"...तर मोदीही मला संपवू शकत नाही", पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण | Pankaja Munde say then PM Narendra Modi also can not finished my politics | Loksatta

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत राजकारणावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पंकजा मुंडे व नरेंद्र मोदी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कधी विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले. ते सर्व अंदाज भाजपा नेत्यांनी फेटाळले. अशातच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. “मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,” असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही.”

“राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे”

“आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेशमंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “पंकजा मुंडे पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून…” प्रीतम मुंडेंचं विधान चर्चेत

“माझं काम संस्कृती जपणं आहे हे मान्य, मात्र…”

“जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांना हे अपेक्षित नाही. माझं काम संस्कृती जपणं आहे हे मान्य आहे. मात्र, माझं काम देशाला काही तरी देणंही आहे. असाच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असं मला वाटतं,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीत शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरब्याला परवानगी

संबंधित बातम्या

सीमावाद: “मोदींच्या मध्यस्थीने युक्रेन-रशिया युद्ध थंडावले, मग…”; ‘बोम्मई पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकतात’ असं म्हणत सेनेचा टोला
Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
“मी मरेपर्यंत…”, गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले “उद्धव ठाकरेंनी…”
“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गुजरातमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता! प्राथमिक निकालानंतर राजनाथ सिंह यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले “विजयाचे आम्हाला नवल नाही, कारण…”
पुणे : १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९० टक्के तरुणांची मतदार नोंदणी नाही; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती
पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीवर ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी
Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट
“तुम्ही निर्लज्ज…” जेव्हा नीना गुप्ता यांच्या मित्रानेच चित्रपटात घेण्यास दिला होता नकार