22 September 2020

News Flash

Ishita

अजित पवार यांची शेट्टींवरही टीका

शेतक-यांच्या नावावर राजकारण करावयाचे व जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करावयाची हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी श्रीगोंदे येथे केली.

दाजीकाकांच्या निधनाने सांगली, कोल्हापुरात हळहळ

सुवर्णकार दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने अडचणींच्या काळी मार्गदर्शनासाठी धावून येणाऱ्या पितृतुल्य मार्गदर्शकास कोल्हापूर, सांगलीचे सुवर्णकार मुकले आहेत, अशा शब्दांत शुक्रवारी सराफांनी दाजीकाकांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

अधिका-यांच्या माफीनंतर प्रशासन, पदाधिकारी वाद संपुष्टात

सांगली महापालिकेतील अधिका-यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत माफी मागितल्यानंतर गेले तीन दिवस सुरू असलेला प्रशासन व पदाधिकारी यांच्यातील संघर्ष संपुष्टात आला.

‘बॉयफ्रेंड’ विकृतीपासून दूर रहा- नीला सत्यनारायण

मुलींची पावले भविष्यातील आदर्शाच्या पाऊलखुणाच असल्याने समाजात वावरताना त्यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकावे. बॉयफ्रेंड ही संस्कृती पुढे विकृत बनत असल्याने त्यापासून दूर राहावे, स्वत:चे जीवन समृद्ध करताना, इतरांचे जीवनही समृद्ध करण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले.

निर्मलग्रामच्या ‘गुडमॉर्निग पथका’ला राष्ट्रवादी युवक अध्यक्षानेच पिटाळले

राज्य शासनाच्या निर्मलग्राम अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी एकीकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी पायात चप्पल घालणे सोडून दिले असताना दुसरीकडे याच स्वच्छता अभियानाला आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा युवक अध्यक्षाने केल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय – मुख्यमंत्री

शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच राहणार

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर झालेली बोलणी फिसकटल्याने अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच राहणार असल्याची माहिती नगर जिल्हा अंगणवाडीसेविका, मदतनीस कर्मचारी युनियनचे सहसचिव जीवन सुरुडे यांनी दिली.

संगमनेरकरांना प्रतीक्षा ‘बायपास’ची खुला होण्याआधीच भरावाला भलेमोठे तडे

संगमनेरचा बायपास कधी खुला होतो याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असतानाच एका पुलाजवळच्या भरावाला उदघाटनाआधीच तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय सुरक्षित प्रवासासाठी अधिक उपाययोजनाही करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पत्नीच्या प्रियकराचा खून; मृतदेह विहिरीत टाकला

पत्नीबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राने दगा दिल्याचा राग मनात धरून त्याचा खून केला व मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याप्रकरणी नामदेव मारूती माने व त्याच्या तीन साथीदारांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरासाठी स्वतंत्र एक्सप्रेस फीडर

सध्या प्रगतिपथावर असलेल्या शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी (फेज २) मुळा धरण ते एमआयडीसीपर्यंत स्वतंत्र एक्सप्रेस फीडर देण्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांनी मान्य केले. त्यासाठी स्वतंत्र दरपत्रक लागू करण्याचेही त्यांनी मान्य केले.

पशुबळी झाल्यास नव्या कायद्यानुसार कारवाई

मांढरदेव यात्रेत पशुबळीस यापूर्वीच बंदी घातलेली असून यंदा होणा-या यात्रेत या बंदीचे उल्लंघन केल्यास नव्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा अपर जिल्हाधिकारी डी. एस. प-हाड यांनी दिला आहे.

सांगली पालिका अधिका-यांचे मदन पाटील यांना साकडे

मुजोर अधिका-यांना वठणीवर आणण्याचा इशारा देताच महापालिकेच्या अधिका-यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या घरी जाऊन संघर्ष मिटवण्याचे साकडे घातले.

सिद्धेश्वर यात्रेला रविवारी प्रारंभ

गेल्या दहा दिवसांपूर्वी सोलापुरात दहशतवादी कारवाया केल्याप्रकरणी संशयित तरुणांना मध्य प्रदेश दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने अटक करून तीन शक्तिशाली बॉम्ब हस्तगत केल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला येत्या १२ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.

कोल्हापुरात टोल विरोधातील आंदोलनाची व्याप्ती वाढली

टोल विरोधातील आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली असल्याचे गुरुवारी लॉरी ऑपरेटरचा महापालिकेला घातलेला घेराव, महापौरांनी उपोषणाला दिलेला पाठिंबा आणि प्रकृती खालावली असतानाही जयदीप शेळके यांनी पुन्हा उपोषणस्थळी सुरू केलेले आंदोलन या घटनांतून दिसून आले.

अभियांत्रिकी विद्यार्थ्याला सीसी टीव्ही फुटेजमुळे जामीन

एका शालेय मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांविरुद्ध एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमे-यातील फुटेजमुळे विनयभंगाचा व आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपातील खोटारडेपणा उघड झाला आणि त्या आधारे या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

पद्मश्री विखे यांच्या पुतळय़ाचे उद्या पुणे येथे अनावरण

पुणे येथील साखर संकुलात उभारण्यात आलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शाळकरी मुलीची आत्महत्या

नववीत शिकणा-या पिंपळगावरोठा येथील पूजा वसंत माने या पंधरावर्षीय विद्यार्थिनीने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतक-यांच्या नुकसानीस आ. गडाख व प्रशासन जबाबदार

मुळा धरणाचे आवर्तन उशिरा सुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीस सत्ताधारी आमदार शंकरराव गडाख व प्रशासनच जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे नेवासे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.

प्रांतांकडून ए-बी विंग इमारतींची पाहणी खास

वाडिया पार्क क्रीडासंकुलातील वादग्रस्त इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाहीसाठी विभागीय महसूल आयुक्तांनी प्राधिकृत केलेले नगरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी या संकुलातील वादग्रस्त ए आणि बी विंगच्या इमारतींची पाहणी करून संबंधित गाळेधारकांचे म्हणणे जाणून घेतले.

होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची मान्यता

होमिओपॅथिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयाचे शहरातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी जोरदार स्वागत केले. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महसूलबाहय़ कामांवरच तलाठय़ांचा बहिष्कार

जनतेशी निगडित कामांवर तलाठय़ांनी बहिष्कार टाकलेला नाही, महसुली कामे सोडून अन्य कामांपुरताच हा बहिष्कार असल्याचे राज्य तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब निमसे यांनी स्पष्ट केले आहे.

सांगली पालिकेत अभियंत्याची उपमहापौरांविरुद्ध तक्रार

विकासकामांच्या यादीवरून सांगली महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष बुधवारी टोकाला पोहोचला. शहर अभियंत्यानी उपमहापौरांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, तर प्रशासनाने बहिष्कार टाकल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करावी लागली.

हजारे यांचे नाव वापरून ब्लॅकमेलिंग

माहिती अधिकार तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते आहोत असे सांगून, हजारे यांच्या छबीचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्यांना हजारे यांच्या वकिलाने चपराक दिली आहे.

यादवबाबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे श्रद्घास्थान असलेल्या राळेगणसिद्घीतील संत यादवबाबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचा तसेच मंदिराबाहेरील द्वारपालाच्या मूर्तीची मोडतोड करून विटंबना करण्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला.

Just Now!
X