India vs Bangladesh T20 World Cup 2024 Match Updates: टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ फेरीतील सामने खेळवले जातील. आज म्हणजेच २२ जूनला भारत वि बांगलादेश हा सामना अँटिगामध्ये सुरू आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाने फलंदाजीला उतरत सामन्याला सुरूवात केली आहे. टी-२० विश्वचषकातील प्रत्येक सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत गायले जाते आणि मग सामन्याला सुरूवात केली जाते. त्याचप्रमाणे भारत बांगलादेश सामन्याचीही राष्ट्रगीतासह सुरूवात झाली.

एकाच महाकवीनं लिहिलेल्या दोन राष्ट्रगीतांनी भारत बांग्लादेश सामन्याला सुरुवात झाली. आपल्या भारत देशाचा गौरव करणारे आणि देशाप्रती आपल्यामधील आदर आणि देशावरील आपले प्रेम शब्दात मांडणार भारताचं राष्ट्रगीत म्हणजे जन गण मन. या राष्ट्रगीताचे बोल ऐकले तरी उर अभिमानाने भरून येतो अशा या भारताच्या राष्ट्रगीताचे बोल महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचे राष्ट्रगीतही रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलं आहे.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव कवी आहेत ज्यांनी दोन देशांची राष्ट्रगीतं लिहिली. त्यांनी भारताचं ‘जन गण मन’ आणि बांगलादेशचे ‘आमार सोनार बांग्ला’ लिहिलं. “आमार सोनार बांग्ला” हे बांगलादेशचे राष्ट्रगीत १९०५ साली बंगालच्या फाळणीनंतर लगेचच बंगालची स्तुती म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते. बांगलादेश मुक्तीदरम्यान, गाण्याच्या पहिल्या १० ओळी १९७१ मध्ये देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या गेल्या. ‘जन गण मन’ हे भारताचं राष्ट्रगीत मूळ बंगालीमध्ये ”भारतो भाग्यो बिधाता” म्हणून लिहिलेले, २४ जानेवारी १९५० रोजी हे गीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले. क्रिकेट विश्वचषकामध्ये सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते टागोरांनी रचलेले राष्ट्रगीत म्हणत आपल्या देशाप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात.

हेही वाचा – T20 WC 2024: आतापर्यंत सगळे सामने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला गाशा गुंडाळावा लागू शकतो, असं आहे समीकरण

भारत-बांगलादेश सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत आहे. भारताकडून रोहितने पहिल्या षटकापासून आक्रमक फलंदाजी केली खरी पण झटपट टॉप फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. रोहित शर्ममा २३, विराट कोहली ३७, तर सूर्यकुमार यादव ६ धावा करतबाद झाला. प्रत्येक सामन्यामध्ये ज्याप्रमाणे ऋषभ पंतने संघाला महत्त्वपूर्ण धावा करून दिल्या, यासामन्यातही महत्त्वपूर्ण ३६ धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. तर हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी कामगिरीसह भारताने धावाचा डोंगर उभारला. तर शिवम दुबेनेही पंड्याला चांगली साथ दिली. यासह भारताने ५ बाद १९६ धावा केल्या आहे.