22 September 2020

News Flash

Ishita

हुंडय़ासाठी जावयाचा खून; सास-यासह दोघांना जन्मठेप

पारधी समाजातील रीतीरिवाजानुसार जावयाकडून सास-यांना लग्नात हुंडा दिला नाही म्हणून जावयाचा छळ करून निर्घृणपणे खून केल्याबद्दल सास-यासह दोघांना सोलापूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

पावनखिंडीवर नवा प्रकाश

प्रचलित पावनखिंड नाकारून मूळ पावनखिंड ही येळवण जुगाई गावच्या पाठीमागील डोंगरात असल्याची मांडणी करणारे संशोधन ‘शोध पावनखिंडीचा’ या डॉ. दीपक चव्हाण लिखित मंगळवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये आहे.

दूषित पाण्याचे यंत्रणेला गांभीर्य नाही

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मार्फत तालुक्यातील दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना देखील हिरवे कार्ड देण्यात आले आहेत. तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला असून अनेकांनी या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

नगर जिल्ह्य़ातील रस्ते जोडण्यासाठी केंद्राकडे निधीची मागणी

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील उपेक्षित खेडी जोडण्यासाठी २ हजार ६५० किलोमीटरचे रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर केले आहे. त्यात नगर जिल्ह्याचा प्रचंड विस्तार असतानाही केवळ १२० कि.मी. रस्ते मंजूर करून जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

पारनेरला धुमश्चक्री, उपसरपंचावर गुन्हा

तालुक्यातील वडनेर हवेली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील वादातून पारनेर येथे दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. पारनेर पोलिसांनी वाडेगव्हाणचे उपसरपंच नितीन शेळके यांच्यासह बारा जणांविरुद्घ गुन्हा दाखल केला असून, एकास अटकही करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी संग्राम जगताप

महापौरपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने बुधवारी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर संग्राम जगताप यांच्या नावाची घोषणा केली. उद्या (गुरुवार) ते हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अनुदान दिले तरच बससेवा

केंद्र शासनाच्या शंभर टक्के अनुदानातून शंभर बसची व्यवस्था होत असेल तर परिवहन सेवा चालविण्याचा महापालिका विचार करेल असे महापौर कांचन कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार बठकीत सांगितले.

दहशतवाद्यांना मदत करणा-या तरुणास सोलापुरात अटक

मध्य प्रदेशातील खांडवा येथील कारागृह फोडून पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा माग काढताना तिघा दहशतवाद्यांना पकडण्यात आले असून त्यांना मदत केल्याप्रकरणी सोलापूरच्या एका तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सांगली महापालिकेच्या इमारतीस आग

सांगली महापालिकेच्या तळमजल्यावरील वीजकळ केंद्रात मंगळवारी सायंकाळी शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. कर्मचा-यांनी तातडीने हालचाल करून ही आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

मनसेचा निर्णय ठाकरे आज कळवणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज जिल्ह्य़ातील पदाधिका-यांसमवेत, मुंबईत ‘कृष्णकुंज’ वर हजेरी लावत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली, मात्र नगरच्या महापलिकेतील सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, राष्ट्रवादी आघाडीला की युतीला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय मात्र नगरसेवकांना उद्या, मंगळवारी कळवला जाणार आहे.

कराडमध्ये संकलित कर नोटिसांची होळी

कराड नगरपालिकेने वार्षिक संकलित करात वाढ केल्याच्या निषेधार्थ भारतीय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी कराच्या नोटिसांची होळी करून निषेध नोंदवला.

सोलापूर जिल्हा परिषदेची सभा महिला सदस्यांचा रुद्रावतार…

सोलापूर जिल्हय़ातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची होणारी दुरवस्था, तेथील वैद्यकीय अधिका-यांचे सातत्याने गैरहजर राहणे, औषधांचा तुटवडा या प्रश्नांवर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत पदाधिका-यांना व प्रशासनाला धारेवर धरले.

पाच पाणी योजनांवर वीज खंडित होण्याची टांगती तलवार

जिल्हा परिषदेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने व पाणीपट्टीच्या वसुलीकडेही लक्ष न दिल्याने अखेर, जि.प.ने चालवण्यास घेतलेल्या पाच प्रादेशिक नळ पाणी योजना केव्हाही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

अन्नसुरक्षा योजनेच्या याद्या प्रशासनाची कसोटी घेणार

केंद्र सरकारने अन्नसुरक्षा विधेयक संमत केल्याच्या पाश्र्वभूमीवर या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाने पात्र लाभार्थी निवडण्याच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्या आहेत.

श्रीरामपूरचा रामराव आदिक स्कूल संघ विजेता

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व अशोकभाऊ फिरोदिया मेरिट फाऊंडेशन आयोजित स्व. अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक शालेय क्रिकेट स्पर्धेत आज श्रीरामपूरच्या रामराव आदिक इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल संघाने विजेतेपद पटकावले.

कोल्हापुरात टोळीयुद्ध

राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे पाचगावमध्ये बोकाळलेल्या टोळीयुद्धात धनाजी गाडगीळ हा आणखी एक बळी गेला आहे. ‘खून का बदला खून’ या प्रवृत्तीतून भरदिवसा पाचगावमध्ये खून करण्याचे प्रकार वाढत चालले असून, या टोळीयुद्धातील संघर्ष आणखीनच टोकदार झाला आहे.

बार्शीजवळ वृद्धाचा शेकोटीत भाजून मृत्यू

सोलापूर जिल्हय़ात थंडीचा कडाका अधूनमधून वाढत असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणाऱ्या एका वृद्धाचा शेकोटीच्या आगीत भाजून मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील राळेरास येथे ही घटना घडली.

विजेची थकीत बिले हप्त्याने तरी का भरावीत?

सोलापूर जिल्हय़ात शेतक-यांकडील थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने वीजतोडणीची मोहीम हाती घेतल्यामुळे एकीकडे शेतक-यांनी एकत्र येऊन आंदोलन छेडले असताना त्याची दखल घेत अखेर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेतक-यांची वीजजोडणी न तोडता त्यांच्याकडून वीजबिलांची रक्कम हप्त्याहप्त्याने वसूल करण्याच्या सूचना द्यावा लागल्या.

शौचालय घोटाळा मक्तेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा

केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने सोलापूर शहरात महानगरपालिकेने गलिच्छ वस्ती भागात राबविलेल्या शौचालय योजनेत झालेल्या ७२ लाख २८ हजारांच्या घोटाळय़ाप्रकरणी पालिकेचे आरोग्य अधीक्षक महादेव डोणज, आरोग्य निरीक्षक ईरण्णा बिराजदार व मक्तेदार भारत मनसावाले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

चार महिलांसह १८ जणांना अटक

शहराजवळील नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत, काल पोलिसांवर दगडफेक करणा-या तसेच पोलिसांचे वाहन अडवून आरोपींच्या अटकेत अडथळा आणणा-या, चार महिलांसह १८ जणांना तीन दिवस, दि. २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

राष्ट्रवादीच्या गटात अपक्षांसह २३ सदस्य

काँग्रेसवगळता महानगरपालिकेतील अन्य सर्व राजकीय पक्षांनी सोमवारी गटनोंदणी केली. राष्ट्रवादीचा गट सर्वात मोठा ठरला असून पाच अपक्षांच्या साहाय्याने त्यांनी २३ सदस्यांची नोंदणी केली.

जि. प. प्राथमिक शाळांना नाताळाची आठवडाभर सुटी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना २६ डिसेंबर ते १ जानेवारी अशी आठवडाभराची सुटी, प्राथमिक शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी जाहीर केली. तसे पत्र सर्व पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिका-यांना आज धाडण्यात आले. २ जानेवारीपासून शाळा पुन्हा पूर्ववत सुरू होतील.

सत्ता बदल होऊन राष्ट्रवादीचेच वर्चस्व

नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट आली, मात्र स्थानिक पातळीवरील नेतृत्व बदलले असले तरी वर्चस्व मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर गडाख यांच्याच गटाचे राहिले.

दारूच्या नशेत पत्नीला जाळून मारले

राजकीय नेते व सरकारी अधिका-यांनी दारूबंदीचे आंदोलन दडपल्यानंतर उंदीरगाव येथे एका आदिवासी महिलेचा दारूनेच बळी घेतला. दारूच्या नशेत असलेल्या नव-याने अनिता राजू मोरे (वय ३४) या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळले.

Just Now!
X