Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका वाढत असतानाच समोर आली दिलासादायक आकडेवारी; मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच…

महाराष्ट्रामध्ये देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत. देशामधील ओमायक्रॉनबाधितांची संख्या २३ वर पोहचलीय.

Coronavirus India
आरोग्यमंत्रालयाने जारी केली आकडेवारी

जगभराबरोबरच भारतामध्येही करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूची दहशत असतानाच करोनाबाधितांच्या आकडेवारीसंदर्भातील एक दिलासादायक बातमी समोर आलीय. भारतामध्ये मागील ५५८ दिवसांमध्ये म्हणजेच मागील दीड वर्षांमध्ये पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण आढळून आल्याचं आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटलं आहे.

भारतात सोमवारी ६ हजार ८२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी दिवसभरात १० हजार चार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मागील ५५८ दिवसांमध्ये २४ तासांत आढळून आलेली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. २४ तासांमध्ये करोनामुळे २२० जणांचा मृत्यू झालाय. भारतात सध्या ९५ हजार १४ रुग्ण करोनाबाधित असून हा अॅक्टीव्ह केसेसचा लोडही ५५४ दिवसांमधील सर्वात कमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंडळाने ही आकडेवारी जारी केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्याचप्रमाणे भारतामधील १२८ कोटी ७६ लाख लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सोमवारी देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत शिरकाव केला आहे. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या दहावर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या २३ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?
महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India reports 6822 new cases lowest in 558 days scsg

Next Story
चिंता वाढवणारी बातमी! देशात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित महाराष्ट्रात; पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी