India vs England 3rd Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने बेन डकेटच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ३५ षटकानंतर २ बाद २०७ धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंड भारताच्या तुलनेत २३८ धावांनी पिछाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेट आणि जो रूट नाबाद परतले. बॅन डकेट १३३ धावा करून खेळत आहे. तर जो रूट ९ धावा करून क्रीजवर आहे. भारताकडून रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाले. रवी अश्विनने सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद केले. यासह रवी अश्विनने कसोटीत ५०० बळींचा आकडा गाठला. जॅक क्रॉलीने १५ धावा केल्या. ओली पोप ३९ धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला.

बेन डकेटचे वेगवान शतक –

बेन डकेटने इंग्लंडच्या बॅझबॉल रणनीतीचे पूर्णपणे पालन केले आणि केवळ ८७ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे भारतातील पहिले शतक असून त्यात त्याने विक्रम केला आहे. ८८ चेंडूत शतक हे भारतातील कसोटीत इंग्लिश फलंदाजाचे सर्वात जलद शतक आहे. त्याचबरोबर परदेशी फलंदाजाचे हे तिसरे जलद शतक आहे. ॲडम गिलख्रिस्टने २००१ मध्ये भारतात ८४ चेंडूत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईडने १९७४ मध्ये ८५ चेंडूत शतक झळकावले होते. डकेटने १२ वर्षांपूर्वी बेंगळुरूमध्ये रॉस टेलरने झळकावलेल्या ९९ चेंडूंच्या शतकाला मागे टाकले आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

हेही वाचा – शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला

भारताचा पहिला डाव –

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला ३३१ धावांवर सहावा धक्का बसलाकुलदीप यादव ४ धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. यानंतर रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल १०४ चेंडूत ४६ धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन ३७ धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने २६ धावांचे उपयुक्त योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 3rd test chasing india 445 runs england finally scored 207 runs for 2 wickets on the second day vbm