11 August 2020

News Flash

Ishita

सोलापुरात बारावी परीक्षेला कॉपीमुक्त वातावरणात प्रारंभ

बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी उचललेल्या कठोर पावलांमुळे सोलापूर जिल्हय़ात परीक्षेच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील अपवाद वगळता कोठेही कॉपीचा प्रकार आढळून आला नाही.

विद्वान आणि विद्यापीठांनी संशोधन कार्याला चालना द्यावी- श्रीनिवास पाटील

भारतीय विद्वान व विद्यापीठांनी सर्वदूर आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीचा ठसा उमटवला असून, नवे संशोधन प्रस्थापित केले आहे. विद्वान व विद्यापीठांनी संशोधनाच्या या कार्याला अधिक चालना द्यावी, असे आवाहन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

महापालिकेच्या २१ कोटींच्या वसुलीप्रश्नी प्रशासनाला धरले धारेवर

महापालिकेच्या घरफाळा विभागाचे उद्दिष्ट ४२ कोटी रुपये असताना सध्या केवळ २१ कोटी १७ लाख रुपये इतकीच वसुली झाली आहे. उर्वरित २१ कोटी रुपयांची वसुली कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.

आयुर्वेद महाविद्यालय बंद पडण्याची भीती

स्थापनेच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करणारे वैभवशाली गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आता मात्र कायमचे बंद पडण्याची भीती महाविद्यालयातील सहयोगी अध्यापक तथा विभागप्रमुख डॉ. श्रीधर दरेकर यांनीच व्यक्त केली आहे.

जुगार खेळण्यावरून सोलापुरात दोन गटात हाणामारी, दगडफेक

शहरात पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एकीकडे अवैध धंद्यांचे अक्षरश: पेव फुटले असताना याच अवैध धंद्यातून शास्त्रीनगरसारख्या संवेदनशील भागात दोन गटात हाणामारी होऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यात एका पोलिसासह १५ जण जखमी झाले.

वाकचौरे यांना सहन करावे लागेल- पिचड

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पूर्वी विधानसभा व जिल्हा परिषदेसाठी आमच्या विरोधात काम केले असले तरी ते आता काँग्रेसचे उमेदवार आहेत. आघाडीचे धोरण म्हणून आम्हाला त्यांना ‘सहन’ करावेच लागेल. त्यांच्याबाबत राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर काही शंका, कुशंका असतील तर त्यांच्याबरोबर चर्चा करता येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पालकमंत्री मधुकर पिचड यांनी मांडली.

पिचड यांनी अधिका-यांना खडसावले

अन्नसुरक्षा व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य या केंद्र व राज्य सरकारच्या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हय़ातील सुरुवातच अडखळती झाली आहे. योजनांमध्ये कशी लबाडी सुरू आहे, याची उदाहरणे खुद्द पालकमंत्री मधुकर पिचड यांनीच बैठकीत सादर करत असे बेभरवशाचे काम आपल्याला मान्य नाही या शब्दांत अधिकाऱ्यांना खडसावले.

संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी जहागीरदार

नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी काँग्रेसच्या जावेद जहागीरदार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यासाठी झालेल्या निवडणुकीत जहागीरदार यांना १८, तर भाजपच्या ज्ञानेश्वर कर्पे यांना ६ मते मिळाली.

विमानतळ विस्तारवाढ बाधितांची गुंठय़ाला ७ लाख ९०हजारांची मागणी

कराड विमानतळ विस्तारवाढीसाठी द्याव्या लागणाऱ्या जमिनीसाठी प्रतिगुंठा ७ लाख ९० हजार रूपये इतका दर प्रशासनाशी चर्चा करूनच निश्चित केला आहे.

श्रीरामपूर, नेवासेत पोलिसांची मोठी कारवाई

नेवासे व श्रीरामपूर ही दोन शहरे गुन्हेगारीची केंद्रे बनली आहेत, त्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक रावसाहेब िशदे यांनी घेऊन दोन्ही शहरांतील गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या भागात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.

अन्नातून ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा

तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या ओम गुरुदेव माध्यमिक विद्यालयातील ३९ विद्यार्थ्यांना पावभाजी व शंकरपाळ्यातून विषबाधा झाली.

मात्र शेवगावकरांचे उपोषण सुरूच

पालकमंत्री मधुकर पिचड व आ. चंद्रशेखर घुले यांनी आश्वासन दिल्यानंतरही शेवगावला नगरपालिका स्थापन झाल्याची प्रत्यक्ष घोषणा होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आम आदमी पार्टी व शेवगाव ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केला.

विश्रामगडावर अवतरणार शिवसृष्टी

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील विश्रामगडावर लवकरच शिवसृष्टी अवतरणार आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवसृष्टीची घोषणा केली.

शिवजयंतीनिमित्त कोल्हापुरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक

शिवजयंतीनिमित्त शहरात प्रतिमापूजन, पालखी मिरवणूक, मिरवणुका यांचे भरगच्च आयोजन करण्यात आले होते. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीने छत्रपती शाहूमहाराज यांचे नातू यशराज युवराज यांनी शिवजयंती उत्सव सोहळय़ात भाग घेतला. मुस्लिम बांधवांच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली.

ट्रकची धडक, तिघेजण जागीच ठार

ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे तिघे बांधकाम कामगार जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी दुपारी बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथे घडला.

डॉ. डी. एस. एरम यांनी सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली

सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवेचे व्रत तसेच, समाजहितार्थ समाजकारण आणि राजकारणात उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून ठसा उमटवणाऱ्या (कै.) डॉ. द. शि. एरम यांनी शारदा क्लिनिक हे लावलेले रोपटे आज वटवृक्ष झाला आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी असून, वैद्यकीय क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

साता-यात शिवजयंती उत्साहात साजरी

सातारा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवरायांची जयंती मोठय़ा उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या निनादानी साता-याचे वातावरण शिवमय झाले होते.

राजकीय वादातून मारामारी, युवक ठार

पाणी न सोडण्याच्या प्रश्नाचे राजकारण होऊन त्यातून झालेल्या मारहाणीत एक युवक ठार झाला. हा प्रकार शेळोली (ता. भुदरगड) येथे मंगळवारी रात्री घडला. सत्तारूढ राष्ट्रवादी व विरोधी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी होऊन त्यामध्ये अश्विन आनंदराव देसाई (वय ३०) हा ठार झाला.

शिर्डीसाठी लोखंडे व कानडे यांची नावे

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कोलांटउडीमुळे शिवसेनेने लगेचच उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्यादृष्टीने चाचपणी केली.

खा. वाकचौरेंचा शिवसेनेकडून निषेध

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त समजताच शिर्डी व राहाता येथे त्यांचे तीव्र पडसाद उमटले. संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळय़ाचे दहन करून या पक्षांतराचा निषेध केला.

शिवजयंती उत्साहात साजरी

तारखेप्रमाणे आलेली छत्रपती शिवाजीमहाराज जयंती बुधवारी शहरासह जिल्ह्य़ात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली होती. नगर शहरात सकाळी मोठी व दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली.

‘त्या’ महिला पोलीस अधिका-याचा अखेर माफीनामा!

नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात गोंधळ घातलेल्या नगर जिल्ह्यातील वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याने अखेर लेखी माफीनामा लिहून देत या विषयावर पडदा टाकला. या महिला अधिका-याने परिचारिकेसही मारहाण केली होती.

कष्टक-यांच्या मागण्यांसाठी माकपचे उपोषण

कष्टकरांच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तालुक्यातील देवठाण येथे सोमवारपासून सहा कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

खगोलप्रेमींना शुक्रवारी मेजवानी

येथील ‘द व्हर्सटाइल ग्रुप’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) ‘ओळख दुर्बिणीची’ कार्यक्रमाच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी व्याख्यान व आकाशदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जीएमआरटी, खोडद संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक सुधीर फाकटकर यांचे व्याख्यान होणार आहे.

Just Now!
X