Premium

IND vs AUS Video: इथे ऑस्ट्रेलियाला हरवलं अन तिथे चाहते ओरडले RCB.. RCB; कोहलीच्या उत्तराने मन जिंकलं

IND vs AUS Highlights: भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. यानंतर जेव्हा विराट कोहली स्टेडियमच्या बाहेर आला…

IND vs AUS Viral Video Virat Kohli
IND vs AUS Viral Video Virat Kohli

IND vs AUS Highlights: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या फॅन्सची संख्या अफाट आहे. केवळ स्टेडियममध्येच नाही तर सोशल मीडियावरही याची प्रचिती येते. अलीकडेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या नंतर विराट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. करो या मरोच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. यानंतर जेव्हा विराट कोहली स्टेडियमच्या बाहेर आला आणि अपेक्षेप्रमाणे तिथे चाहत्यांची गर्दी होती. विराटला पाहताच चाहत्यांनी चक्क आरसीबीच्या नावाने जयघोष सुरु केला यावर विराटने दिलेली प्रतिक्रिया अनेकांचं मन जिंकून गेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की विराट कोहलीसोबत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू हर्षल पटेल सुद्धा दिसून येत आहे. कोहलीला पाहून चाहत्यांनी आरसीबीच्या नावाने आरोळ्या दिल्यावर विराटने त्याच्या जर्सीकडे बोट करून भारताचा म्हणजेच टीम इंडियाचा लोगो दाखवला. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नाही तर देशासाठी खेळत आहे असं सांगणारी विराटची ही कृती चाहत्यांचं मन जिंकून गेली.

विराट कोहलीने मन जिंकले

IND vs AUS Highlight: आधी पार गळा धरला आणि आता.. रोहित शर्माला पाहून नेटकरी म्हणतात “हा कर्णधार…

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात रोहितच्या ब्रिगेडला हार पत्करावी लागली होती त्यानंतर नागपूरच्या सामन्यात विजय मिळवणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. विदर्भ स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ षटकात ६ गडी गमावून ९० धावा केल्या. टीम इंडियाच्या फलंदाजीची फळी मजबूत असल्याने या धावा फार मोठे लक्ष्य नव्हते मात्र वास्तविक सामन्यात रोहित शर्माने केलेल्या ४६ धावा वगळता अन्य खेळाडू फार उत्तम कामगिरी करू शकले नाहीत. रोहितला या सामन्याचा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेतील शेवटचा सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus viral video virat kohli fans shout rcb at stadium harshal patel rohit sharma svs

First published on: 25-09-2022 at 09:52 IST
Next Story
Video : दिप्ती शर्माने घेतलेल्या बळीमुळे नवा वाद, इंग्लंडच्या खेळाडूला मैदानावरच कोसळलं रडू; सामन्यात नेमकं काय घडलं?