टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि आयर्लंड सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आयर्लंडने १९.२ षटकात १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४.३ षटकांत ५ बाद १०५ धावांवर खेळत असताना मध्येच पावसाने व्यत्यय आणला आणि त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंड पाच धावांनी मागे राहिला. या स्पर्धेत आयर्लंडने दुसरा अपसेट केला आहे. याआधी त्याने दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजला पहिल्या फेरीत नॉकआउट केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जरी या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला असला तरी आयर्लंडने इंग्लंडला फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाही चांगलेच झुंजवले होते. विशेष म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जॉश बटलरने सामन्यापूर्वीच आयर्लंड आम्हाला या सामन्यात कडवी टक्कर देऊ शकतो असे म्हणाला होता. त्याची ही भीती आयर्लंडने खरी करून दाखवली.

आयर्लंडने धक्कादायकरित्या केलेल्या इंग्लंडच्या पराभवावर आता जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात इंग्लंडचा माजी कर्णधार याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,”आधी वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता इंग्लंडला हरवले त्यामुळे अ गटात आता अधिक चुरस निर्माण झाली आहे.”  

वीरेंद्र सेहवागने तर मजेदार ट्विटरवर ट्विट करत म्हटले की, ”आर्यलँडला जरी पावसाने मदत केली असली तरी ते या विजयाचे खरे हकदार आहेत.”असे म्हणत त्याने आयर्लंड संघाचे कौतुक केले आहे.

या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना नावाला साजेसी खेळी करता आला नाही. कर्णधार जोस बटलर (००) आणि अ‍ॅलेक्स हेल्स (०७) बाद झाले. जोशुआ लिटलने दोघांनाही बाद केले. फिओन हँड क्लीन बोल्ड बेन स्टोक्स (०६). २१ चेंडूत १८ धावा करून हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान ३७ चेंडूत ३५ धावा करून बाद झाला. मॅकार्थीच्या चेंडूवर फिओन हँडने त्याचा झेल घेतला. मोईन अली १२ चेंडूत २४ धावा करून नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोन दोन चेंडूत एका धावेवर नाबाद राहिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many legendary cricketers around the world have expressed different reactions to irelands shocking defeat to england avw