Jasprit Bumrah, ICC World Cup 2023: जसप्रीत बुमराहने एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने दोन महत्त्वाचे गडी बाद केले. पाकिस्तान संघाला १९१ धावांत रोखण्यात त्याचे मोठे योगदान आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला बुमराहपासून वाचण्याचा अजब पर्याय दिला. त्याला ऑस्ट्रेलिया संघाची आतापर्यंतची कामगिरीवर त्याने संताप देखील व्यक्त केला. तो म्हणाला, जर बुमराहचे चेंडू खेळता येत नसतील तर माझ्याप्रमाणेच निवृत्त व्हा.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमराह सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे विविध प्रकारचे चेंडू टाकण्याची हातोटी आहे. कदाचित तो सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो आपल्या लाईन आणि लेन्थने सर्वोत्तम फलंदाजांना त्रास देऊन त्यांच्या नाकीनाऊ आणत आहे. बुमराहने अनेक विक्रम मोडले आहेत आणि विरोधी संघांच्या मनात भीती देखील निर्माण केली. अनेक माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहचे कौतुक केले आहे. त्याचवेळी काहींनी त्याच्या असामान्य गोलंदाजीवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच विश्लेषण आणि सर्वकाही असूनही बुमराह यशस्वी ठरला आहे. तो आज जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे यात आश्चर्य नाही.

मैदानावरील वाईट अडचणीच्या काळातही बुमराह प्रभाव टाकण्यात यशस्वी होतो, याचेच कौतुक फिंचने केले. बुमराहने हळूहळू स्वत:ला एक महान गोलंदाज बनवले आहे आणि त्याची तुलना नेहमीच महान गोलंदाजांशी केली जाते. मात्र, आजपर्यंत इतर कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या इतक्या कौशल्याच्या बाबतीत मागे टाकता आलेले नाही.

हेही वाचा: Team India: टीम इंडिया पुण्यनगरीत! बांगलादेशाला चीत करण्यासाठी रोहित सेना सज्ज, विमानतळावर जल्लोषात स्वागत

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहचे कौतुक केले. “बुमराह फक्त उजव्या हाताच्या फलंदाजांना चेंडू स्विंग करतो असे नाही तर तो डावखुऱ्या फलंदाजांसाठी देखील धोकादायक आहे,” असे फिंच म्हणाला. तो पुढे म्हणाला, “बुमराहने हळूहळू चेंडूही फलंदाजापासून दूर नेण्यास सुरुवात केली आहे.”

फिंच पुढे म्हणाला की,“जेव्हा बुमराहने पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा तो प्रामुख्याने उजव्या हाताच्या फलंदाजासाठी इनस्विंगर होता. तो त्यांना एका सरळ रेषेत गोलंदाजी करायचा. मग, एका मालिकेत, त्याने नॉन-स्टॉप आउटस्विंग गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि नंतर अधूनमधून इनस्विंग देखील केले. त्यानंतर डावखुऱ्या गोलंदाजांसाठी तो राउंड द विकेट येत चेंडू इनस्विंग करू लागला. यामुळे तो फलंदाजांसाठी अधिक घातक होत गेला.”

हेही वाचा: IND vs PAK: बाबर आझमने विराट कोहलीची जर्सी घेतल्याने वसीम अक्रम संतापला; म्हणाला, “हे करण्याचा दिवस…”

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणाला, “प्रत्येक फलंदाजाला नेहमी असे वाटते, माझे फूटवर्क खराब झाले आहे. मात्र, बुमराहची गोलंदाजीपुढे सगळ्या फलंदाजांची हीच परिस्थिती होते. त्याच्याकडे खूप चांगले मजबूत मनगट आहे. तो फक्त बोटाचा वापर करून थोडे बदल करतो. ज्या व्यक्तीचे हात लवचिक असतात त्याला गोलंदाजीत अधिक विविधता आणता येते. बुमराहला रोखण्याचा प्रयत्न करणे खरोखर कठीण आहे. तो सातत्याने जगातील सर्वोत्तम खेळाडूंना बाद करतो.”शेवटी, जेव्हा फिंचला विचारले की बुमराहचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे, तेव्हा विश्वचषक विजेत्या कर्णधाराने विनोदाने उत्तर दिले, “मी ही सामना न करू शकल्याने निवृत्त झालो आहे. तुम्हीही व्हा.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 if you want to avoid bumrah you should retire ex australian captain aaron finch makes surprising statement avw