Sub-Divisional Magistrate अर्थात उपविभागीय दंडाधिकारी महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. निशा नापित असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. निशाचा पती गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार होता. त्याने तिची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला असं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात निशा नापित यांच्या पतीला अटक करण्यात आली आहे. मनिष शर्मा असं या आरोपीचं नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये असलेल्या डिंडौरी जिल्ह्यातली ही घटना आहे. उपविभागीय दंडाधिकारी म्हणून निशा नापित याछ ठिकाणी कार्यरत होत्या. त्यांच्या बेरोजगार पतीने म्हणजेच मनिष शर्माने पत्नी निशाची उशीने तोंड दाबून हत्या केली. तसंच त्याने पुरावे मिटवण्यासाठी पत्नीचे कपडे, उशीचं कव्हर, पलंगावरची चादर हे सगळं वॉशिंग मशीनमध्ये ठेवून धुतलं होतं. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. निशा नापित यांनी त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये, बँक खात्यांमध्ये आणि विमा पॉलीसींमध्ये वारस म्हणून आपलं नाव दिलं नव्हतं हा राग मनिषच्या मनात होता. असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How a washing machine helped catch man who killed bureaucrat wife scj
First published on: 30-01-2024 at 08:40 IST