13 July 2020

News Flash

Ishita

शिंदी-नीरा लागवडीसाठी व्यापक चळवळ

ग्रामीण आणि आदिवासी भागात कमी प्रतीच्या जमिनीत रुजणारे िशदीचे झाड म्हणजे बहुपयोगी कल्पवृक्षच आहे. या भागातील गरिबी, कुपोषण तसेच रोजगाराच्या प्रश्नांवर पायाभूत स्वरूपाचे काम करण्यासाठी नगर जिल्हय़ात पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ग्रामीण भागात शिंदी लागवडीची चळवळ राबविणार असल्याची घोषणा उद्योजक व कृषितज्ज्ञ सुनील कानवडे यांनी केली.

टोलमाफीची खोटी घोषणा करणा-या मंत्र्यांनी मालमत्ता विकून भरपाई करावी

टोलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल टाकत महायुतीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर टोलमुक्त करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

शशिकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी

हृषीकांत शिंदे हा शशिकांत शिंदे प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पालकमंत्री तपासी यंत्रणेवर दबाव आणत आहेत. चौकशी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी गृहमंत्र्यांची शिफारस

लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा मिळण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रीय समितीकडे केल्याची माहिती अखिल भारतीय वीरशैव महासभेचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी दिली.

जिल्हा बँकेचे संचालक व‘स्वाभिमानी’चे आव्हान-प्रति आव्हान

जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी साखर कारखान्यांकडील गोदामे तपासणीस सामोरे जाण्याची तयारी दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आव्हान स्वीकारले आहे.

राज्याच्या निधीतून उड्डाणपुलास मान्यता

शहरातील रेंगाळलेला उड्डाणपूल अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारच्या अंदाजपत्रकातून त्यासाठी खास तरतूद करण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मान्य केले. मात्र त्यामुळे या रस्त्याच्या विकसकाच्या टोलवसुलीला काही वर्षांची कात्री लावण्यात येणार आहे.

संगमनेर पालिकेची करवाढ नाही

सुमारे दोन लाख रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्पास आज झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. मालमत्ता करात मोठी कपात करतानाच कोणताही कर वाढविण्यात न आल्याने महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची भावना व्यक्त केली गेली.

राठोड यांच्या याचिकेची १५ मार्चला सुनावणी

महापालिकेच्या निवडणुकीतील शिवसेनेचे पराभूत उमेदवार विक्रम अनिल राठोड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी उमेदवार किशोर डागवाले यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका दाखल करून घ्यायची की नाही यावर आता १५ मार्चला सुनावणी होणार आहे.

मुळा नदी लवकरच बारा महिने वाहणार

पिंपळगाव खांड धरणाच्या निर्मितीमुळे मुळा नदी बारमाही करण्याचे स्वप्न या पावसाळय़ात निश्चितपणे पूर्ण होणार असल्याची ग्वाही आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली. अन्नसुरक्षा योजनेचे श्रेय अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेणा-या देशातील शेतक-यांना असल्याचे त्यांनी सांगितले.

मूकबधिर मुलांसाठी ‘स्पीच थेरपी’

मूकबधिर मुलांवर वेळेत ‘स्पीच थेरपी’चे उपचार केले तर ते व्यवस्थित शिक्षण घेऊन समाजापुढे जाऊ शकतात. याच उद्देशाने एका अंगणवाडी सेविकेने स्वत:हून ही उपचारपद्धती, विशेष बालके व त्यांच्या मातांना शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

समूह स्वच्छतेवर महापौर ठाम

शहरात समूह स्वच्छता मोहिमेवर महापौर संग्राम जगताप ठाम आहेत. कामगार संघटनेच्या पदाधिका-यांशी झालेल्या चर्चेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली, मात्र कामाच्या सोयीसाठी वेळेत बदल करण्याचे जगताप यांनी मान्य केले.

कुख्यात गुंड शाहरूखकडून पिस्तूल हस्तगत

कुख्यात गुंड शाहरूख शेख याच्याकडून पोलिसांनी मंगळवारी गावठी कट्टा हस्तगत केला. गावठी पिस्तुलाची खरेदी विक्री करणा-या रॅकेटचा शोध त्यामुळे पोलिसांना घेता येणार आहे.

खा. मुंडे यांचे पाच वर्षे जाहीर नाम्याकडे दुर्लक्ष

मागील लोकसभा निवडणूक प्रचारात रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. मात्र, नवीन रेल्वे सोडाच, परळीच्या रेल्वेला नवीन डबाही जोडला नाही. संसदेत पहिल्या रांगेत बसूनही लोकसभेतील त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली.

मतदार यादीचा घोळ, ‘सरपंच’ पदाचा तिढा!

उमेदवार ठरविण्यासाठी काँग्रेसअंतर्गत होणा-या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आमदार शरद रणपिसे यांची मंगळवारी निवड झाली. रणपिसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. निवडणूक निर्णय अधिकारी ठरला असला, तरी मतदार यादी मात्र अजून अंतिम झालेली नाही.

साहित्यकृतीशी प्रामाणिक राहिले पाहिजे- विश्वास पाटील

वाचकांच्या नजरेतून केसभरही चूक निसटून जात नसल्याचे भान ठेवत साहित्यिकांनी जबाबदारीने लेखन करून आपल्या साहित्यकृतींशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असे मत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

मतदारांचाच ‘आळस’ नि ‘उदासीनता’!

जिल्हय़ातील २०० गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा मतदान केंद्रांची माहिती सरकार दरबारी सादर झाली. मतदारांमधील ‘आळस’ आणि ‘उदासीनता’ ही दोन प्रमुख कारणे प्रशासनाने पुढे केली. या तालुक्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असेही कळविले गेले.

हमीसाठी दुस-या दिवशीही तूर, हरभ-याचा सौदा नाही!

हमीभावाने तूर, हरभ-याची खरेदी परवडत नसल्यामुळे सलग दुस-या दिवशी लातूर बाजार समितीत खरेदी बंद राहिली. दरम्यान, तूर व हरभ-याचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले असून शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांनी केले आहे.

सुलभ हप्त्याने सोन्याचे आमिष ‘त्या’ कार्यालयास सील, दाम्पत्यासह चौघेही पसार

सुलभ हप्त्याने सोन्याचे दागिने खरेदीची योजना सुरू करून त्याआधारे ग्राहकांना जाळय़ात ओढून, कोटय़वधीची फसवणूक करणा-या दाम्पत्य व अन्य दोन अशा चार जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फसवणुकीच्या प्रकारामुळे संबंधित पैसे गुंतवणा-यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.

सोलापूरच्या दोघा सराफांची १२ लाखांची बॅग पळविली

स्वस्तात सोन्याचे आमीष दाखवून सोलापूरच्या दोन सराफांची १२ लाखांची बॅग भरदिवसा पळविण्यात आली. भूम तालुक्यातील माणकेश्वर-देवंग्रा परिसरात हा प्रकार घडला.

महापालिका कर्मचा-यांचे उद्यापासून मुंबईमध्ये धरणे

परभणीसह लातूर, चंद्रपूर महापालिकांचे बंद केलेले सहायक अनुदान पूर्ववत चालू करावे, तसेच रोजंदारी कर्मचा-यांना विनाअट सेवेत कायम करावे, या मागण्यांसाठी या तिन्ही महापालिकांचे कर्मचारी गुरुवारपासून (दि. २०) संघटनेचे नेते के. के. आंधळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मदानावर बेमुदत धरणे व निदर्शने करणार आहेत.

आटपाडीत कृष्णेचे पाणी आले, श्रेयावरून राजकारण सुरू झाले

निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाचा कलंक माथी घेऊन दोन पिढय़ा खपल्या. आज.. उद्या.. कृष्णामाई वावरात येईल या आशेवर भोळाभाबडा डोळे लावून बसला होता. सुदैवाने प्रतीक्षा संपली.

‘ई-गव्हर्नन्स’मध्ये महाराष्ट्र अव्वल- मुख्यमंत्री

‘ई-गव्हर्नन्स’मध्ये महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे. संगणकीकरणाच्या युगात राज्य शासनाच्या सर्व खात्यांची कार्यालये कॉम्प्युटराइज्ड करण्यात येत असून, भविष्यात ई-ऑफीसमुळे कामांचा निपटारा २१ दिवसांत करण्यात यश येईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसचीच – सतेज पाटील

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने मीडियाचे दावे फोल ठरतील, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कोल्हापूरच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर, हातकणंगलेच्या जागेचा निर्णय हायकमांडकडून होईल असे ते म्हणाले.

तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यावरून ग्रामसभेत हाणामारी

शासनाच्या तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडीवरून करमाळा तालुक्यातील ढोकरी येथे ग्रामसभेत दोन गटांत हाणामारी होऊन त्यात एका महिलेसह सहा जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.

Just Now!
X