येत्या काही महिन्यात मारुती सुझुकीच्या अनेक गाड्या एकाच वेळी लाँच होणार आहेत. कंपनी २९ किंवा ३० जून रोजी आपला न्यू ब्रेजा २०२२ (New Brezza 2022) लाँच करणार आहे. नवीन ब्रेझामध्ये नवीन इंजिनसह अनेक बदल अपेक्षित आहेत. नवीन अहवालानुसार, मारुतीने अनेक डीलरशिपवर २०२२ विटारा ब्रेजा (2022 Vitara Brezza) चे बुकिंग सुरू केले आहे. ग्राहक ५,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही कार बुक करू शकतात. ग्राहक त्यांच्या जवळच्या डीलरशिपवर बुकिंग तपशील देखील तपासू शकतात.
सीएनजी व्हेरियंटही येणार
नवीन विटारा ब्रेझाच्या डिझाईनमध्येही बदल पाहायला मिळतील. नवीन ग्रिल, बंपर आणि हेडलाइट डिझाइन व्यतिरिक्त, याला हुडवर नवीन क्लॅमशेल स्टाइलिंग आणि नवीन फ्रंट फेंडर्स मिळतील. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागील दरवाजामध्ये बदल पाहण्यात आले आहेत. त्याची नंबर प्लेटही खालच्या स्थानावर लावण्यात आली आहे. नवीन ब्रेझाला नवीन रॅपराउंड टेललाइट्स आणि पुन्हा डिझाइन केलेले बंपर मिळतात. नवीन जनरेशन ब्रेझा पेट्रोल प्रकारात आणण्याव्यतिरिक्त, मारुती सुझुकी लवकरच त्याचे सीएनजी (CNG) प्रकार देखील सादर करणार आहे. म्हणजेच ज्या ग्राहकाला या एसयुव्ही (SUV) मधून जास्त मायलेज हवे असेल, त्याला त्याचा पर्याय मिळेल.
(हे ही वाचा: ‘या’ कारने मार्केटमध्ये घातलाय धुमाकूळ; ७८ हजार लोक गाडीच्या डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत)
(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)
अत्याधुनिक फीचर्स
ब्रेझा २०२२ च्या इंटिरिअरलाही एक फ्रेश लुक देण्यात आला आहे. नवीन ब्रेझा फॅक्टरी फिट सनरूफ आणि ३६०-डिग्री कॅमेरासह येईल. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी एसयूव्हीच्या टॉप-एंड प्रकारांमध्ये कनेक्टेड कार टेक, वायरलेस चार्जिंग सिस्टम, पॅडल शिफ्टर्स यांसारखी फीचर्स देऊ शकते. यासोबतच स्मार्टफोन सपोर्टसह सर्व-नवीन फ्री स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक एसी युनिट आणि सर्व-नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इंटीरियरमध्ये दिले जातील. नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ८ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.