Health Benefits of Cardamom Water : स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास त्याचे शरीरास अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळा आपल्याबरोबर विविध आजारपण घेऊन येतो, या काळात पचनक्रिया मंदावते, तसेच सर्दीमुळे हैराण व्हायला होते. यावेळी तुम्ही रोज कच्च्या वेलचीचे पाणी प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. पण, वेलचीच्या पाण्याच्या सेवनाने तुमच्या शरीराला नेमके कोणते फायदे होतात आणि ते प्रत्येकासाठी खरंच फायदेशीर असतात का, जाणून घेऊ…

कच्च्या वेलचीचे पाणी पिण्याचे फायदे

कन्सल्टंट डाएटिशियन कनिका मल्होत्रा आणि सर्टिफाइड डायबिटीज एज्युकेटर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, “हिवाळ्यात कच्च्या वेलचीचे पाणी सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात. वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या नियंत्रणात राहते. हिवाळ्याच्या दिवसांत जड अन्नपदार्थ पचायला वेळ लागतो, अशावेळी वेलचीचे पाणी पिणे उपयुक्त ठरू शकते.

सर्दी, खोकल्यापासून मिळेल आराम

यासह सर्दी, खोकला यांसारख्या श्वसनविषयक समस्यांपासून आराम मिळतो, ज्यामुळे थंड दिवसांत विशेषतः वेलचीच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. वेलचीच्या सेवनाने रक्ताभिसरण क्रियेला चालना मिळते. शरीर उबदार ठेवण्यास मदत होते, यामुळे थंडीच्या दिवसांत आरामदायी वाटते.

याव्यतिरिक्त वेलचीच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात जमा झालेले टॉक्सिन घटक लघवीवाटे शरीराबाहेर काढण्यास मदत होते, यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येते.

आहारतज्ज्ञ मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, “काही व्यक्तींना रोज वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने साइड इफेक्ट जाणवू शकतात. जसे की, ॲलर्जी होऊ शकते. यामुळे त्वचेवर जळजळ होण्यापासून ते ॲनाफिलेक्सिससारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. याच्या अतिसेवनामुळे छातीत जळजळ, अतिसार आणि मळमळ यांसह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या जाणवू शकतात.

रक्तदाबाची समस्या होईल कमी

यामुळे काहींना रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. रक्तदाब अचानक कमी होणाऱ्या लोकांनी वेलचीचे पाणी पिणे टाळले पाहिजे. यासह अँटीकोआगुलंट्स आणि अँटीडायबेटिक औषधांचे सेवन करणाऱ्या लोकांनीही नियमित वेलचीच्या पाण्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या.

आहारतज्ज्ञ मल्होत्रा ​​यांनी सांगतले की, “कच्च्या वेलचीच्या पाण्याचे जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी वेलची रात्रभर भिजवून ठेवणे ही सर्वोत्तम पद्धत आहे. यासाठी एक-दोन हिरव्या वेलची घ्या आणि त्या ठेचून एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवत ठेवा. यानंतर सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

वेलचीमध्ये असे गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, चयापचय क्रियेला आणि डिटॉक्सिफिकेशनला चालना मिळते. वेलचीचे पाणी कोमट करून प्यायल्यास पचन आणि रक्ताभिसरणास आणखी मदत होऊ शकते, यामुळे मेटाबॉलिज्म बॉडीत जमा झालेले फॅट्स काही दिवसांत बर्न करते. विशेषतः थंडीच्या महिन्यांत हे अधिक फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of cardamom water why adding raw cardamom water to your diet is essential this winter sjr