नऊ ते दहा तास लॅपटॉप, संगणकावर काम करणे, सतत मोबाईल स्क्रोल करीत बसणे आदी कारणांमुळे अनेकदा मान किंवा पाठ दुखते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बेडवर पडून किंवा झोपून काम करण्याची व तासन् तास मोबाईल स्क्रोल करण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा पाठीवर व मानेवर ताण पडतो. तेव्हा अनेकदा आई किंवा घरातील काही वृद्ध मंडळी आपल्याला नीट बस, असे वारंवार सांगतात. पण, मोबाईल किंवा लॅपटॉप वापरताना तुम्हाला नेहमी सरळ बसण्याचा सल्ला का दिला जातो याचा कधी विचार केलाय? नाही… तर आज आपण याचबद्दल या लेखातून अधिक जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमचा मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप पाहताना चुकीच्या रीतीने बसण्याच्या पद्धतीमुळे तुम्हाला मानेचा दीर्घकालीन त्रास होऊ शकतो. इन्स्टाग्रामवरील एका व्हायरल व्हिडीओमध्ये कंटेंट क्रिएटर शिवम अहलावत यांनी तुमच्या बसण्याच्या पद्धतीनुसार तुमच्या मानेवर कसा भार पडतो हे स्पष्ट केले आहे.

तर याचसंबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मॅक्स हॉस्पिटलचे असोसिएट डायरेक्टर, ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंट डॉक्टर अखिलेश यादव आणि वैशाली यांनी मानेच्या मणक्याची शारीरयांत्रिकी (बायोमेकॅनिक्स) क्लिष्ट माहिती सोप्या रीतीने समजावून सांगितली आणि मानेच्या वेगवेगळ्या कोनातून कशा प्रकारे तुम्हाला वेदना होऊ शकतात ते स्पष्ट केले आहे.

हेही वाचा…खाण्यापूर्वी एक ते दोन तास ठेवा मशरूमला सूर्यप्रकाशात; व्हिटॅमिन डीची कमतरता राहील दूर? तज्ज्ञांनी सांगितलेलं सूत्र समजून घ्या

डॉटरांच्या म्हणण्यानुसार- पुढील पोझिशन्समध्ये असताना फोनकडे किंवा इतर गॅजेट्सकडे जास्त वेळ पाहू नका…

तुम्ही सरळ किंवा ० डिग्रीमध्ये बसता तेव्हा मानेवर पाच किलो वजन येते.
जेव्हा तुम्ही १५ डिग्रीमध्ये बसता तेव्हा मानेवर १२ किलोचे वजन येते.
तुम्ही ३० डिग्रीमध्ये बसलेले असताना मानेवर १८ किलो,
तर ४५ डिग्रीमध्ये मानेवर २२ किलो वजन येते.
आणि ६० डिग्रीमध्ये – मानेवर २७ किलो वजन येऊ शकते.
तुमचा फोन किंवा इतर गॅजेट्स वापरत असताना तुम्ही हे अँगल वापरत असाल, तर वेळीच टाळा. कारण- त्यामुळे तुमच्या मानेत वेदना होऊ शकतात आणि याचे गंभीर परिणाम तुम्हाला सहन करावे लागू शकतात.

मग यावर उपाय म्हणून तज्ज्ञ काय सुचवतात?

मानेच्या मणक्याचे गुंतागुंतीचे शारीरयांत्रिकी (बायोमेकॅनिक्स) समजून घेतल्याने मानेवर वेगवेगळ्या कोनांतून कसा दाब येऊ शकतो हे तुमच्या लक्षात येईल. मान जेव्हा ताठ स्थितीत असते. तेव्हा डोक्याचे वजन सर्व्हिकल व्हर्टेब्रे (cervical vertebrae), इंटरव्हर्टेब्रल डिस्क आणि आधार देणाऱ्या स्नायूच्या बाजूने समान रीतीने विखुरलेले असते आणि तेव्हा मानेवर ताण कमी येतो. पण, जेव्हा आपण दीर्घकाळ चुकीच्या आसन पद्धतीत मोबाईल स्क्रोल करतो तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती डोक्याचे वजन वाढवते आणि मग आपण मान वाकवतो; ज्यामुळे मानेच्या संरचनेवर दबाव वाढतो. या वाढलेल्या ताणामुळे स्नायू, लिगामेंट व डिस्कवर ताण पडतो; ज्यामुळे अस्वस्थता आणि कालांतराने स्ट्रक्चरल डॅमेजदेखील होऊ शकते, असे डॉक्टर यादव यांनी सांगितले.

दुसरीकडे व्यवस्थित स्थितीत बसल्याने डोक्याच्या वजनाचे एकसमान वितरण होण्यास प्रोत्साहन मिळते; ज्यामुळे मानेच्या मणक्यावरील जास्त ताण येण्याचा धोका कमी होतो. डॉक्टर यादव यांनी स्पष्ट केले की, रुग्ण वारंवार डोकेदुखी, मानदुखी किंवा रेडिएटिंग अस्वस्थतेची तक्रार करतात; तेव्हा ती लक्षणे सहसा दीर्घकाळ गॅजेट्स पाहणे किंवा वारंवार ताणतणाव आल्यामुळे उदभवतात, असे डॉक्टर यादव म्हणाले आहेत.

या समस्येवर काही उपचार आहेत का?

मजबूत स्नायूसाठी शारीरिक उपचार किंवा बर्फ थेरपी आदी गोष्टी मदत करू शकतात. आसनांचे महत्त्व ठळकपणे दर्शविते की, ते दीर्घकालीन मणक्याचे आरोग्य राखण्यासाठी आणि वातसंबंधित समस्या टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not look at your phone for a long time in these positions this everyday habit is burdening your neck with almost 27 kgs asp
First published on: 23-05-2024 at 11:07 IST