IPL 2022 MI vs KKR Playing XI : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५६ वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सायंकाळी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. प्लोऑफर्यंत पोहोचायचे असेल तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावाच लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबई संघ याआधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून या संघाकडे गमावण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे आजचा सामना चांगला चुरशीचा होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> IPL 2022 : बॅटिंगला जाण्यापूर्वी धोनी का खातो आपली बॅट? सह खेळाडूने केला खुलासा

गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता संघ नवव्या स्थानी आहे. या संघाने एकू ११ सामन्यांपैकी चार सामन्यांत विजय नोंदवला असून या संघाला ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. कोलकाताच्या नावावर आठ गुण आहेत. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण दहा सामने खेळले असून यापैकी फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आलेला आहे. या संघाने एकूण आठ सामने गमावले आहेत.

हेही वाचा >> दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून विराट कोहली झाला थक्क, ‘डीके दादा’ला केलं थेट नमन, पाहा व्हिडीओ

कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत आजचा सामना जिंकावा लागेल. आजच्या सामन्यात मुंबईचा विजय झाला तर कोलकाता संघ स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे कोलकातासमोर आजच्या सामन्यात म्हणजे ‘करो या मरो’ अशीच स्थिती आहे.

हेही वाचा >> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद

मुंबई संघाने याआधीच्या राजस्थानविरोधातील सामन्यात चांगली कामगिरी केली होती. सलामीला आलेल्या इशान किशन आणि रोहित शर्मा या जोडीने चांगल्या धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यातही ही जोडी चांगली खेळी करेल अशी अपेक्षा आहे. या संघाने मागील काही सामन्यांत गोलंदाजीही चांगली केली आहे. बुमहारहसारखे चांगले गोलंदाज मुंबईकडे आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा मुंबई संघ पूर्ण प्रयत्न करेल.

हेही वाचा >> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल

तर दुसरीकडे कोलकाता संघाने यापूर्वी प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही हा संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार का हे पाहावे लागेल. या संघातील श्रेयस अय्यर वगळता अन्य फलंदाज फॉर्ममध्ये नाहीयेत. त्यामुळे आजच्या सामन्यात केकेआर संघ काय कमाल करणार हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा >> राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?

मुंबई इंडियन्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

हेही वाचा >> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, श्रेयस अय्यर (कर्णधार), अनुकुल रॉय, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी, शिवम मावी/उमेश यादव

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 mi vs kkr playing 11 match prediction know who will win prd