Account Statement : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या ग्राहकांना ऑनलाइन वेबसाइट, ॲप आणि फोनवर अनेक सुविधा ऑफर करते; ज्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष शाखेला भेट देण्याची आवश्यकता भासत नाही. अशीच एक सुविधा म्हणजे अकाउंट स्टेटमेंटची माहिती घेणे. या सुविधेद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना तारीख किंवा कोणताही महिना आणि वर्षासाठी ऑनलाइन अकाउंट स्टेटमेंटची माहिती जाणून घेण्याची परवानगी देते. अकाउंट स्टेटमेंटची माहिती ऑनलाइन पाहू शकता, त्याची प्रिंट काढू शकता तसेच एक्सेल किंवा पीडिएफ फाइल म्हणून सेव्ह करू शकता. आज आपण कॉलद्वारे अकाउंट स्टेटमेंटची माहिती कशी मिळवावी? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (how to get account statement information through call five steps to know information easily)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉलवर अकाउंट स्टेटमेंटची माहिती कशी मिळवावी?

ग्राहकांच्या अधिक सोईसाठी, एसबीआय ग्राहकांना कॉलवर अकाउंट स्टेटमेंटची माहिती मिळवण्याचीसुद्धा परवानगी देते. त्यानंतर तुम्हाला अकाउंट स्टेटमेंटची माहिती देणारा ईमेल येतो. त्यासाठी कॉलवर तुमच्या अकाउंट स्टेटमेंटसाठी विनंती करावी लागते.
एसबीआय सेंटर टोल-फ्री क्रमांक १८०० १२३४ किंवा १८०० २१०० डायल करा आणि ईमेलद्वारे तुमच्या अकाउंट स्टेटमेंटची माहिती मिळवा.

कॉलद्वारे एसबीआय अकाउंट स्टेटमेंटची माहिती मिळवण्यासाठी ५ सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून SBI सेंटर टोल फ्री क्र. १८०० १२३४ किंवा १८०० २१०० वर कॉल करा.

२. अकाउंट बॅलेन्स आणि ट्रान्झॅक्शन डिटेल्ससाठी १ दाबा

३. तुमच्या अकाउंट नंबरचे शेवटचे ४ अंक टाइप करा.

४. अकाउंट स्टेटमेंट मिळविण्यासाठी २ दाबा

५. त्यानंतर अकाउंट स्टेटमेंटचा कालावधी निवडा

अकाउंट स्टेटमेंटची माहिती नोंदणीकृत ई-मेल अकाउंटवर शेअर केली जाते.
त्याशिवाय एसबीआय ग्राहक योनो ॲपवरून किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अकाउंट स्टेटमेंट मिळवू शकतात. पीडीएफ फॉरमॅटमध्ये एसबीआय बँकेचे स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग युजर्स असणे आवश्यक आहे.

या माहितीच्या आधारे तुम्ही घरबसल्या आणि अगदी सोप्य पद्धतीने अकाउंट स्टेटमेंटची माहिती जाणून घेऊ शकता.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to get account statement information through call five steps to know information easily ndj