scorecardresearch

राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?

राजस्थान रॉयल्स हा संघा चांगल्या स्थितीत आहेत. हा संघ १४ गुण कमवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

Shimron Hetmyer
शिमरॉन हेटमायर मायदेशी परतला आहे (फोटो- राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाऊंवरुन साभार)

आयपीएलच्या सर्वच लढती सध्या अटीतटीच्या होत आहेत. प्लोऑफपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच संघांना विजय आणि पराभव महत्त्वाचा ठरतोय. असे असताना आता राजस्थान रॉयल्स संघातील दिग्गज खेळाडू शिमरॉन हेटमायरने मोठा निर्णय घेतला आहे. तो बायोबबलमधऊन बाहेर पडला असून आपल्या मायदेशी परतला आहे.

हेही वाचा >> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ

राजस्थान रॉयल्सचा दिग्गज खेळाडू शिमरॉन हेटमायर याने बायोबबल सोडण्याचा निर्णय घेतला. तो आयपीएल सोडून त्याच्या गयाना येथील घरी गेला आहे. शिमरॉनने आयपीएल सोडण्याचं कारणही तसं खास आहे. कारण त्याच्या पत्नीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला असून तो पहिल्यांदाच बाबा झाला आहे. आपल्या पहिल्यावहिल्या बाळाला पाहण्यासाठी तो आपल्या घरी गेला आहे. लवकरच तो परतणार आहे. तशी माहिती खुद्द हेटमायरने दिली असून त्याचा एक व्हिडीओदेखील राजस्थान रॉयल्सने समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

हेही वाचा >> Delhi Capitals Corona : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला करोनाची लागण, सामन्याला काही तास शिल्लक असताना संघ अडचणीत

दरम्यान, राजस्थान रॉयल्स हा संघ सध्या चांगल्या स्थितीत आहेत. हा संघ १४ गुण घेत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यापुढे एक सामना जिंकल्यानंतर राजस्थान प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करेल. दुसरीकडे शिमरॉन हेटमायरने याआधीच्या पंजाबविरोधातील सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली आहे. त्याने १६ चेंडूंमध्ये ३१ धावांची नाबाद खेळी करत राजस्थानला विजय मुळवून दिला. शिमरॉनचे संघातील स्थान फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजस्थानला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajasthan royals player shimron hetmyer leave ipl 2022 and bio bubble to see his first child prd

ताज्या बातम्या