22 September 2020

News Flash

Ishita

रातराणीचा प्रवास स्वस्त

एरवी केवळ भाववाढीची घोषणा करणा-या एसटी महामंडळाने रातराणीचे भाडे कमी करून मकरसंक्रांतीची प्रवाशांना सुखद भेट दिली आहे. संक्रांतपूर्व मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणीही करण्यात आली.

श्रीरामपूरला व्यापा-यांचा आज मोर्चा

उद्योगपती शैलेश बाबरिया यांचा दोष नसताना गुन्ह्यात अडकवण्यात आले. त्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवार) दुपारी १२ वाजता व्यापारी संघटनेने निषेध सभेचे आयोजन केले असून, मोर्चाने जाऊन पोलीस अधिका-यांना निवेदन देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

टायरवालेंसह ८७ जणांची निर्दोष मुक्तता

नेवासे येथे तेरा वर्षांपूर्वी झालेल्या शिवजयंतीच्या दंगलीतील सर्व ८७ आरोपींची श्रीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

संक्रांतीच्या पतंगबाजीला नगर शहरात तरुणाच्या मृत्यूचे गालबोट लागले. पतंग उडवताना चौथ्या मजल्याच्या गच्चीवरून पडून हा तरुण मरण पावला. कोपरगाव येथे पतंगाच्या मांज्याने एका छोटय़ा मुलीचा गळा कापल्याने ती गंभीर जखमी आहे.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर यात्रेचा अक्षता सोहळा

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी उशिरा सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साही आणि मंगलमय वातावरणात नंदीध्वजांचा ‘अक्षता सोहळा’ पार पडला.

खंडोबा-म्हाळसाचा विवाह उत्साहात

बहुजन आणि कष्टकरी समाजातील लाखो भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पाली येथील मल्हारी म्हाळसाकांत खंडोबादेवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस वऱ्हाडी मंडळींच्या तोबा गर्दीने उदंड उत्साहात पार पडला.

पोलीस निरीक्षक वायकरसह तिघा पोलिसांना कोठडी

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण केल्याच्या गुन्ह्य़ात अडकलेले पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्यासह तिघा पोलिसांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागात स्वत:हून शरणागती पत्करली.

शहरात सार्वजनिक वाहकतुकीचे तीन तेरा

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारताच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन तसेच अ‍ॅपे रिक्षा (तीनआसनी) चालकांनी स्वतंत्रपणे आजपासून बंद पुकारला आहे.

श्रीगोंदे नगरपालिकेत राष्ट्रवादीला बहुमत

जिल्हय़ाचे लक्ष लागलेल्या श्रीगोंदे नगरपालिकेवर अखेर राष्ट्रवादीनेच झेंडा फडकवला. एकसंघ झालेल्या काँग्रेसला माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पुन्हा एकदा पराभूत करताना १९ पैकी १० जागांसह काठावरचे बहुमत मिळवून दिले.

राहुल गांधींच्या नावाची घोषणा करावी

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करावी, यासाठी पक्षाचे नगरमधील कार्यकर्ते, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे आग्रह धरणार आहेत. तशा मागणीचे कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे लेखी निवेदनही सोनिया गांधी यांना दिले जाणार आहे.

बचत गटांना ऊर्जित अवस्था मिळेल?

राज्यात महिला बचतगटांची चळवळ सुरू होऊन तेरा-चौदा वर्षांचा काळ उलटला. केंद्र सरकारने या चळवळीला आंध्र प्रदेशच्या धर्तीवर चालना देऊन, नवे स्वरप देण्यासाठी आता राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान (एनआरएलएम) सुरू केले आहे.

सोलापुरात पाणीदरात ५० टक्के कपात करण्याची बेरियांची मागणी

सोलापूर महानगरपालिकेने शहरवासीयांना वर्षभरात केवळ १२१ दिवस नळ पाणीपुरवठा करून ३६५ दिवसांची वार्षिक पाणीदर वसुली वसूल करणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया यांनी नोंदवत न्यायतत्त्वानुसार पाणीदरात ५० टक्के कपात करण्याची मागणी केली आहे.

पुण्याच्या ‘उलागड्डी’ला ‘महाकरंडक’

शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व महावीर प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा भारती विद्यापीठाच्या (पुणे) ‘उलागड्डी’ या एकांकिकेने जिंकली.

क्रॉम्प्टन ग्रीव्हजची सामाजिक, पर्यावरणात घोडदौड

क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी सामाजिक क्षेत्रात काम करताना पर्यावरण, महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार आहे. कंपनीने अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विविध प्रकारच्या इंधनाची ३० ते ४० टक्के बचत केली आहे. पाणीबचतीसाठी शेततळे व पाऊस पाणी संकलनाचे प्रयोगही राबवले आहेत.

६८ लिंगांच्या तैलाभिषेकाने सिद्धेश्वर यात्रेस उत्साहाने प्रारंभ

सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला रविवारी सकाळी नंदीध्वजांच्या भव्य मिरवणुकीने प्रारंभ झाला. साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेच्या पहिल्या दिवशी, शहराच्या पंचक्रोशीत सिद्धेश्वर महाराजांनी प्रतिष्ठापना केलेल्या ६८ लिंगांना नंदीध्वजांच्या मिरवणुकीद्वारे तैलाभिषेक (यण्णीमज्जन) करण्यात आला.

मांढरदेव यात्रेतील भाविकांना स्वच्छतागृह उपलब्ध करण्याची प्रांताधिका-यांची सूचना

मांढरदेव यात्रेच्या पार्श्र्वभूमीवर येथे उभारण्यात आलेल्या पार्किं ग व प्लाजा इमारतीच्या उद्घाटनाची वाट न पाहता तेथील पाणीपुरवठा जोडून यात्रा काळासाठी भाविकांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची सूचना वाईच्या प्रांताधिका-यांनी व तहसीलदारांनी मांढरदेव ट्रस्ट प्रशासनाला दिल्या आहेत.

कुपोषण निर्मूलनासाठी जागतिक बँकेचा निधी

कुपोषण निर्मूलनासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बळकटीकरणासाठी त्याचबरोबर बालकांच्या आहारातही नावीन्यता निर्माण करण्यासाठी जागतिक बँकेने महाराष्ट्राला निधी देऊ केला आहे.

कर्जतमधील व्यापा-यांचा कडकडीत बंद

गोळीबार करून सराफाला लुटण्याच्या खळबळजनक घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच दरोडेखोरांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज, रविवारी कर्जत शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त बंद पाळला.

सोलापुरात पैगंबर जयंतीच्या शोभायात्रेवर बंधने लादण्याचा प्रयत्न

संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांची जयंती येत्या मंगळवारी, १४ जानेवारी रोजी साजरी होत असून, त्यानिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. परंतु यंदा ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या काळात ही ईद साजरी होत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर पैगंबर जयंती शोभायात्रेवर पोलिसांनी बंधने लादण्याचा सपाटा लावल्यामुळे शोभायात्रा संयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

म्हैसाळ योजनेतील कालव्यातून पाणी चोरी करणा-यांवर फौजदारी कारवाई करणार

म्हैसाळ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील बेकायदेशीर दरवाजे उचलून कळंबी शाखा कालव्यातून पाणी चोरून घेतल्याबद्दल लाभधारकांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असून संबंधित एका उपअभियंत्यासह तेरा अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता एम.एस.धुळे यांनी शनिवारी दिली.

करमाळ्यात विश्वागिरी महाराजांची समाधी ४ वर्षांनी खोदून शवविच्छेदन

परांडा तालक्यातील सोनारी मठाचे मठाधिपती विश्वागिरी महाराज (७०) यांच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूबद्दल तक्रारी प्राप्त झाल्याने त्याची दखल घेत पोलिसांनी करमाळा तालुक्यातील चांदगुडे वस्ती येथील महाराजांची समाधी खोदून महाराजांच्या मृतदेहाचा सांगाडा काढला.

अभिनयाच्या क्षेत्रात श्रद्धा हवी- भरत जाधव

रंगभूमी, चित्रपट किंवा मालिका अशा कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या कलावंतांनी आपल्या कामाशी प्रामणिक राहून, श्रद्धेने काम करावे. व्यावसायिक म्हणून काम करातानाही काहीतरी वेगळे, नवे देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी केले.

सुशीलकुमारांच्या ‘पवारप्रेमा’मागे लोकसभा निवडणुकीचे गणित

काँग्रेसच्या उच्च वर्तुळातील एक समजले जाणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपले 'राजकीय गुरू' शरद पवार हे पंतप्रधान झाल्यास आपणास आनंदच होईल, अशा शब्दांत 'पवारप्रेम'व्यक्त केले व नंतर लगेच घूमजाव केल्याचा वेगवेगळा राजकीय अन्वयार्थ लावला जात आहे. शिंदे यांची ही …

निर्मला गावित- आंदोलकांमध्ये वाद; उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली

टोलविरोधी आंदोलनस्थळी राज्य महिला हक्क व कल्याण समितीच्या अध्यक्ष, आमदार निर्मला गावित व आंदोलक यांच्यात शनिवारी आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून शाब्दिक वादावादी झाली. यामुळे शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले.

Just Now!
X