06 August 2020

News Flash

Ishita

भाव गडगडले; शेतक-यांवर संक्रांत!

गतवर्षी पाणीटंचाईने त्रस्त असलेला शेतकरी या हंगामात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे उत्पादन घेऊन आपली विस्कटलेली आíथक घडी बसविण्याच्या मार्गावर असताना फळभाज्या आणि पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत.

आमदार बोर्डीकरांवर गुन्हा दाखल

मोर्चादरम्यान केलेल्या भाषणात पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक कार्यालय जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या गाफीलपणाबाबत नाराजी

नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच चोरटय़ांनी छोटय़ा चो-यांसह जबरी चोऱ्या करत दहशत निर्माण केली आहे. परळीत पत्रकाराचे घर फोडून साडेचार लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना ताजी असतानाच सोन्याचे व्यापारी वाकेकर यांच्या घरातून ३२ लाखांचा ऐवज पळवला.

पैनगंगा भूसंपादन घोटाळय़ातील अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे नव्याने निर्देश

नियोजित निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या (चिमटा धरण) भूसंपादनाच्या प्रक्रियेदरम्यान जलसंपदा व महसूल खात्याच्या अधिकारी-कर्मचा-यांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे का दाखल झाले नाहीत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेड जिल्हा प्रशासनाला उद्देशून केली आहे.

शेतक-यांनी साखर उद्योगाचे अर्थकारण समजून घ्यावे

महाराष्ट्रसह देशात होणा-या विक्रमी ऊस उत्पादनाचा विचार करता, केवळ साखर उत्पादन न करता, कच्ची साखर व इथेनॉल निर्माण झाले पाहिजे.

पोलीस निरीक्षक वायकरसह तिघा पोलिसांच्या कोठडीत वाढ

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरूण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांना शुक्रवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास अधिका-यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीकांत भोसले यांच्यासमोर हजर केले असता या तिघा पोलिसांना २७ जानेवारीपर्यंत वाढीव न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

शाळेतच गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या

शाळेच्या कार्यालयातच शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रकार तालुक्यातील महादेव मळा (वडगावपान) येथील शाळेत घडला. अरुण रामचंद्र हांडे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

सांगलीत वटवाघळांनी केल्या द्राक्षबागा फस्त

बदलत्या हवामानामुळे सातत्याने रोगाच्या आहारी जाणारे द्राक्षपीक कसेतरी पक्वतेपर्यंत पोहोचविणा-या कष्टाळू शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांवर सध्या वटवाघळांनी हल्ला चढविला असून या निशाचर पक्षाच्या तावडीतून द्राक्षांचे संरक्षण कसे करावे याच चिंतेत द्राक्ष बागायतदार आहेत.

सांगली जिल्हय़ातील दोनशे पवनचक्क्या बंद

विजेची उपलब्धता कमी असतानाही सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात उभारण्यात आलेल्या सुमारे दोनशे पवनचक्क्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेली दीड महिन्यापासून बंद आहेत.

फडणवीस यांची हजारे यांच्याशी भेट

राज्य सरकार कोडगे असल्यानेच सर्वसामान्यांच्या हिताचे कायदे करण्यास उदासीन असल्याचे सांगत प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदे होण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

जिल्हय़ासाठी २६३ कोटींचे अंदाजपत्रक

पुढील वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनांचे एकूण २६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अर्थ खात्याकडे पाठवण्यात आले आहे. यंदाच्या आराखडय़ातील ५७ कोटी ९४ लाख रुपये खर्चाच्या पुनर्विनियोजनास जिल्हा नियोजन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी ही माहिती दिली.

नगरसेविका भोसले यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

शहरातील प्रभाग १५ अ (अनुसूचित जमाती महिला) या राखीव जागेवरून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार अनिता गोरक्षनाथ भोसले यांची निवड रद्द ठरवावी या मागणीसाठी पराभूत उमेदवार किरण दयानंद उनवणे यांनी येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे.

जि. प. यंत्रणेवर आमदारांचा संताप

जिल्हा नियोजन समितीने गेल्या चार वर्षांत (सन २००८-०९ ते २०११-१२) जिल्हा परिषदेला दिलेल्या निधीतील १८ कोटी ३० लाख रुपये अखर्चित राहिल्याने तो परत सरकारकडे जमा करण्याच्या कारणावरून समितीच्या सभेत आज जि.प. यंत्रणा विरुद्ध आमदार यांच्यात पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या साक्षीने वाद रंगला.

नगरकरांनी उड्डाणपूल आता विसरणेच इष्ट…

भूमिपूजन झालेल्या, शहरातील उड्डाणपुलाच्या प्रश्नावर नगरकरांच्या पदरी निराशाच पडली आहे. नजीकच्या काळात हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता नसल्याचे आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेतील चर्चेवरून व पालकमंत्री मधुकर पिचड यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले.

अंगणवाडी सेविकांची जोरदार निदर्शने

गेल्या बारा दिवसांपासून संपावर असलेल्या जिल्हय़ातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शुक्रवारी नगरला जिल्हा परिषदेवर मोर्चा नेऊन जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात या कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जि.प.चे आवार दणाणून सोडले.

रस्त्यांचे पुनर्मूल्यांकन मगच परतफेड

अंतर्गत रस्ते प्रकल्पातील रस्त्यांचे पुनर्मूल्यांकन राज्य शासनाने तज्ज्ञांची समिती नियुक्त करून महिन्याभरात पूर्ण करावेत. त्यानंतर प्रकल्पाच्या किमतीची परतफेड कशी करावी याबाबत महापालिकेने नगरविकास विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याबरोबर चर्चा करून शासन मान्यतेने निर्णय घ्यावा, असा ठराव गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला

मांढरदेव यात्रेस तीन लाख भाविकांची उपस्थिती

‘काळूबाईच्या नावाने चांगभले’च्या जयघोषात मांढरदेव येथील काळूबाईच्या यात्रेत मोठय़ा उत्साहात किमान तीन लाख भाविकांनी आज देवीचे दर्शन घेतले. यात्राकाळातील अनिष्ट रूढी व प्रथा रोखण्यासाठी प्रशासनाने खंबीर पाऊल उचलले आहे.

सांगली महापालिकेचा कारभार प्रभारी खांद्यावर

सांगली महापालिकेची एकहाती सत्ता घेणा-या काँग्रेसला गेल्या सहा महिन्यांपासून आयुक्तांसह विविध वरिष्ठ रिक्त पदांसाठी अधिकारी मिळत नसल्याने प्रभारी अधिका-यांवर उधारीचा कारभार करावा लागत आहे.

सोलापुरात सिद्धेश्वर यात्रेत जनावरांचा बाजार फुलला…

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने विजापूर रस्त्यावर रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे १५ हजार जनावरे दाखल झाली असून, यात खिलार गाय-बैलांसह मुरा, गवळार जातीच्या म्हशी तसेच घोडे यांचा समावेश आहे.

साडेचार लाख बालकांचे नियोजन

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्य़ात दि. १९ व दि. २३ जानेवारी अशी दोन दिवस राबवली जाणार आहे. मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या एकूण ४ लाख ५७ हजार ५९१ बालाकांना डोस पाजण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली.

थत्ते मैदानातील ३८ गुंठा मूळ मालकाला

शहरातील बहुचर्चित थत्ते मैदानाच्या मूळ मालकाला ३८ गुंठे जागा देऊन उर्वरित सुमारे अडीच एकर जागा नगरपालिकेच्या नावे हस्तांतरित करण्याचा ठराव पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला.

उर्दू मुशायरा व कव्वाली मैफलींमध्ये सुशीलकुमारांच्या रसिकतेचे दर्शन…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मागील महिन्यापासून सोलापूर मतदारसंघातील संपर्क वाढविला असून, या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केल्याचे मानले जात आहे.

नगर केंद्रात १२५ पैकी तिघेच उत्तीर्ण

सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटंट (सीए) परीक्षेत नगरचा टक्का यंदा कमालीचा घसरला. अंतिम परीक्षेत नगर केंद्राचा निकाल जेमतेम दोन टक्क्यांवर लागला. १२५ पैकी अवघे ३ विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रवेश परीक्षेचा निकाल २५ टक्के लागला.

शालेय रिक्षाचालकांचा संप मागे

जिल्हा शालेय वाहतूक रिक्षा कृती समितीने गेल्या चार दिवसांपासून पुकारलेला संप गुरुवारी मागे घेतला. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत परवा (शनिवार) होणा-या जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या सभेत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Just Now!
X