Mahindra XUV700 Bumper Sale In India: भारतात कॉम्पॅक्ट एसयूवी (SUV) च्या बंपर विक्रीला काउंटर देण्यासाठी, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी नवीन मध्यम आकाराची एसयूवी एक्सयूवी ७०० (SUV XUV700) लाँच केली. गेल्या ८ महिन्यांत महिंद्रा एक्सयूवी ७०० च्या ३० हजारांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत आणि सुमारे ८० हजार लोक या डिलिव्हरीची वाट पाहत आहेत. १३.१८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत या मिडसाईज एसयूव्हीचे किती प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यातील खास वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घ्या.

दर महिन्याला १० हजार युनिट्सचे बुकिंग

महिंद्रा एक्सयूवी ७०० ची सप्टेंबर २०२१ मध्ये लाँच झाल्यापासून सातत्याने चांगली विक्री होत आहे. बुकिंग सुरू होताच या एसयूव्हचे अवघ्या काही तासांतच तिचे ५० हजारांहून अधिक युनिट्स बुक झाले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एक्सयूवी ७०० साठी प्रतीक्षा कालावधी १५-१८ महिने आहे. या एसयूव्हीला आतापर्यंत एक लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत आणि दर महिन्याला सुमारे १० हजार लोक कार बुक करतात. वास्तविक पाहता ही एसयूवी जितकी शक्तिशाली आहे तितकीच तिचे फीचर्सही जबरदस्त आहेत. वरून महिंद्राचा आत्मविश्वास, हे सर्व घटक महिंद्राला मध्यम आकाराच्या एसयूवी विभागातील ह्यूंदइ (Hyundai) आणि टाटा (Tata) मधील एसयूवी पेक्षा वेगळे करतात.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

(हे ही वाचा: सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध)

(फोटो: financial express)

किंमत आणि फीचर्स

शक्तिशाली कंट्री एसयूव्ही महिंद्रा एक्सयूवी ७०० बद्दल बोलायचे तर, ते MX, AX (AdrenoX), AX3, AX5 आणि AX7 सारख्या ट्रिम लेव्हलच्या २३ प्रकारांमध्ये सादर केली गेली आहे आणि त्यांची किंमत १३.१८ लाख ते २४.५८ लाख रुपये आहे. एक्सयूवी ७०० हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये ऑफर केले जाते, जे १८५PS पर्यंत पॉवर आणि ४५०Nm टॉर्क जनरेट करते. ५ आणि ७ सीटर सेगमेंटची ही एसयूवी ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांमध्ये देण्यात आली आहे.

(फोटो: financial express)

या एसयूवी ची AX7 AT ट्रिम ऑल व्हील ड्राइव्हट्रेनशी जुळलेली आहे. एक्सयूवी ७०० मध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा आणि ADAS यासह अनेक फीचर्सचा समावेश आहे.