22 September 2020

News Flash

Ishita

चाकूचा धाक दाखवून मालमोटारचालकाला लुटले

मालमोटारचालक व क्लीनर यांना चाकूचा धाक दाखवून, मारहाण करून तसेच त्यांच्या अंगावारील कपडे काढून त्यांना मोटारीत बांधून ठेवून, त्यांच्याजवळील २५ हजार रुपये ४ ते ५ चोरटय़ांनी पळवले.

कर्करोगविरोधी औषधांवरील चर्चा सत्रात १३४ विद्यार्थ्यांचे शोधनिबंध

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे कॉलेज ऑफ फार्मसी व एआयसीटीई (नवी दिल्ली) यांनी राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या कर्करोगविरोधी औषधांवरील दोनदिवसीय चर्चासत्रात १३४ विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले.

मुश्रीफ समर्थकांनी केला दुग्धाभिषेक

बुलढाण्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काळी शाई ओतून निषेध नोंदविण्याचा प्रकार घडल्यानंतर शुक्रवारी कोल्हापुरात मुश्रीफ समर्थक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक घालून बालंट पुसण्याचा प्रयत्न केला.

‘त्या’ चार तरुणांची चौकशी अन् मुक्तताही

गेल्या मंगळवारी शहरात येऊन मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने दोघा संशयित तरुणांच्या अटकेची तथा तीन शक्तिशाली बॉम्बसह स्फोटके जप्तीची कारवाई करताना अन्य संशयित चार तरुणांनाही ताब्यात घेतले होते.

माळढोक अभयारण्यात आगी लावण्याचे प्रकार सुरूच

सोलापूरजवळ नान्नजजवळ अकोलेकाटी ते कारंबा परिसरात माळढोक अभयारण्यात अचानकपणे आग लागली. यात सहा हेक्टर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाले. या अभयारण्यात आगी लागण्याचे प्रकार अधूनमधून घडतात.

उसाच्या पहिल्या हप्त्याअभावी ग्रामीण अर्थकारण बिघडले

संघर्षपूर्ण लढय़ानंतर राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिना लोटला, तरी अद्याप साखर कारखान्यांकडून शेतक ऱ्यांची उसाचा पहिला हप्ता अदा झालेला नाही. यामुळे ग्रामीण अर्थव्यवहाराचा मुख्यस्रोत असलेल्या विकास सेवा संस्था, पतसंस्था यांचे अर्थकारण कोलमडण्याच्या स्थितीत आलेले आहे.

महापौरपदी सुनीता राऊत यांची वर्णी?

कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनीता राऊत तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मोहन गोंजारी यांची वर्णी लागणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या निवडीवर २ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी कविता उत्तम साधनच

मनातल्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी कवितेसारखे दुसरे साधनच नाही असे कुमारी रमिजा जमादार हिने पहिल्या विद्यार्थी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदावरून सांगितले.

स्वामी समर्थ दूध कंपनीची फसवणूक सात जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक

शहराच्या गुलमोहोर रस्त्यावरील स्वामी समर्थ दूध प्रॉडक्ट प्रा. लि. ही कंपनी बनावट ठराव करून व खोटी कागदपत्रे तयार करून बळकावण्याचा प्रयत्न केला तसेच सुमारे साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला तसेच त्यातील तिघांना अटक केली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत विविध योजनांवर केवळ ४७ टक्के खर्च

राष्ट्रवादीची सत्ता असली तरी अंतर्गत संघर्ष, गटा-तटाचे राजकारण आणि प्रशासनावर नसलेली पकड यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची अधोगती होत असून सर्व योजनांच्या प्राप्त अनुदानातून आजतागायत झालेला खर्च केवळ ४७ टक्के, तर जिल्हा परिषद सेस योजनेचा खर्च तर जेमतेम २२.२६ टक्के इतकाच झाल्याचे दिसून आले.

‘आठवले महायुतीत, कार्यकर्ते आघाडीच्या कच्छपि’

शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माजी खासदार रामदास आठवले यांच्या गटाची युती असली तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीत विभागले आहेत.

मुलाला गुन्ह्य़ात अडकवल्याचा उमेरच्या वडिलांचा दावा

मध्य प्रदेशच्या इंदूरच्या पोलिसांनी सोलापुरातून दोन संशयित दहशतवादी तरूणांना अटक केल्यानतर त्यापैकी उमेर अ. हाफिज दंडोती याच्या वडिलांनी आपला मुलगा निष्पाप असून त्यास इंदूर पोलिसांनी फसवून खोटय़ा गुन्ह्य़ात गुंतविल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसच्या चिन्हावर ‘आप’चा उमेदवार

दिल्लीत आम आदमी पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिला. त्याचे अनुकरण लगेचच गल्लीतही सुरू आहे. श्रीगोंदे नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने आम आदमी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस भारत नहाटा यांना उमेदवारी दिली आहे.

‘रेणुका शुगर्स’च्या १० जणांवर गुन्हा

रेणुका शुगर्सकडे चालविण्यास असलेल्या पंचगंगा कारखान्याकडे गाळपास असलेल्या उसाच्या बिलाबाबत फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गोळीबाराचा सराव करताना गोळी लागून तरुणीचा मृत्यू

कुर्डूवाडीजवळ चिंचोळी येथे रेल्वे सुरक्षा दल केंद्रातील (आरपीएफ) आवारात जवानांकडून सुरू असलेल्या गोळीबार सरावावेळी सुटलेली एक गोळी लागून मयूरी धर्मराज अस्वरे (वय २७) या तरुणीचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

तरुणांच्या भांडणावरून कारेगावमध्ये तणाव

छेडछाडीवरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या कुरबुरीचे रूपांतर हाणामारीत झाले. एका दलित तरुणास बेदम मारहाण करून गटारीत फेकून देण्यात आले. त्यानंतर जमावाने एका दुकानाची मोडतोड केली.

युतीचे दोन्ही पदांसाठी स्वतंत्र उमेदवार

महापौर आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेस आघाडीतून ठरल्यानुसार प्रत्येकी एकाचाच उमेदवारी अर्ज दाखल झाला. भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीत मात्र दोन्ही पदांसाठी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी एकाचा अर्ज दाखल करून संभ्रम निर्माण केला आहे.

निळवंडेच्या ठेकेदाराच्या चौकशीची मागणी

उत्तर नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामावर गेल्या ४५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेली कंत्राटदार कंपनी व या कंत्राटदाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.

राहुरीत एकाच रात्रीत सहा चो-या

राहुरी खुर्द येथे चोरटय़ांनी बुधवारी धुमाकूळ घालून ६ ठिकाणी चोऱ्या केल्या. १५ दिवसांपासून चो-यांचे सुरू असलेले सत्र थांबवण्यात राहुरी पोलिसांना यश आलेले नाही. काल झालेल्या चो-यांत सुमारे १ लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरीस गेला.

बदल्यांचे अधिकार मंत्र्याना देण्यास विरोध

सरकारी अधिका-यांच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून तसे झाल्यास राज्यभर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

सोलापूरच्या ‘वालचंद’ला मानांकन

जागतिक शिक्षणाच्या मूल्यमापनाची बरोबरी करणा-या भारतातील मोजक्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सोलापूरच्या वालचंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला (डब्ल्यूआयटी) मानांकन प्राप्त झाले असून, ‘एआयसीटीई-सीआयआय’च्या सर्वेक्षणामध्ये वालचंद अभियांत्रिकीच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला प्रथम क्रमांक मिळाले आहे.

पुतण्या सह चौघांना अटक काका च्याच घरावर दरोडा

चुलत्याच्या घरावर दरोडा घालणा-या पुतण्याला राहुरी पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात तीन आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली असून चौघे आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सांगलीत बालकाचा मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात विश्रामबाग येथे तेजस मारुती हाले या पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम आज हाती घेतली.

सांगलीत अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपातीचा निर्णय

आर्थिक अडचणीत असणा-या सांगली महापालिकेने ठेकेदारांची बिले देण्यासाठी अधिका-यांच्या वेतनात पन्नास टक्के कपात करावी, असा निर्णय स्थायी समितीच्या बठकीत घेण्यात आला.

Just Now!
X