सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या वाढत्या ताणासोबतच आजारापणाकडे देखील दुर्लक्ष होत आहे. खरतर आपल्यात अनेक प्रकारचे विकार होत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हे आजार वाढत जातात. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका ही देखील एक सामान्य गोष्ट झाली आहे. वास्तविक हृदयविकाराच्या एक महिना आधी आपले शरीर आपल्याला अनेक संकेत देत असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा धोका टाळता येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे महिला आणि पुरुषांमध्ये सारखीच असतात, परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ही लक्षणे ओळखणे अधिक कठीण असते.

मेयो क्लिनिकच्या मते, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत दुखणे १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते. काही लोकांना छातीत हलके दुखते, तर काही लोकांना जास्त-तीव्र वेदना होतात. सध्या एका २४ वर्षीय तरुणाचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. हृदयविकाराचा झटका कोणालाही, कुठेही, कधीही येऊ शकतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

( हे ही वाचा: हार्ट अटॅकपासून करायचा आहे स्वतःचा बचाव? ‘ही’ औषधाची गोळी नेहमी जवळ ठेवा)

आम्ही तुम्हाला सांगतो की हार्ट अटॅकच्या एक महिना आधी तुमच्या शरीरात काही विशेष बदल व्हायला लागतात. किंवा तुमचे शरीर तुम्हाला सतर्क करू लागते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ही चिन्हे ओळखून तुम्ही वेळीच खबरदारी घेऊ शकता. जाणून घ्या हृदयविकाराची कोणती लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • छातीत दुखणे
  • चक्कर येणे
  • अनियंत्रित रक्तदाब
  • श्वास घेण्यात अडचण
  • सर्व वेळ थकवा जाणवणे
  • छातीत सतत धडधडणे
  • सौम्य हृदयविकाराचा झटका

( विश्लेषण: पहिल्या हार्ट अटॅकआधी पुरुष व महिलांमध्ये दिसतात वेगवेगळी लक्षणे; वयानुसार कसा ओळखाल धोका?)

काही सामान्य लक्षणांमध्ये छातीत दुखणे, अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे आणि घाम येणे यांचा समावेश असतो. ज्याकडे लोक सामान्य समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. तसेच, यावर उपाय म्हणून काही लोक वेदना कमी करण्याच्या गोळ्या घेऊन झोपतात. पण ही सामान्य समस्या नसून हा सौम्य हृदयविकाराचा झटका असू शकतो. याला सायलेंट हार्ट अटॅक म्हणतात . छातीत तीव्र वेदना, चक्कर येणे आणि मूर्च्छा येणे यासारख्या हृदयविकाराच्या लक्षणांशी बहुतेक लोक परिचित आहेत. ही सर्व लक्षणे तीव्र स्ट्रोक नंतर उद्भवतात.

महिलांमध्ये भ्रम स्थिती निर्माण होते

स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुषांसारखी स्पष्ट होत नाहीत. हार्मोनल बदलांमुळे ही सर्वात सामान्य लक्षणे आहेत. म्हणूनच स्त्रियांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे आणि हार्मोनल बदलांबद्दल संभ्रम आहे. तथापि, स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांसारखीच असतात. परंतु जेव्हा तुमचे हृदय वेगाने धडधडते, तेव्हा तुम्हाला तुमच्या छातीत घट्टपणा जाणवतो आणि तीव्र वेदना, श्वास लागणे या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत, आपण वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका आल्यास खालील गोष्टी तातडीने कराव्यात.

( हे ही वाचा: ‘या’ ब्लड ग्रुपला असतो हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! यात तुमचा तर सहभाग नाही ना? जाणून घ्या)

प्रथमोपचार म्हणून काय करावे?

  • जर ती व्यक्ती शुद्धीत असेल तर त्याला ताबडतोब ३००mg एस्पिरिन द्या. रक्त पातळ करण्यासाठी हे महत्वाचे आहे. काहीवेळा रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. असे झाल्यास त्याला दिलासा मिळेल. मात्र यासोबतच रुग्णाला तातडीने रुग्णालयात न्या.
  • जर रुग्ण बेशुद्ध असेल तर त्याला ताबडतोब सपाट पृष्ठभागावर झोपवा. नंतर नाकाजवळ बोटे घेऊन त्याचा श्वास तपासा आणि त्याची नाडी देखील तपासा.
  • जर श्वासोच्छवास किंवा नाडी काम करत नसेल तर लगेच CPR द्या. यासाठी तुमचा डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्यावर ठेवून बोटे बंद करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि रुग्णाची छाती पूर्ण शक्तीने दाबा.
  • लक्षात ठेवा की रुग्णाला शुद्धी येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत दर मिनिटाला १०० कॉम्प्रेशन द्यावे लागतील.
    रुग्णाची छाती संकुचित करा आणि प्रत्येक २५ ते ३० वेळा रुग्णाला तोंडाने ऑक्सिजन द्या. तोंडातून ऑक्सिजन देताना व्यक्तीचे नाक बंद करा.