22 September 2020

News Flash

Ishita

उर्दू हायस्कूलसाठी नवीन इमारतीचे बांधकाम

अशोक शिक्षण संस्थेच्या शहरातील उर्दू हायस्कूलमध्ये शास्त्र विषयात अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचे तसेच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल, अशी घोषणा माजी खासदार गोविंदराव आदिक यांनी केली.

साईज्योती स्वयंसहायता प्रदर्शनास नगरकरांची गर्दी

रविवारच्या सुट्टीची पर्वणी साधत नगरकरांनी ‘साईज्योती स्वयंसहायता यात्रा-२०१४’ या महिला बचतगट उत्पादनांच्या प्रदर्शनास अलोट गर्दी केली. त्यामुळे रात्री प्रदर्शनाची वेळही वाढवून साडेअकरा करावी लागली.

पारनेर साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी तीन संस्थांच्या निविदा

शिरूरचे आमदार अशोक पवार अध्यक्ष असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना, कान्हूरपठार पतसंस्था तसेच शिक्रापूरच्या व्यंकटेश शुगर प्रायव्हेट लिमिटेड या तीन संस्थांनी पारनेर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास स्वारस्य दाखविले आहे.

बोगस हजेरी दाखवून पोषण आहारातही गैरव्यवहार

विद्यार्थ्यांची बोगस हजेरी दाखवून तुकडय़ा टिकवण्याबरोबरच बोगस हजेरीपटाच्या साहाय्याने शालेय पोषण आहारातही गैरव्यवहार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका विद्यालयात सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे.

‘आयसीटी’ योजनेतून जिल्हय़ातील २०७ शाळांत संगणक प्रयोगशाळा

केंद्र सरकारच्या ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन स्कूल’ (आयसीटी) योजनेंतर्गत, तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५ हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून संगणक प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत.

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

इचलकरंजी येथील श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.६) ‘पत्रकारदिन व गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा होत आहे.

उपचाराला विलंब केल्याने डॉक्टरविरुद्ध महिला रुग्णाची महिला आयोगाकडे धाव

छत्रपती शिवाजी सर्वाेपचार रुग्णालयात निवासी डॉक्टरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांनी चोप दिल्याच्या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) सोलापूर शाखेने निषेध नोंदवत संबधित पोलिसांविरुद्ध डॉक्टर संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

असंवेदनशील कारभाराविरुद्ध जनता रस्त्यावर

छत्रपती शिवाजी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला दाखल करताना तेथील डॉक्टराने असंवेदनशीलता दाखविली तर त्याचवेळी एका पोलीस अधिकाऱ्यातील ‘माणूस’ जागा होऊन कायदा हातात घेत त्याने संबंधित डॉक्टरला केलेली मारहाण व त्यातून डॉक्टरांच्या विरोधात उसळलेला जनक्षोभ गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर-जनता यांच्यात असा थेट संघर्ष होताना पाहायवयास मिळत आहे.

मार्डच्या संपामुळे सोलापुरात रुग्णसेवेवर मोठा परिणाम

निवासी डॉक्टरला पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडून पडली आहे.

सीपीआरमधील निवासी डॉक्टरांचा एक दिवसाचा संप

सोलापूर येथील शासकीय विद्यालयातील डॉ. प्रशांत पाटील यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर िहसक कृत्ये व मालमत्तेची हानी या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) सीपीआरमधील निवासी डॉक्टरांनी एक दिवसाचा संप पुकारला.

‘लेक शिकवा’ अभियानाचा प्रारंभ

राज्य सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी सुरू केलेल्या ‘लेक शिकवा’ अभियानाची सुरुवात आज नगर शहरातील रूपीबाई बोरा विद्यालयातील मुलींनी ‘पदवीपर्यंत शिक्षण न सोडण्याची’ प्रतिज्ञा करून व तशी घोषणा देत करण्यात आली.

नेवाशात विरोधकांचे उमेदवारावर एकमत होईना

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर गडाख यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी केला. पण उमेदवार कोण हे मात्र त्यांना ठरवता आले नाही.

श्रीरामपूरच्या उपनगराध्यक्षपदी छल्लारे

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शुक्रवारी काँग्रेसचे संजय छल्लारे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या वेळी विरोधकांसह १४ नगरसेवक अनुपस्थित होते. निवडीनंतर छल्लारे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.

पदोन्नतीपोटी दिलेल्या रकमेच्या वसुलीस खंडपीठाचा नकार

कर्मचा-यांच्या सेवाकाळात पदोन्नतीपोटी देण्यात आलेली अतिरिक्त रक्कम सेवानिवृत्तीनंतर वसूल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

आंबेडकर सामाजिक न्याय भवनावर ‘अन्याय’च

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, नगर शहरातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन’ उभारणीचे काम भूखंड आरक्षणाच्या मुद्यावर भिजत पडले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी सुनीता राऊत तर उपमहापौरपदी मोहन गोंजारी

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता अजित राऊत यांची, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मोहन यशवंत गोंजारी यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली.

निवासी डॉक्टरला मारहाण करणारे पोलीस निरीक्षकासह तिघे निलंबित

छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात रुग्णावरील उपचाराच्या कारणावरून तेथील एका निवासी डॉक्टराला बेदम मारहाण केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर व त्यांच्या दोघा सहकाऱ्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

राज्यात राष्ट्रवादीचा वीज घोटाळा लवकरच उघड होणार- राजू शेट्टी

राज्यात सिंचन घोटाळ्यानंतर लवकरच वीज घोटाळा उघडकीस येणार असून यात विजेसाठी कोळसा निर्यातीत सत्ताधारी राष्ट्रवादीचे हात काळे झाले आहेत, असा आरोप करीत या प्रश्नावर तीव्र लढा उभा केला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

महाडिकांनी केला सतेज पाटलांवर शाब्दिक प्रहार

धनंजय महाडिक युवा शक्तीच्या तिघा पदाधिकाऱ्यांना पाचगाव खून प्रकरणात अडकविण्याचे कटकारस्थान सूर्याजी पिसाळ याने केले आहे, अशा शब्दात भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर गुरुवारी शाब्दिक प्रहार चढविला. पाचगाव येथे गेल्या आठवडय़ामध्ये सतेज पाटील समर्थकाचा खुनाचा प्रकार घडला होता.

मिरजेच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गडगडले

मालाची आवक वाढल्याने सांगली, मिरजेच्या बाजारात भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. आठ दिवसांपूर्वी असणाऱ्या दरापेक्षा सध्याचे दर ५० टक्क्यांहून कमी झाल्याने शेतकरी मात्र आíथक अडचणीत सापडला आहे.

जळत्या बिडीमुळे विवाहित तरुणी जखमी

नव-याची जळती बिडी, उंदरा-मांजराची लुडबूड एका विवाहित तरुणीच्या जिवावर उठली. गुरुवारी पहाटे झालेल्या या दुर्घटनेत औद्योगिक वसाहतीनजीक असणाऱ्या सावळीत विवाहित तरुणी गंभीर जखमी झाली.

स्पिरीटची तस्करी

तस्करीच्या उद्देशातून परराज्यातून विनापरवाना स्पिरीटचा टँकर आणणाऱ्या एका आरोपीला गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. आशिक झाकीर हुसेन (वय ३५ रा.राजेंद्रनगर, जिल्हा,इंदूर, मध्य प्रदेश) याच्याकडून १ कोटी ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांसमोर सायबर क्राईमचे आव्हान- जिल्हाधिकारी

माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग गुन्हय़ांसाठीही होऊ लागल्याने त्यांना प्रतिबंध घालणे व पकडणे हे पोलिसांसाठी आव्हान झाले आहे. समाजात याविषयी जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी केले.

पाणीयोजना, रस्ते व सावेडी नाटय़गृहाला प्राधान्य

नवे महापौर संग्राम जगताप यांनी गुरुवारी प्रथमच घेतलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याची योजना, नगरोत्थानची कामे आणि सावेडीतील नियोजित नाटय़गृहाच्या कामाला प्राधान्य देण्यात आले.

Just Now!
X