11 August 2020

News Flash

Ishita

कोणी कितीही प्रयत्न केले तरी उमेदवारी मलाच- खा. गांधी

नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारीसाठी आपण पुन्हा इच्छुक आहोत, कोणी कितीही प्रयत्न केले तरी तिकीट मलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी कोणी कितीही अफवा उठवल्या तरी आपला जन्म आणि अंतही भाजपमध्येच आहे, असे ठोस प्रतिपादन पत्रकारांशी बोलताना केले.

उपोषणाचा ७ वा दिवस, २७ आंदोलक रुग्णालयात

शेवगावला नगरपालिका स्थापन करावे या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या आंदोलकांची तब्येत खालावल्याने १९ महिलांसह २७ जणांना पोलिसांनी आज जबरदस्तीने उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले.

खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा आज काँग्रेस प्रवेश

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा उद्या सोमवार दि. २४ रोजी इच्छामणी मंगल कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, चिटणीस शौर्यराज वाल्मीकी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

आशयघन कवितांतून उलगडला मराठीतील कसदारपणा

रसिक श्रोत्यांकडून कधी हशा आणि टाळ्या वसूल करत तर कधी त्यांना अंतर्मुख करत महाराष्ट्राच्या विविध भागांतील श्रेष्ठ कवींनी मराठी भाषेतील कसदार व बळकटपणा दाखवून देत, इंग्रजीचे कितीही आक्रमण झाले तरी, मराठी भाषा कधीही लोप पावू शकणार नाही, याची जाणीव करून दिली.

शिक्षकांच्या मानधनातील कपातीने नाराजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावी परीक्षेत पर्यवेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी असतानाच, यंदापासून मंडळाने कपात केल्याने शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे.

पारनेरमध्ये चित्रकला स्पर्धेत दहा हजार विद्यार्थी सहभागी

आ. विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात रविवारी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मंडलिक रविवारी भूमिका जाहीर करणार

काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केल्याचे सांगितले जात असले तरी खासदार सदाशिवराव मंडलिक हे रविवारी होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मंडलिक हे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे जिल्हय़ाचे लक्ष वेधले आहे.

महापौरांच्या घराच्या अवैध बांधकामावर आयुक्तांचा हातोडा पडण्यास विलंब

महापौर अलका राठोड यांच्या खासगी निवासस्थानाच्या बेकायदा बांधकामाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर पुन्हा अंतिम चौकशीसाठी महापालिकेतील तीन जबाबदार अधिका-यांची समिती गठीत झाली खरी, परंतु या समितीने मुदत संपली तरी अद्याप चौकशीचा अहवाल पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना सादर केला नाही.

शिवाजीराव राऊत यांची जीवितास धोका असल्याची तक्रार

पुणे येथील महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या जमीन खरेदी व्यवहारासंदर्भातील माहिती गोळा करणारे माहिती अधिकाराचे अभ्यासक शिवाजीराव राऊत यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दोन जणांनी आपल्याला, तुम्ही या प्रकरणात थांबला नाही तर सर्व मार्गाचा अवलंब करावा लागेल, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये ५ लाखांचा ऐवज लंपास

पहाटे झोपेत असताना जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेसमध्ये आरक्षित बोगीत ४० ते ५० प्रवाशांच्या बॅगांची चोरी झाली असून, सुमारे ५ लाख रुपयांचा माल चालत्या रेल्वेतून लंपास करण्याची घटना शुक्रवारी घडली. साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने मिरज स्थानकावर संतप्त प्रवाशांनी एक तास रेल्वे रोखून ठेवली.

जयललिता व नीतेश राणे यांच्या पुतळ्यांचे सोलापुरात दहन

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशीची शिक्षा रद्द होऊन जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयात सुनावली गेल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी तिघा मारेक-यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ सोलापुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयललिता यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

मंगळवारपासून अंगणवाडय़ा बंद ठेवणार

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच राज्यातील अंगणवाडी सेविका मानधनात वाढ व्हावी या मागणीसाठी बंद ठेवणार आहेत.

सोलापूर पालिका स्थायी व परिवहन समितीवर सदस्यांच्या निवडी

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीत ८ तर परिवहन समितीच्या ६ नव्या सदस्यांची पालिका सर्वसाधारण सभेत निवड झाली. पालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर निवडले गेलेले निम्मे सदस्य जुनेच असल्याचे स्पष्ट झाले.

जवाहरलाल नेहरू योजनेतील दोनशे बसेसची आज मुहूर्तमेढ

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू मध्यम शहर विकासपुनरूत्थान महाभियानांतर्गत सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी मंजूर झालेल्या दोनशे बसेस लवकरच शहरात धावणार असून याच योजनेतून आलेल्या व्हॉल्वो मॉडेल बसचा शुभारंभ व राजेंद्र चौकातील बस आगारातील सुधारणा कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या शनिवारी दुपारी चार वाजता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.

मुस्लिम बोर्डिगच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी बेमुदत उपोषण

मुस्लिम बोर्डिगमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, एका गटाने मुस्लिम बोर्डिगच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी हवा- मुरकुटे

आगामी काळ हा निवडणुकांचा असल्याने आपल्या विचारांचा, जनतेशी बांधिलकी जपणारा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

जिल्हय़ात ८० प्रजातींचे २३ हजार पक्षी

जिल्हय़ातील पक्षी महागणनेचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. ६७ ठिकाणी करण्यात आलेल्या गणनेत ८० प्रजातींचे २२ हजार ९१४ पक्षांची त्यात गणना झाली आहे.

जगण्याच्याच शिक्षणाची समाजाला गरज- डॉ. अवचट

चुकीच्या शिक्षण पद्धतीमुळे सध्याचा समाज भरकटत चालला आहे. उपेक्षितांबद्दलच्या संवेदनाच समाज हरवून बसला आहे. आता जगावे कसे याचेच शिक्षण देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले.

ग्रामीण भागात टेक्स्टाईल पार्कद्वारे रोजगार

दिवसेंदिवस रोजगारांच्या संधी कमी होत असल्याने भविष्यात तरुणांना रोजगार देण्यासाठी तालुक्यातील जिरायती भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.

शिंदे, आझाद व डॉ. निगवेकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’

लोणी येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ येत्या सोमवारी (दि. २४) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणा-या या कार्यक्रमात या तिघांना विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

नगरपालिकेसाठी आंदोलनांचा दबाव

शेवगावला नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी नगरमध्ये उपोषण सुरू असतानाच पाठोपाठ कर्जत व नेवासे येथेही पालिका स्थापन करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त्या पुन्हा लांबणार

सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये विलक्षण उत्सुकतेचा विषय असलेल्या, तरीही प्रचंड विलंब झाल्याने वादग्रस्त ठरलेल्या ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदावरील नियुक्तीस आता निवडणूक आचारसंहितेचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

केएमटीच्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी

महापालिकेच्या परिवहन विभागाने केंद्रीय नगरविकास विभागाकडे सादर केलेल्या नवीन १०४ बस आणि पायाभूत सुविधांच्या प्रस्तावाला गुरूवारी मंजुरी मिळाली. यामुळे सध्या १३२ बस असलेल्या केएमटीच्या ताफ्यात नव्या करकरीत १०४ बसचा समावेश होणार आहे. तर पायाभूत सुविधांसाठी ७ कोटी ८० लाख रूपयांची विकासकामे होणार आहेत.

महायुतीचा तिढा सुटण्याआधीच माढय़ात खोत यांचा प्रचार सुरू

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीअंतर्गत तिढा अद्यापि कायम असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या भूमिकेत बदल करीत माढय़ाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवत प्रत्यक्ष प्रचारालाही प्रारंभ केल्याचे दिसून येते.

Just Now!
X