:

Lok Sabha Election Results 2024 : आज देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली आणि या निवडणूकीचा निकाल आज ४ जून रोजी जाहीर होणार आहे. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागलं आहे. संपूर्ण देशात एनडीए आणि इंडियामध्ये चुरशीची लढत बघायला मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भाजप नेते पीयुष गोयल यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

पीयुष गोयल यांची प्रतिक्रिया

पीयुष गोयल प्रसार माध्यमाशी बोलताना सांगतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमच्या एनडीएच्या सर्व घटकांनी खूप चांगल्या प्रकारे निवडणूक लढवली आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप लोकप्रियता आहे. त्यांनी दहा वर्षे सेवाभावातून भेदभाव न करता गरीबांचा विकास केला, महिलांना सन्मान मिळवून दिला, देशातील तरुणींना खूप चांगल्या संधी देण्याचे काम केले आणि आपल्या शेतकऱ्यांना एक चांगल्या भविष्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य केले.”

ते पुढे म्हणाले, “आज भारत अमृतकाळात विकसित भारत बनण्यासाठी नवीन संकल्प घेण्यास सक्षम आहे. देशातील नागरिक पूर्णपणे नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद देण्यासाठी या निवडणूकीत उतरली होती आणि मला पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मोदी सरकार २४/७ सातही दिवस देशाची सेवा करत २०४७ विकसित भारत पर्यंत बनवण्याचा प्रयत्न करेन. ज्यासाठी नरेंद्र मोदींनी संकल्प घेतला आहे आणि एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली आहे. त्यांना आज मतदारांकडून आशीर्वाद मिळेल आणि देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक प्रामाणिक,कर्तृत्ववान, आणि एकमत सरकार स्थापन होईल.”

हेही वाचा : Goa Lok Sabha Election 2024 Result Live Updates: गोवा लोकसभा मतदारसंघातून कोण मारणार बाजी? उत्कंठा वाढली

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : पियूष गोयल यांच्या पहिल्याच प्रचारसभेत घुमला मतदारांचा सूर, “मुंबईचा आवाज आता दिल्लीत!”

केंद्रिय मंत्री पीयुष गोयल लोकसभा निवडणूक २०२४ साठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. पीयुष गोयल भाजपच्या लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. सध्याचा निवडणूकीचा कल बघता सध्या ते उत्तर मुंबई मतदारसंघातून आघाडीवर आहे.

भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या.

भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. आता या वेळी काय निकाल लागतो? एकट्या भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.