विदर्भ-मराठवाडा सीमेवर नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी जुलै महिन्यातच ओसंडून वाहत आहे. विदर्भ, मराठवाड्याचा ‘नायगरा धबधबा’ अशी ओळख असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचे सौंदर्य नजरेत साठवून घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथून २५ किलोमीटर अंतरावर सहस्त्रकुंड धबधबा आहे. येथे ३० ते ४० फुटावरून कोसळणारा जलप्रपात पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची गर्दी होते. यावर्षी हा प्रपात जुलै महिन्यातच सुरू झाल्याने व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पर्यटकांची वर्षा सहल साजरी होत आहे. सहस्त्रकुंड धबधब्याच्या बाजूस महादेवाचे मंदिर आहे. इथे मंदिराच्या पायथ्याशी पैनगंगा नदीचे रुंदावलेले पात्र आणि काला पाषाण दगडात एकजीवपणा आला आहे.

पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन –

येथे विदर्भ, मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून पर्यटक गर्दी करतात. पर्यटकांना धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहता यावे म्हणून प्रशासनाने येथे उंच मनोरे तयार केले आहे. पर्यटक येथे गर्दी करत असून ‘सेल्फी’चा आनंद घेत आहे. सहस्त्रकुंड धबधब्याच्या किनाऱ्यावर सुंदर बगीचाही तयार करण्यात आला आहे. धबधब्याचे सौंदर्य न्याहाळताना पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crowd of tourists at sahastrakund waterfall on vidarbha marathwada border msr