India vs West Indies Team Announcement : भारतीय क्रिकेट संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट मालिका खेळणार आहे. तिन्ही मालिका कॅरेबियन भूमीवर खेळवल्या जातील. यापैकी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकांसाठी बीसीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्माच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीने दोन्ही मालिकांसाठी संतुलित संघाची निवड केली आहे. या संघांमध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना सधी देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयने भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघांमध्ये ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. तर पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेकडे भारतीय कसोटी संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर एकदिवसीय संघाचं उपकर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवलं आहे. तसेच आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. यासह मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी आणि इशान किशनलाही संधी देण्यात आली आहे. किशनने अद्याप कसोटी पदार्पण केलेलं नाही. या दौऱ्यात त्याची प्लेईंग इलेव्हनमध्ये वर्णी लागू शकते. इशानला एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही संघांमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

अजिंक्य रहाणेनं तब्बल दीड वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. पुनरागमनाच्या सामन्यात अजिंक्यने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पहिल्या डावात ८९ तर दुसऱ्या डावात ४६ धावांची खेळी केली होती. या सामन्यात तो भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच आयपीएल २०२३ मध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. हे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं दमदार पुनरागमन पाहून बीसीसीआयने अजिंक्यला पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त केलं आहे.

हे ही वाचा >> वीरेंद्र सेहवागने अखेर मौन सोडले! म्हणाला, “BCCI ने मुख्य निवडकर्ता बनण्यासाठी म्हणून मला…”

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India test squad vs west indies announced ajinkya rahane become vice captain again ruturaj gaikwad asc