मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चर ठरणार हुकमी एक्का? वेगवान चेंडूवर सराव करताना रोहित-इशानला भरली धडकी, पाहा Video

राजस्थान रॉयल्ससाठी हुकमी एक्का ठरलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या १६ व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत दिसणार आहे.

Jofra Archer Bowling In Mumbai Indians Practice Session
जोफ्रा आर्चरची भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडीओ (Image-Twitter)

Jofra Archer Bowling Viral Video : राजस्थान रॉयल्ससाठी हुकमी एक्का ठरलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागेवर संदीप वारियरला मैदानात उतरणार आहे. दरम्यान, विरोधी संघाच्या फलंदाजांवर वेगवान मारा करण्यासाठी जोफ्रा आर्चर सज्ज झाला आहे. रविवारी २ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर विरोधात होणाऱ्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कंबर कसत आहेत. कारण सराव सामन्याचा एक जबरदस्त व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मुंबई इंडियन्सने ट्वीटरवर शेअक केलेल्या व्हिडीओत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भेदक मारा करताना दिसत आहे. जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सच्या टीमकडून पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. आर्चर त्याच्या वेगवान गोलंदाजीतून मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनला धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडत असल्याचं या व्हिडीओ पाहायला मिळत आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, मुंबई इंडियन्सच्या जर्सीत जोफ्रा आर्चर पहिलं षटक फेकताना दिसत आहे.

नक्की वाचा – ‘IPL’चा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम काय आहे? सामना सुरू असताना संघात केव्हा बदल करू शकता? जाणून घ्या सविस्तर माहिती

इथे पाहा व्हिडीओ

जोफ्राच्या वेगवान माऱ्यामुळं चेंडूवर अचूक फटका मारण्यात रोहित आणि इशानला अडथळा निर्माण होत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. मागील टी-२० विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात घरेलू मैदानावर मालिका रंगली होती. त्यावेळी पाठीच्या दुखापतीमुळं बुमराहला टीम इंडियासाठी खेळता आलं नाही. बुमराहला टी-२० वर्ल्डकपलाही मुकावं लागलं. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चर बुमहराहसारखी अप्रतिम गोलंदाजी करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विदेशी खेळाडूंना क्रिकेटचा दांडगा अनुभव असतो. दुखापतीनंतर मैदानात गोलंदाजी करायला जोफ्रा आर्चर सज्ज झाला आहे. मैदानात चांगली कामगिरी करण्यासाठी जोफ्रा सर्वस्व पणाला लावेल, असं मुंबईचे कोच मार्क बाऊचर यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 19:37 IST
Next Story
IPL 2023, GT vs CSK Highlights: शुबमन गिलचे शानदार अर्धशतक! अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सची चेन्नईवर पाच गडी राखून मात
Exit mobile version