3 best diet tips to get rid of cardiovascular disease | Loksatta

Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल

हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आहारात जास्त कॅलरी असलेले पदार्थ टाळा.

Heart Health: हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल तर आहारात ‘हे’ ३ बदल करा; धोका वेळीच टळेल
photo(freepik)

हृदय हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचा ठोका आपण जिवंत असल्याचा पुरावा आहे. ज्या दिवशी हृदयाची धडधड थांबते तो दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस असतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. उत्तम आहारामुळे रक्तदाबापासून हृदयविकारापर्यंत प्रतिबंध होतो. गेल्या काही वर्षांत हृदयरुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अलीकडे अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू झाला आहे.

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात उच्च-कॅलरी पदार्थ आणि मिठाईचे सेवन मर्यादित करा. लक्षात ठेवा की जर तुम्ही दिवसातून २००० कॅलरीज घेत असाल तर त्यामध्ये फक्त ११ ते १३ ग्रॅम चरबी असावी. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चरबीयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश करून आणि काही गोष्टी टाळून तुम्ही हृदयविकार टाळू शकता.

( हे ही वाचा: Heart Health: हृदयविकाराच्या झटक्यानंतर व्यक्तीचा आहार कसा असला पाहिजे? तज्ञांकडून जाणून घ्या)

आहारावर नियंत्रण ठेवा

हृदय निरोगी ठेवण्याचा पहिला मंत्र म्हणजे आहारावर नियंत्रण ठेवणे. अनौपचारिक काहीही खाणे टाळा. अन्नामध्ये मांस, प्रक्रिया केलेले मांस आणि गोड पदार्थांचा वापर मर्यादित करा. जर तुम्हाला जास्त खावेसे वाटत असेल तर भूक शांत करण्यासाठी सॅलड खा.

डॅश आहार घ्या

हृदय निरोगी ठेवायचे असेल तर डॅश डाएटचे सेवन करा. DASH आहारामध्ये भरपूर फळे, भाज्या, गहू, शेंगदाणे, बीन्स, मांस, मासे, दूध असलेले पदार्थ यांचा समावेश होतो. हे सर्व पदार्थ फॅट फ्री असतात, त्यात सॅच्युरेटेड फॅट्स आणि साखर नसते. DASH आहार उच्च रक्तदाब नियंत्रित करतो आणि हृदय निरोगी ठेवतो.

( हे ही वाचा: पहाटेच्या वेळीच हृदयविकाराचा झटका जास्त करून का येतो? ‘या’ लोकांना वेळीच व्हावे लागेल सावध)

हे पदार्थ टाळणे महत्वाचे आहे

हृदय निरोगी ठेवायचे असेल तर काही पदार्थ टाळा. नारळ, मलईदार भाज्या, चटण्या, तळलेले पदार्थ, रिफाइंड कार्बोहायड्रेट, साखर, पांढरे पीठ आणि पांढरा तांदूळ, कॅन केलेला फळे, साखर जोडलेले अन्न यांचे सेवन हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. या सर्व पदार्थांपासून दूर राहा. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, चरबीपासून दूर राहणे सर्वात महत्वाचे आहे.

संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो ज्यामुळे हृदयावर दबाव वाढतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
वजन घालवण्यासाठी रात्रीचे जेवण टाळण्याऐवजी ‘हा’ फायबरयुक्त आहार घ्या, भूक लागणार नाही

संबंधित बातम्या

Diabetes Tips: मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठी बातमी! साखर खाणं सोडाच, पण या पदार्थांचं सेवन करणंही तितकच घातक
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
Heart Attack: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा
पुरुषांची चिंता वाढवणारी बातमी! सायकल चालवण्याने नपुंसकतेचा धोका, तुम्ही या चुका तर करत नाहीत ना?
मूळव्याध, बद्धकोष्ठच्या त्रासाने हैराण? थंडीच्या सीझनमध्ये येणारं ‘हे’ फळ करतं अमृतासमान काम

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापत झाल्याने रोहित शर्मा रुग्णालयात दाखल
एक ‘झॉम्बी’ तर एक ‘लॉबीस्ट’ वसीम अक्रमने केले आत्मचरित्रात आश्चर्यकारक खुलासे
काजोलने सांगितला शाहरुख आणि अजय यांच्यातील फरक; म्हणाली, “SRK मेहनत…”
‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जेलमध्ये राहिल्याने…”
सांगली : पाच दिवस चकवा देणाऱ्या सांबराला पकडण्यात वनविभागाला यश