चार राज्यांमधील विजयाने जुलै महिन्यात होणारी राष्ट्रपतिपदाची निवडणूक भाजपसाठी सोपी झाली आहे. या निकालाने भाजपला मित्र पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशमध्ये संख्याबळ घटले असते तर भाजपला मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागले असते. पाच राज्यांमधील एकूण ६९० जागांपैकी ३५० जागा भाजपने जिंकल्या आहेत. उत्तर प्रदेशात भाजपला २५० जागांवर यश मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे २०८ आहे. भाजप व मित्र पक्षांच्या मतांच्या आधारे एकूण ८३,८२४ मतांच्या मूल्यापैकी भाजपला ५८ हजारांच्या आसपास मते मिळू शकतात. उत्तर प्रदेशातील यशाने भाजप राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत निर्धास्त राहू शकेल.

उत्तर प्रदेशच्या तुलनेत उत्तराखंड, गोवा किंवा मणिपूरमधील मतांचे मूल्य हे कमी आहे. पण तिन्ही राज्यांमध्ये एकूण मतांच्या मूल्याच्या निम्म्यापेक्षा अधिक मते भाजपला मिळतील.

देशात सर्वाधिक मतांचे मूल्य हे उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश जिंकल्याने भाजपचे मतांचे गणित जुळते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presidential election victory states bjp uttar pradesh friendly parties akp