05 July 2020

News Flash

Ishita

‘आप’च्या उमेदवारी साठी २० इच्छुक

आम आदमी पक्षाकडे जिल्ह्य़ातील नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० जणांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांची निवड प्रक्रिया गुरुवारी (दि. २०) मुंबईत होणार आहे. या दोन्ही जागांसह महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा पक्ष लढवणार आहे. दि. २५ फेब्रुवारीपर्यंत सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले जाणार आहेत.

चांगोजीराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन

माळशिरसचे माजी आमदार चांगोजीराव आबासाहेब देशमुख (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापुरात काँग्रेसच्या प्रचाराबरोबर मेजवान्याही झडू लागल्या

आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असतानाच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी आतापासूनच करायला सुरुवात केली असून सोलापुरात तर कार्यकर्ते व मतदारांना खूश करण्यासाठी ‘श्रम परिहारा’च्या नावाखाली मांसाहारी व शाकाहारी भोजनाच्या मेजवान्या झडू लागल्या आहेत.

‘सोनहिरा’च्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचा बहिष्कार नाही- कदम

सोनहिरा साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला असे आपल्याला वाटत नाही. दोन्ही काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसून एकत्र आम्ही सुखेनव नांदत असल्याचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकारी कर्मचा-यास साडेआठ हजारांचा गंडा

बँकेच्या खात्याची माहिती घेऊन खात्यावरील रकमेचा अपहार केल्याची घटना शनिवारी पारनेरमध्ये घडली. सेंट्रल बँकेचा व्यवस्थापक असल्याची बतावणी करून या भामटय़ाने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यास साडेआठ हजारांना गंडा घातला.

पुसेगावला बटाटा, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार

राहुरी कृषी विद्यापीठात फूड व बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाबरोबरच पुणे येथे अ‍ॅग्री बिझनेसचे महाविद्यालय तर, पुण्यातील बटाटा संशोधन केंद्र पुसेगावला, तसेच महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी सांगितले.

पिस्तुलात गोळी अडकल्याने अनर्थ टळणे

तार चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपीने पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी पिस्तुलातच अडकल्याने पुढील अनर्थ टळला. आरोपीस पोलिसांनी झडप घालून पकडले. रविवारी रात्री ही घटना घडली.

ज्वारीचे भाव कोसळल्याने लिलाव बंद पाडले

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ज्वारीचे दर थेट ४०० रुपयांपर्यंत कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी लगेचच लिलाव बंद पाडले. बरेच वादंग होऊन अखेर १ हजार ५० रुपयांनी हे लिलाव सुरू झाल्यानंतरच व्यवहार सुरळीत झाले.

आगरकरांच्या अनुभवाची मनपात गरज- कावरे

भाजपचे शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व महानगरपालिका सभागृहात जाणे आवश्यक होते. म्हणूनच आम्ही नगरसेवक व पदाधिका-यांनी त्यांना स्वीकृत सदस्य व्हावे यासाठी आग्रह धरला, असे भारतीय जनता पक्षाचे मनपातील गटनेते दत्ता कावरे यांनी सागितले.

ब्राह्मण समाजाची लवकरच ‘परशुराम हेल्पलाइन’

स्वातंत्र्यसंग्रामात योगदान देणा-या ब्राह्मण समाजावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र मोठय़ा प्रमाणात अत्याचार होत आहेत. अत्याचार निवारणासाठी आता एप्रिल महिन्यापासून टोल फ्री क्रमांकावर‘परशुराम हेल्पलाइन’ची सेवा सुरू होत असून ब्राह्मण समाजावर जेथे अत्याचार होईल, त्यांनी या हेल्पलाइनचा आधार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय बहुभाषक ब्राह्मण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश त्रिपाठी यांनी येथे केले.

बालिकाश्रम रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू

दीर्घ काळ रखडलेल्या बालिकाश्रम रस्त्याचे अत्याधुनिक पद्धतीने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ सोमवारी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते झाला.

‘आयआरबी’च्या कोल्हापुरातील २० कर्मचा-यांचा राजीनामा

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या चर्चेवेळी टोलविरोधी कृती समितीने आर्यन हॉस्पिटॅलिटीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे कागदपत्रांच्या आधारे ठामपणे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आयआरबी कंपनी आर्यन हॉस्पिटॅलिटीला नोटीस बजाविण्याचे जाहीर केले.

बँक कर्मचा-यांच्या संपामुळे दोनशे कोटींची उलाढाल ठप्प

वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचा-यांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे सोलापुरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार ठप्प झाले.

सांगली-इस्लामपूर मार्गावरील टोलविरोधी आंदोलन स्थगित

सांगली-इस्लामपूर मार्गावरील टोल रद्द व्हावा, या मागणीसाठी सुरू असणारे ठिय्या आंदोलन टोल विरोधी कृती समितीने सोमवारी स्थगित केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल हटविण्याची घोषणा केली असून या बाबतचा लेखी निर्णय लवकरच मिळेल, या आशेवर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीने केली.

शेट्टींच्या अटकेची शक्यता; ‘महायुती’चा आंदोलनाचा इशारा

दीड वर्षांपूर्वीच्या ऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन दिनकर पवार यांचा रविवारी मृत्यू झाल्यानंतर शिरोली पोलिसांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८४ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूरसाठी दोनशे बसेस खरेदीच्या प्रस्तावाला सत्ताधा-यांकडून ‘खो’

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकाराने व सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नगरोत्थान महाअभियानातून सोलापूर पालिका परिवहन उपक्रम विभागासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस खरेदीच्या विषयास मंजुरी देण्यास परिवहन समितीतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी खोडा घातला.

आघाडी सरकारने शेतकरी देशोधडीला लावला

आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असून हे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल. त्यामुळे देश व राज्याच्या हितासाठी सत्तापरिवर्तनासाठी सज्जतेचे आवाहन आमदार विजय औटी यांनी केले.

आव्हानेच अधिक!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर गेल्या आठवडय़ात शैलेश नवाल रुजू झाले. भारतीय प्रशासन सेवेतील प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळता येईल, अशी त्यांची ही पहिलीच नियुक्ती आहे.

माध्यमिक शिक्षक संपात उतरणार

गुरुवारपासून (दि. १३) होणा-या राज्य सरकारी कर्मचा-यांच्या राज्यव्यापी संपात माध्यमिक शिक्षकही सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील गाडगे यांनी दिली.

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचा-यांची निदर्शने

राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला सोमवारी केंद्र सरकारविरोधी निदर्शनाने सुरुवात झाली. शहरातील विविध बँकांमधील कर्मचाऱ्यांनी सकाळी चितळे रस्त्यावरील युको बँकेसमोर निदर्शने केली.

स्वीकृतच्या निवडी वादग्रस्त ठरण्याची चिन्हे

विलंबानेच होत असलेली महानगरपालिकेची स्वीकृत नगरसेवकांची निवड वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय पक्षांच्या गटनोंदणीनुसार प्रशासनाने ठरवलेल्या मूल्यांकनास शिवसेनेने विरोध दर्शवला असून, त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मूल्यांकनास आक्षेप घेताना, शिवसेनेसाठी स्वीकृतच्या दोन जागांची मागणी केली आहे.

कर्जतसह ६ तालुक्यांमध्ये रोजगार सेवकांचा संप

ग्रामविकास खात्याला इशारा देऊनही दुर्लक्ष झाल्यामुळे अखेर जिल्हय़ातील कर्जतसह नगर, पाथर्डी, शेवगाव, राहाता व श्रीगोंदे या सहा तालुक्यांमधील ग्रामरोजगार सेवक संपावर गेले आहेत. राज्यातील अकरा जिल्हय़ांमध्येही हे आंदोलन सुरू आहे.

टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची महायुतीची घोषणा फसवी- आर.आर.

आज टोल बंद करू असे म्हणणा-या शिवसेना भाजप युतीनेच राज्यात पहिल्यांदा टोलचे धोरण आणले. युतीच्या काळात ७९ टोलनाके सुरू झाले. त्यामुळे टोलमुक्त महाराष्ट्र करण्याची महायुतीची घोषणा फसवी आहे, असा आरोप गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना केला.

आज ठिय्या आंदोलन

आयआरबी कंपनीला दिलेल्या भूखंडावर हॉटेल बांधकामासाठी देण्यात आलेली बिगर शेतीची (एनए) परवानगी चुकीची असून, ती रद्द होईपर्यंत सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी जाहीर केला.

Just Now!
X