22 September 2020

News Flash

Ishita

‘वीस’च्या खालच्या शाळा बंद होणार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना धडकी भरवणारा, वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा आदेश अखेर येथे धडकला आहे.

विजेच्या प्रश्नावर लवकरच बैठक- कोल्हे

तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या विजेचा अडचणी मोठय़ा प्रमाणात भेडसावत असून, जळणाऱ्या वीज रोहित्रांच्या तक्रारीही असंख्य आहेत. याबाबत पंचायत समिती कार्यालयात बैठक घेणार असून, शेतकरी व नागरिकांनी विजेच्या अडीअडचणी लेखी स्वरूपात संजीवनी कारखाना कार्यालयाकडे पाठवाव्यात, असे आवाहन संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले आहे.

सोलापुरात नववर्षाची सुरुवात आंदोलनांनी…

सोलापूर शहरात नववर्षाची सुरुवात विविध प्रश्नांवर मोर्चा, धरणे, निदर्शने, कामबंद आदी विविध आंदोलनांनी झाली. त्यामुळे नववर्षांच्या पहिल्याच दिवशी पोलीस यंत्रणेवर ताण पडला.

‘श्री महागड ते श्री रायगड’ धारातीर्थ यात्रेस आज प्रारंभ

श्री शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री महानगड ते श्री रायगडमार्गे पुण्यश्लोक जिजामाता समाधी (पाचाड) अशी धारातीर्थ यात्रा (मोहीम) उद्यापासून (बुधवार) शनिवापर्यंत (दि.५) आयोजित केली आहे.

हजारे यांची नव्या आंदोलनाची तयारी

तीन वर्षांच्या जनआंदोलनाच्या लढय़ामुळेच जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. कायदे आणखी सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे संघटन उभे राहणे आवश्यक असल्याचे सांगत भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांनी या लढय़ात सामील व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.

सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

नववर्षाचे स्वागत करीत असताना मध्यरात्री सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी इचलकरंजीत दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारू पिऊन गाडय़ा चालविणा-या केवळ पाच जणांना पकडले…

दररोजच्या जीवनाच्या रणांगणातील लढाई लढत मावळत्या २०१३ वर्षांला निरोप देत नवीन २०१४ वर्षांचे स्वागत करताना सोलापूरकरांनी रक्तदानासारखे विधायक उपक्रम राबविले.

विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आटपाडीत दहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर संशयित तरुणाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

नगरसेवकांनी कोंडले महापौर, उपमहापौरांना

महापालिका प्रशासनाकडून विकासकामात अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून महापौर, उपमहापौरांसह अवघ्या प्रशासनालाच पाऊण तास कोंडले. चच्रेअंती टाळे काढण्यात आले असले तरी प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यां नगरसेवकांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोहोळजवळ ट्रक अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू

फरशी वाहतूक करीत सोलापूरमार्गे पुण्याकडे निघालेल्या मालमोटारीला अपघात होऊन त्यात मालमोटार चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.

सशांची शिकार करणा-या पाच जणांना अटक

कुपवाड औद्योगिक वसाहतीत सशांची शिकार करणा-या पाच जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांची रवानगी कोठडीत केली आहे.

हेलिकॉप्टर नको, विकासाला पैसे द्या

हेलिकॉप्टरमधून महाराजांना सप्ताहाला घेऊन जाण्याचे फॅड आता भाविकांमध्ये आले आहे, पण सरालाबेटाचे महंत रामगिरीमहाराज यांना ते मान्य नाही. लोकांनी हेलिकॉप्टरवर अनावश्यक खर्च करू नये, फार तर वाचलेले पैसे बेटाच्या विकासकामासाठी द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

तलाठी महिला लाचेच्या सापळय़ात

तालुक्यातील एका महिला कामगार तलाठय़ास तिच्या मदतनिसासह दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथे रंगेहाथ पकडले.

कॅन्टोन्मेंटची निवडणूक पुन्हा लांबणीवर

सहा महिन्यांपूर्वीच मुदत संपलेल्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाला (भिंगार छावणी मंडळ) दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ५ जूनपर्यंत मुदतवाढीचा आदेश बुधवारी सांयकाळी येथे प्राप्त झाला असून, आता त्यानंतर नवी निवडणूक होईल. आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच ही निवडणूक होईल.

वकील मनीष पल्लोड यांची आत्महत्या

येथील तरुण वकील मनीष पल्लोड यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच मंगळवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ४५ वर्षांचे होते.

शिर्डीत साईभक्तांचा महापूर

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षारंभानिमित्त साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या पालख्यांच्या गर्दीमुळे मंगळवारी शिर्डी साईनामाच्या गजराने दुमदुमून गेली.

थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा!

एकमेकांना शुभेच्छा देत, गळाभेट घेत नगरकरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षातील घडामोडींना उजाळा देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजीही झाली. जल्लोषात तरुणाईचा उत्साह अधिक होता, तो क्लब्ज, हॉटेल्स आणि ढाब्यांवरून ओसंडून वाहत होता.

सरते वर्ष आंदोलनांनी गाजले

महत्त्वाकांक्षी थेट पाइपलाइन योजनेला मान्यता, महापालिका हद्दवाढीबाबत निर्णायक भूमिका घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश, राजर्षी शाहूमहाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकास मान्यता या चांगल्या निर्णयाची नोंद सरत्या वर्षात झाली.

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरला पोलीस अधिका-याची मारहाण

शासकीय कर्तव्यावर रुजू असलेल्या निवासी डॉक्टरला पोलीस अधिकाऱ्यांनी कायदा हातात घेऊन बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात सोमवारी पहाटे घडली.

सोलापुरात मोटार अपघातात दोघे मृत; पाच जखमी

सोलापूर-बार्शी रस्त्यावर शहराच्या हद्दीत बाळे येथे बोलेरो जीप व पिकअप गाडीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात बोलेरो गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाचजण जखमी झाले.

बारा भिका-यांचा खून केल्याची ‘सीरियल किलर’ची कबुली

राज्याच्या विविध भागांत १२ भिकाऱ्यांचा डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली सीरियल किलर सतीश वैष्णव याने पोलिसांच्या चौकशीत दिली असल्याची माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी दिली.

सोलापूर जिल्हय़ात नवीन वर्षात पुन्हा ऊस आंदोलन पेटणार

दक्षिण महाराष्ट्र व मराठवाडय़ात ऊस गाळप करणा-या जवळपास सर्व साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर होऊन त्याचे वाटपही केले असताना इकडे राज्यात सर्वाधिक २९ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्हय़ात मात्र अद्याप उसाचा पहिला हप्ता जाहीर झाला नाही.

निलंबित शिक्षणाधिका-याला बडतर्फ करण्याची मागणी

सोलापूर जिल्ह्य़ातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या नेमणुकांना नियमबाह्य़ व बेकायदा मान्यता दिल्याने निलंबित झालेल्या शिक्षणाधिकारी विद्या शिंदे यांची कसून चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघटनेने केली आहे.

मोटारमालकास ५ वर्षांची सक्तमजुरी

वाहनचालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तात्रय सर्जेराव गणगे (वय ३५, रा. सुरेगाव गळनिंब, ता. नेवासे) यास येथील जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी पाच वर्षे सक्तमजुरी व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Just Now!
X