वाई: खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर खा.उदयनराजेंकडून देवेंद्र फडणवीस यांना तलवार आणि वाघनखं भेट दिली.यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन,प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. उदयनराजे सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार होते.नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असताना राजीनामा देऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आणि भाजपाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढविली.या निवडणुकीत माजी सनदी अधिकारी व सिक्कीमचे माजी राज्यपाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या कडून उदयनराजे पराभूत आले.भाजपाने त्यांना राज्यसभेचे खासदार केले.आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पाडली. त्यामुळे आता उदयनराजेंना पुढील निवडणूक सोपी जाणार व आपले पुन्हा लोकसभेत जाण्याचे स्वप्न साकार होणार अशी शक्यता वाटते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे उदयनराजेंचा लोकसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे .मोहीम फत्ते झाल्याच्या निमित्त उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटघेत त्यांना ऐतिहासिक तलवार आणि वाघनखे भेट दिली.

सातारा शहरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून अनेक प्रकल्प आणि विकास कामे राबविण्यात येत आहेत .या प्रलंबित विकास कामांना निधी मिळावा, यासाठी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती मिळाली. उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर ,सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, प्रीतम कळसकर, पंकज चव्हाण उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis gifted sword and tiger claws by udayanaraje bhosle amy