दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही फक्त तुम्हाला शिव्या देऊ, अटक करणार नाही, असे मोदींनी सोनिया गांधींना सांगितले आहे. या मोबदल्यात सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदी यांच्या पदवी प्रकरणाबद्दल मौन बाळगून आहे. हे म्हणजे काँग्रेस आणि भाजपमधील साटेलोटे असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आम आदमी पक्षातर्फे (आप) आज दिल्लीत ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्द्यावरून जोरदार निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘एमए फर्स्ट क्लास’ 
यावेळी केजरीवाल यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने उल्लेख केलेल्या सर्वांना अटक करा आणि त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, केजरीवाल यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पदवी प्रकरणावरून लक्ष्य केले. मोदी यांच्याकडे खरी पदवी नसेल तर त्यांनी एकदा देशवासियांची माफी मागावी. देशाला बीए किंवा एमए असलेल्या पंतप्रधानाची नव्हे तर सच्च्या पंतप्रधानाची गरज असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
मोदींची पदवी वेबसाईटवर प्रसिद्ध करा, केजरीवाल यांची दिल्ली विद्यापीठाकडे मागणी 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp and congress have internal setting over agustawestland says arvind kejriwal