Congress President Election: अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंकडून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा | Congress President Election Mallikarjun Kharge resigns as Leader of Opposition in Rajya Sabha sgy 87 | Loksatta

Congress President Election: अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय

काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगेंकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

Congress President Election: अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे(PTI)

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी शनिवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. उदयपूरमध्ये झालेल्या ‘एक नेता, एक पद’ ठरावाचं पालन करत खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. खरगे यांच्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांची नावं चर्चेत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात लढत होणार आहे. सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे, तसंच ‘जी-२३’ या बंडखोर गटातील नेत्यांनीही खरगे यांच्या नावाला पसंती दिली असल्याने तेच नवे पक्षाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

खरगे विरुद्ध थरूर लढत; काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल

अशोक गेहलोत यांनी माघार घेतल्यानंतर, गुरुवारी रात्री संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि ए. के. अ‍ॅण्टनी यांनी सोनिया गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खरगे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. खरगेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी दिग्विजय सिंह यांनी खरगेंची भेट घेतली होती; पण आपण पक्षाध्यक्षपदासाठी उत्सुक नसल्याचे खरगेंनी सांगितलं होतं. मात्र, सोनिया गांधी यांनीच खरगेंच्या नावाला पाठिंबा दिल्यामुळे खरगे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार झाले.

‘जी-२३’ नेते ऐन वेळी खरगेंच्या मागे

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर शुक्रवारी वाजतगाजत पक्षाच्या मुख्यालयात आले; पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. बंडखोर नेते ‘तटस्थ’ राहिलेल्या सोनिया गांधींचे उमेदवार खरगे यांच्या शेजारी उभे होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“हा SP कोण आहे?,” अशोक गहलोत यांच्या सोनिया गांधी भेटीमधील ‘तो’ कागद लीक, चर्चांना उधाण

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा