04 July 2020

News Flash

Ishita

ठिबक सिंचन घोटाळय़ातील ५ आरोपींना अटकपूर्व जामीन

केंद्र व राज्य शासनाच्या ठिबक सिंचन योजनेंतर्गत अनुदान वाटपामध्ये दिगंबर कदम, सत्यजित इनामदार, रामराजे मक्तेदार, रामचंद्र शेंडगे व राजेंद्र बुधनवर या व्यापा-यांनी बनावट लाभार्थी तयार करून तसे प्रस्ताव तयार करून शासनाकडून अनुदान लाटले व शासनाची सुमारे १८ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

वाकचौरे यांनी काँग्रेसची चूक पदरात घेतली- मुख्यमंत्री

भाऊसाहेब वाकचौरे यांना गेल्या वेळीच उमेदवारी देणे गरजेचे होते. मात्र आघाडीच्या राजकारणामुळे त्या वेळी ती देता आली नाही, ती आमची चूकच होती अशी कबुली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. खासदार होऊन वाकचौरेंनी त्यांची लोकप्रियता सिद्ध केली, शिवाय काँग्रेसची मागची चूकही त्यांनी आता पदरात घेतली असे ते म्हणाले.

वृद्धेचा खून, उच्चशिक्षित महिलेला अटक

बाजारपेठेतील एका राहत्या घरात रहस्यमयरीत्या सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यात अखेर पोलीस यशस्वी झाले. केवळ साडेचार-पाच ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी एका ओळखीच्याच गर्भवती महिलेनेच त्या वृद्धेचा गळा घोटल्याचे तपासात निष्पन्न झाले.

अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांना मेपर्यंत स्थगिती

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात विचारात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी जिल्हय़ातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या मे २०१४ पर्यंत स्थगित ठेवण्याचे तसेच बदल्यांचे आदेश काढले तरी त्यांना बदलीच्या ठिकाणी जूननंतर कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

उजनी कालव्यात पोहताना दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू

मोहोळ तालुक्यातील गाढवे वस्तीजवळ उजनी कालव्याच्या मुख्य वितरिकेत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहानग्या भावंडांचा पाण्यात पुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

पर्यावरण संरक्षणाचा जिल्ह्य़ाचा एकत्रित आराखडा तयार होणार

जिल्ह्य़ाच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीत अधिका-यांना दिली.

मोटारीच्या काचा फोडून चो-या करणा-या तरुणास अटक

नागरिकांनी शहरातील सावेडी रस्त्यावर पार्क केलेल्या मोटारीच्या काचा फोडून किमती ऐवज पळवणा-या तरुणाला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

‘पंचगंगा’ प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार असून त्यासाठी २८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यंदाच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ही महत्त्वपूर्ण तरतूद असणार आहे. विकासकामांचा धडाका उडवून देणाऱ्या अर्थसंकल्पाची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगडावर उत्साहात

अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात सतत नऊ दिवस सज्जनगड येथे चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची सांगता माघ वद्य नवमी अर्थात दासनवमीचा कार्यक्रम सज्जनगड येथे पार पडला.

मराठी भाषा टिकवणा-यांसाठी महाराष्ट्राने काय केले -खलप

‘गुंफण अकादमी’ ने तळागाळातील ग्रामीण लेखकांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आज गोव्यात येऊन येथील माणसं, सांस्कृतिक वारसा, भाषा, प्रेम यांचे दर्शन घडवले असल्याचे समाधान काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी व्यक्त केले.

बलात्कार, खून करणा-या दोघांना सांगलीत अटक

कूपवाड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीने बोकड चोरीस अडथळा ठरणा-या दोन शेतक-यांचा खून केला असल्याची माहिती उघडकीस आली असून दोघा आरोपींना सांगली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

एलबीटी प्रश्नावर सोलापूर चेंबरने राजकारण करू नये

सोलापुरातील व्यापारी, उद्योजक व कारखानदारांच्या अडचणी आहेत, त्या माझ्याच अडचणी आहेत. त्यामुळे एलबीटी प्रश्नावर आपण सारेजण एकत्र बसून मुख्यमंत्र्यांशी बोलू. मात्र या प्रश्नावर सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्समधील मंडळींनी राजकारण बाजूला ठेवावे. राजकारण केले तर त्यातून काही साध्य होणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केली.

दहावी परीक्षेपूर्वीच ताण; विद्यार्थ्यांची आत्महत्या

दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना मानसिक ताण आल्यामुळे एका विद्यार्थ्यांने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना शहरातील शुक्रवार पेठेत घडली. अरबाज अ. सलाम शेख (१७) असे दुर्दैवी मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

वाकचौरे यांचा पराभव अटळ- गाडे

शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. त्यांनी शिवसेनेचा केलेला विश्वासघात मतदारच सहन करणार नाहीत, असा विश्वास पक्षाचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायतीत ई-बँकिंगची क्रांती!

ग्रामपंचायत कार्यालयात ई-बँकिंगची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पंचायतराज व्यवस्थेत मोठा बदल घडवणारा तर आहेच, शिवाय ग्रामीण भागातील लोकांना ‘आधार’ देणाराही ठरेल. मात्र त्यामुळे ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढवणार आहे.

नगरपरिषदेसाठी कर्जतमध्ये कडकडीत बंद

येथे नगरपरिषद स्थापन व्हावी या मागणीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) सोमवारी पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडे बाजाराचा दिवस असूनही शहरातील व्यवहार पूर्ण बंदच होते.

महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अनैतिक संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा सूड उगवण्यासाठी तिचा खून करणाऱ्या सचिन जालिंदर चव्हाण (वय ३०, रा. पवळवाडी, पाथर्डी) या तरुणास जन्मठेपेची, तर मृत महिलेच्या अंगावरील दागिन्यांचा बेकायदा वापर केल्याच्या आरोपावरून सचिनचा भाऊ बाबासाहेब चव्हाण यास एक वर्षे कैदेची शिक्षा न्यायालयाने दिली.

कृष्णा खो-याच्या अधिका-यांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

कर्जत तालुक्यातील कुकडी डावा कालव्याच्या मुख्य वितरिकेवरील ७५, ७६, ७७ व ७८ क्रमांकाच्या चारीचे गेट अनाधिकाराने बंद करून त्याचे नुकसान करणा-या कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिका-यांवर गुन्हा नोंदवावा अशी लेखी तक्रार भाजपचे कैलास शेवाळे यांनी पोलिसांकडे केली आहे.

शहरातील उड्डाणपुलाचे शल्य- डॉ. संजीवकुमार

नगर शहरातील उड्डाणपुलाची उभारणी झाली नाही, याचे शल्य आपल्याला आहे असे सांगतानाच माजी जिल्हाधिकारी व आदिवासी कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी नगर जिल्ह्य़ातील विकासप्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भविष्यातही आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.

काँग्रेसकडून उमेदवारी निश्चितपणे- सदाशिवराव मंडलिक

काँग्रेस पक्षाकडून आपल्याला लोकसभेची उमेदवारी निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाची सोबत अखेपर्यंत करण्याचा निर्धार बोलून दाखवला.

विकासकामांच्या मुहूर्तासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न

महापालिकेत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या मुख्यमंत्र्यांच्या २० कोटीच्या विशेष निधीसह ४० कोटीच्या कामांना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मुहूर्त लाभावा, यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाकडून सुरू आहे.

माढय़ात शिंदेविरोधकांचे शक्तिप्रदर्शन; २हजार २०० बाटल्या रक्तसंकलन

माढा तालुक्यातील विविध गावांमध्ये आधार फाउंडेशनने आयोजिलेल्या रक्तदान सप्ताहात २ हजार २०० बाटल्यांचे रक्तसंकलन झाले. या रक्तदान सप्ताहाचा समारोप टेंभुर्णी येथे पंढरपूरच्या वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

बारावी परीक्षेतील कॉपीप्रकरणी दोघा पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल

बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या पेपरला कॉपी आढळून आल्याने त्याची जबाबदारी संबंधित दोघा पर्यवेक्षकांवर निश्चित करून त्यांच्याविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे हा प्रकार घडला. एम. एल. थोरात व पी. आर. धोत्रे अशी त्यांची नावे आहेत.

माजी आमदार पी.बी.पाटील यांचे निधन

नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील यांचे रविवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगलीतील शांतिनिकेतन परिवारावर शोककळा पसरली असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Just Now!
X