Numbness and tingling Information: अनेक वेळा आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींकडे होणारे दुर्लक्ष हे त्यामागचे मुख्य कारण आहे. कोणताही थंड पदार्थ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि कधी कधी ताप येतो. यामागील आणखी एक कारण म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीची पातळी कमी होते. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. अनेकांना मुंग्या येणे, पेटके येणे, हात-पायांमध्ये स्नायू आकुंचन यासारख्या समस्या येतात. हे घडण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता हे कारण असू शकते. त्यामुळे तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की कोणत्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हे होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हात आणि पायांना मुंग्या येणे सामान्य आहे. पण जर शरीराला वारंवार मुंग्या येत असतील तर ती चिंतेची बाब ठरू शकते. शरीरात कोणतीही क्रिया विनाकारण होत नाही. यामागे काही कारणे असू शकतात. शरीरात थकवा येण्याचे कारण म्हणजे आपल्या शरीरातील पोषक तत्वांची कमतरता. चला जाणून घेऊया याची कारणे आणि उपाय.

( हे ही वाचा; कांद्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ ६ फायदे; जाणून घ्या ते कसे बनवायचे)

हात आणि पायांना मुंग्या का येतात?

हात किंवा पायांना मुंग्या येणे कधीकधी जास्त वेळ बसल्याने होते. एकाच स्थितीत राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरण नीट होत नाही आणि शरीरात मुंग्या येणे सुरू होते. परंतु जर हे वरचेवर घडत असेल तर याचा अर्थ शरीरात जीवनसत्त्वे नसतात. त्यामुळे जीवनसत्त्वे असलेले पदार्थ खाल्ल्याने या समस्येपासून मुक्ती मिळते.

आपल्या नेहमीच्या आहारातील जीवनसत्त्वांचे प्रमाण संतुलित नसल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात पोषक द्रव्ये मिळत नाहीत. त्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्या येतात. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल, तर तुम्हाला तुमच्या हात आणि पायांमध्ये काही टोचल्यासारखे वाटू शकते. याचे कारण असे की शरीरात उपलब्ध जीवनसत्त्वे मज्जासंस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यामुळे मज्जासंस्था आपले काम करू शकते.

( हे ही वाचा: Heart attack First Aid: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; वेळीच सावध व्हा)

या पदार्थांद्वारे जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करा

व्हिटॅमिन बी ची कमतरता भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा लागतो. बी व्हिटॅमिनसाठी, तुम्ही बीन्स, मसूर, मांस, मासे, बटाटे आणि सुकामेवा यामधून बी जीवनसत्व मिळवू शकता. याशिवाय चीज, दूध, ताक, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमधून तुम्हाला बी जीवनसत्व भरपूर मिळेल. शाकाहारी लोक रोज सकाळी नाश्त्यात डाळ खाऊ शकतात. सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. एवोकॅडो हे असेच एक फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील भरपूर असते. सूर्यफुलाच्या बिया आणि तेलातही व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात आढळते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not ignore tingling in hands and feet know what causes this problem gps
First published on: 12-09-2022 at 13:01 IST