“मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे”; सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

आमचं काही जात नाही, आमच्या मागेपुढे काही नाही, असा इशाराही खोत यांनी दिला

Sadabhau Khot criticizes Sharad Pawar
शरद पवार व सदाभाऊ खोत

राज्यातील वाढती जातीय तेढ आणि ब्राह्मण विरोधक असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांची पुण्यात बैठक घेतली होती. त्यानंतर ब्राह्मणविरोधी वक्तव्याला पाठिंबा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणावारुनही शरद पवारांनी भाष्य केले होते. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आटपाडी शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.

“ब्राह्मण समाजाने आरक्षण मागितले नव्हते पण शरद पवारांनी ट्विट केले की दुसऱ्याच्या आरक्षणाला तुम्ही विरोध करु नका असे म्हटले. पण ते असे म्हणालेच नव्हते. मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रम्हदेवाला विचारणार आहे. हा गडी एवढा हुशार झालाच कसा? यांच्यामध्ये कोणते स्पेअरपार्ट घातले हेही ब्रह्मदेवाला विचारणार आहे. मला वाटतं ब्रह्मदेवाला चुकवून ते खाली पळाले असणार. एवढा बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणारा नाही. या महाराष्ट्राला लुटण्याचे काम या मंडळींनी केले आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आपल्याला हे सरकार घालवायचे आहे,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच मशिदही जुनी आहे, मागील ३००-४०० वर्षांमध्ये…”

या वर्षी हर्बल गांजा पेरायला हवा. कारण हर्बल गांजाला परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिकांच्या जावयाकडे गांजा सापडल्यानंतर तो हर्बल तंबाखू असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण एकमुखाने मागणी करुया की हर्बल तंबाखूचे बियाणे द्या त्यामुळे आमची गरिबी तरी जाईल. कारण तुम्ही आम्हाला काही देऊ शकत नाही. जो कोणी बोलतो त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकले जाते, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

शरद पवारांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार नाही – चंद्रकांत पाटील

“आमच्या नादाला कशाला लागत आहात आम्ही फाटकी माणसं आहोत. आमचं काही जात नाही, आमच्या मागेपुढे काही नाही. आमच्या नादी लागू नका. आम्ही आधीपासून नागडे आहोत पण तुम्हाला चौकात नागडे केल्याशिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा,” असाही इशारा खोत यांनी दिला.

शरद पवार हे कोणत्या स्पेअरपार्टने बनले आहेत हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही – राष्ट्रवादी काँग्रेस

“शरद पवार हे हुशार आहेत हे मान्य केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांचे आभार. शरद पवार हे कोणत्या स्पेअरपार्टने बनले आहेत हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही. कारण तुमची नजर द्वेषाची आहे. प्रेम, सेवा, कतृत्व, दूरदृष्टी या स्पेरअपार्टने शरद पवार घडले आहेत हे महाराष्ट्रातील सामान्या माणूस सांगेल. त्यामुळे तुम्हाला अनेक जन्म घेतले तरी शरद पवार कळणार नाहीत,” असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sangli sadabhau khot criticizes sharad pawar abn

Next Story
“…त्यामुळेच शरद पवारांना कायम भावी पंतप्रधान म्हणून हिणवलं जातं”; राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन मनसेचा हल्लाबोल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी