल्या १२ जानेवारीपासून हे तिघे जण न्यायालयीन कोठडीत होते.

एएमटी बंद पडू देणार नाही- महापौर

आर्थिक अडचणी असल्या तरी शहर बस वाहतूक सेवा (एएमटी) बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही महापौर संग्राम जगताप यांनी सोमवारी दिली. महापालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार कंपनीलाही त्यादृष्टीने सूचना केल्या.

थेट जलवाहिनी योजनेसाठी ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’

थेट पाइपलाइन पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार झाले पाहिजे. हा प्रकल्प राबवताना पारदर्शकता दाखवली पाहिजे. शहरातील तज्ज्ञांची मते आणि सल्ले संबंधितांनी जाणून घेतले पाहिजेत, यासाठीच ‘कोल्हापूर कॉलिंग फोरम’ची स्थापना येत्या प्रजासत्ताकदिनी केली जाणार आहे.

साईभक्तांना २०४ दिवस मोफत प्रसाद भोजन

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साई प्रसादालयात दानशूरांकडून भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन देण्याची योजना सुरू केलेली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २०४ दिवस भक्तांना या योजनेचा लाभ झाल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी अजय मोरे यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयाचे जि.प. सभेत धिंडवडे

जिल्हा सरकारी रुग्णालयातील गैरकारभाराची जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी चिरफाड करत अक्षरश: धिंडवडे काढले. रुग्णालयातील डॉक्टर खासगी रुग्णालयांचे ‘एजंट’ असल्याचा व ते ‘कट प्रॅक्टिस’ करत असल्याचा गंभीर आरोपही सदस्यांनी केला.

वयाच्या ‘साठी’चे स्वागत आठ तासांच्या जलतरणाने

वयाची साठी हे खरंतर निवृत्तीचेच वय. एका अर्थाने निवांत जीवनाची सुरुवात. मात्र हेच वय गाठताना येथील एका उद्योजकाने त्याच्या या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग आठ तास पोहण्याचा संकल्प करून नव्या पिढीला ‘साठी’चा आगळा संदेश दिला आहे.

प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांसाठी चौकशी समिती

सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून जिल्हा परिषद उभारत असलेल्या ४९८ प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांच्या कामाची चौकशी ज्येष्ठ सदस्यांच्या समितीमार्फत करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

पुढील काळातही अराजकीय पद्धतीनेच आंदोलने- हजारे

ज्यांना जायचे असेल ते जाऊ शकतात, या पुढील काळातही आपले आंदोलन अराजकीय पद्घतीनेच सुरूच राहील, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या रविवारी राळेगणसिद्घीत पार पडलेल्या बैठकीत स्पष्ट केले.

महानाटय़ ‘शिवगर्जना’चे कोल्हापुरात ७ पासून प्रयोग

शिवरायांचा निखळ इतिहास, रोमांचकारी प्रसंग, चित्तथरारक लढाया, लोककला आणि लोकनृत्य यांचा सुरेख संगम अशा वैशिष्टय़ांनी युक्त असे ‘शिवगर्जना’ या शिवरायांच्या जीवनावरील महानाटय़ाची निर्मिती करवीरनगरीत झाली आहे.

तरुणाचा खून

शनिवारी मध्यरात्री महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा सांगलीतील माळी चित्र मंदिरानजीक चाकूने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी त्याच्या तीन मित्रांना खुनाच्या घटनेनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी अटक केली.

तीन रिव्हॉल्व्हर जप्त

कर्नाटकातून गावठी रिव्हॉल्व्हर आणून विक्री करणाऱ्यास सांगली पोलिसांनी अटक करून तीन रिव्हॉल्व्हर जप्त केली आहेत. या रिव्हॉल्व्हरच्या खरेदी-विक्रीमध्ये असणाऱ्या सात जणांना रविवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी पत्रकार बठकीत दिली.

अभिरूप न्यायालय स्पर्धेतून चांगले कायदेतज्ज्ञ घडतील- न्या. पळशीकर

वकिलांचे करीअर सुरू करण्यासाठी अभिरूप न्यायालय स्पर्धा ही पहिली प्रमुख पायरी आहे. त्यातून चांगले कायदेतज्ज्ञ घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश व्ही. जी. पळशीकर यांनी केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत शाहू स्मारक भवन येथे छायाचित्र व माहिती प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

सांगली आयुक्तपदी अजिज कारचे

सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी अजिज कारचे यांची नियुक्ती झाली असून गेले साडेचार महिने प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिका-यांकडे कार्यभार होता.

‘थेट पाइपलाइन योजनेचा रस्ते प्रकल्प होऊ देऊ नका’

‘थेट पाइपलाइन योजनेचा रस्ते प्रकल्प होऊ देऊ नका’ हा संदेश देत यंदाची १८वी शाहू मॅरेथॉन १६ फेब्रुवारी रोजी धावणार आहे. एकूण १४ गटांत ही स्पर्धा घेतली जाणार असून, स्पध्रेतील विजेत्यांना १ लाख १० हजाराचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी रविवारी दिली.

हल्ला करून सराफ व्यावसायिकास लुटण्याचा प्रयत्न

सराफी व्यवसाय करणाऱ्या पितापुत्रावर हल्ला करून त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने लुबाडण्याचा प्रयत्न फसला. हल्ल्यात पितापुत्र गंभीर जखमी झाले.

आम आदमी पार्टी ठरवणार आरक्षणाचे नवे धोरण-अंजली दमानिया

मागासवर्गीयांना आयुष्यात एकदा आरक्षण मिळायला हवे. एकाच व्यक्तीला वारंवार आरक्षण द्यावे की नाही या विषयी पक्षाच्या स्तरावर धोरण ठरत आहे. मात्र, जातनिहाय आरक्षणाऐवजी आम्ही माणूस म्हणून प्रत्येकाला वागवू. आरक्षणाच्या अनुषंगाने पक्षाचे स्वतंत्र असे धोरण असेल, अशी माहिती आम आदमी पार्टीच्या समन्वयक अंजली दमानिया यांनी दिली.

Just Now!
X